Business

Header Ads

कापसावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सिंजेंटा कंपनीने महाराष्ट्रातील 1490 गावांमधील 42000 हून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले

नागपूर : भारताच्या एकूण कापूस उत्पादनातील जवळपास एकतृतीयांश वाटा असलेल्या महाराष्ट्रात, सिंजेंटा इंडियाने 1490 गावांतील सुमारे 45200 शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रशिक्षण मोहिमेद्वारे प्रशिक्षण दिले आहे. या उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे सांगितले असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

सिंजेंटा इंडियाने ही महिनाभर चाललेली मोहीम यवतमाळ, वर्धा, अकोला, नांदेड, अमरावती आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये राबवली. हे सर्व जिल्हे राज्याच्या कापूस उत्पादन पट्ट्याचे केंद्र असून, येथे कीडग्रस्त उत्पादनाचे नुकसान वारंवार होत असते. या मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना कीड प्रादुर्भावाची सुरुवातीची चिन्हे ओळखता यावीत, एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) पद्धती अवलंबता यावी आणि कीड पसरण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय करता यावेत यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमात कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) – यवतमाळ, अकोला आणि वर्धा यांचा सहभाग होता, तसेच कृषी विभाग आणि सर्व सहा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयांच्या माध्यमातून जनजागृती उपक्रम राबवण्यात आले. या संयुक्त प्रयत्नांमुळे मोहीम अधिक व्यापक आणि प्रभावी ठरली. याशिवाय, 600 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तीन जिल्हा-स्तरीय कार्यशाळा आणि 2000 शेतकऱ्यांसाठी 41 गाव-स्तरीय प्रशिक्षण सत्रे घेण्यात आली. 

सिंजेंटा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुशील कुमार यांनी सांगितले की, या मोहिमेत वर्गात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासोबतच प्रत्यक्ष शेतात प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, ज्यामुळे शेतकऱ्यांना शिकलेल्या तंत्रज्ञानाचा वापर थेट त्यांच्या पिकांवर करता आला. ते म्हणाले, “प्रशिक्षणामध्ये कीड लवकर ओळखणे, फेरेमोन ट्रॅप्स योग्य पद्धतीने बसवणे आणि पिकांची नियमित तपासणी करणे यांसारख्या महत्त्वाच्या कृषी पद्धतींवर भर देण्यात आला. मोहिमेची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी आणि त्याची पोहोच वाढवण्यासाठी 3000 फेरेमोन ट्रॅप्स आणि 900 पीपीई किट्सचे वितरण करण्यात आले.” याशिवाय माहिती पुस्तिका आणि मोबाईल प्रशिक्षण व्हॅन्सच्या माध्यमातून ही माहिती आणि साधने दुर्गम कापूस उत्पादक गावांपर्यंत पोहोचवण्यात आली, ज्यामुळे या उपक्रमाचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला.

या भागांतील शेतकऱ्यांनी यावर्षी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे सांगितले आहे. अकोल्यातील कापूस शेतकरी गणेश नानोटे म्हणाले, “या वर्षी आमच्या पिकांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव खूपच कमी झाला आहे. चांगल्या पावसाबरोबरच नियमित प्रशिक्षण आणि जनजागृती सत्रांनी आम्हाला कीड लवकर ओळखण्याची आणि वेळेत उपाययोजना करण्याची माहिती दिली. आधी आम्हाला कीड दिसेपर्यंत अर्धे पीक नष्ट होत असे, पण आता आम्ही ती लवकर ओळखून नियंत्रण मिळवू शकतो.”

गुलाबी बोंडअळी ही लहान पण अतिशय हानिकारक कीड असून ती कापसाच्या बोंडांवर उपजीविका करते. त्यामुळे कापसाची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही घटतात. अंदाजानुसार, या कीडीमुळे भारतात दरवर्षी सुमारे 3.75 टक्के कापसाचे नुकसान होते, म्हणजेच सुमारे 0.64 दशलक्ष टन उत्पादन नष्ट होते. यामुळे दरवर्षी सुमारे 500 ते 800 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होते. महाराष्ट्र हा देशातील एकूण कापूस उत्पादनातील जवळपास एकतृतीयांश वाटा उचलणारा राज्य असल्याने, ही कीड राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि कृषी अर्थव्यवस्थेसाठी अजूनही मोठा आर्थिक धोका ठरते.

तज्ञांचे मत आहे की नियमित प्रशिक्षण आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) पद्धतींचा व्यापक अवलंब केल्यास हा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. सिंजेंटा इंडियाचे मुख्य शाश्वतता अधिकारी (Chief Sustainability Officer ) डॉ. के. सी. रवी म्हणाले, “3.75 टक्के नुकसान हा एक साधारण अंदाज आहे. जर शेतकऱ्यांनी नियमित शेत तपासणी, शेताची स्वच्छता आणि वेळेवर कीड नियंत्रण केले, तर हे नुकसान आणखी कमी होऊ शकते. प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर उपाय करण्याऐवजी आधीच प्रतिबंधक पावले उचलण्याचा आत्मविश्वास मिळतो.”

शेतकऱ्यांची जनजागृती, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि शेतपातळीवरील अंमलबजावणी यांचा संगम साधणारी ही मोहीम आता इतर कापूस उत्पादक राज्यांसाठी समुदाय-आधारित कीड नियंत्रणाचे आदर्श मॉडेल ठरत आहे.

Post a Comment

0 Comments