न फाटणारे, मजबूत आणि पाणी न शोषणारे पॉली कव्हर असलेल्या या नोटबुक्समध्ये तुमचे लिखाण रोजच्या वापरामुळे किंवा अनवधानाने सांडलेल्या द्रवांपासून सुरक्षित राहते. जाड 64 जीएसएम कागदामुळे लेखनाचा अनुभव अधिक स्मूद आणि आनंददायी होतो. तसेच या कागदामुळे शाई पसरत नाही आणि मागच्या पानावर उमटतही नाही. त्यामुळे प्रत्येक पान स्वच्छ आणि प्रोफेशनल दिसते. ट्रेंडी मेटॅलिक फिनिश कव्हर डिझाइन्समुळे युवाची स्टेलर नोटबुक्स तुमच्या स्टेशनरी कलेक्शनला प्रीमियम आणि आधुनिक लुक देतात. टिकाऊ आणि विश्वासार्ह अशा या नोटबुक्स प्रत्येक वर्गासाठी, प्रोजेक्टसाठी आणि कल्पनेमध्ये साथ देण्यासाठी बनवलेल्या आहेत.
या लाँचबद्दल युवा स्टेशनरीचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अभिजीत सान्याल म्हणाले, "आजच्या पिढीच्या गरजा व ऊर्जा प्रतिबिंबीत होणाऱ्या स्टेशनरीची निर्मिती करण्याचे युवामध्ये आमचे उद्दिष्ट असते. युवाच्या नव्या स्टेलर नोटबुक या लेखकाच्या सगळ्या गरजा भागवणाऱ्या नोटबुक आहेत. योग्य जाडीचा कागद, पुरेशी जागा आणि स्टायलिश कव्हर डिझाइन असलेली ही नोटबुक दर्जेदार, टिकाऊ आणि ट्रेंडी पर्याय शोधणाऱ्या प्रत्येकासाठी परिपूर्ण निवड ठरते.”
ए4 आकारात उपलब्ध असलेल्या या नोटबुक्स विद्यार्थ्यांसाठी, व्यावसायिकांसाठी आणि क्रिएटर्ससाठी स्मूथ लेखनासाठी पुरेशी जागा देतात. या नोटबुक्स आता सर्व आघाडीच्या स्टेशनरी स्टोअर्स आणि जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत.

0 Comments