थोडक्यात पण महत्त्वाचे
● वसुंधरा मित्र’ उपक्रमाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील शाळा-आधारित इको क्लबद्वारे पर्यावरणीय सक्षमीकरणाचे नेतृत्व करण्यासाठी १.५ लाख विद्यार्थी आणि ६,००० शिक्षकांना सक्षम करण्याचे.
● ३,००० ग्रीन स्कूलसह हा उपक्रम विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळा आणि व परिसरात पर्यावरणपूरक सवयी स्वीकारण्यास, वापरण्यास आणि प्रोत्साहन देण्यास सक्षम करेल.
महाराष्ट्र– २६ नोव्हेंबर २०२५ : फ्लिपकार्ट ग्रुपची धर्मादाय शाखा असलेल्या फ्लिपकार्ट फाऊंडेशनने वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर - इंडिया (डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया) सोबत भागीदारी करून 'वसुंधरा मित्र - महाराष्ट्राच्या इको क्लबचे युवा संवर्धन प्रणेते' हा राज्यव्यापी पर्यावरण शिक्षण उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील सामाजिक वनीकरण विभागाच्या पाठिंब्याने आयोजित या उपक्रमाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील तरुण, जबाबदार आणि कृतीशील पर्यावरणप्रेमी पिढीचे संगोपन करण्याचे आहे.
हा प्रकल्प १५ महिन्यांचा असून तो महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये राबवला जात आहे. त्यात इयत्ता ५ वी ते ९ वीपर्यंतचे १.५ लाख विद्यार्थी, ६,००० शिक्षक आणि मुख्याध्यापक (७२ मास्टर ट्रेनरसह) सहभागी करून घेतले जातील. या उपक्रमातून शाळा आणि आसपासच्या परिसरात पर्यावरण शिक्षण, शाश्वत पद्धती आणि युवा-नेतृत्वाखालील संवर्धन प्रयत्नांना चालना देणाऱ्या ३,००० ग्रीन स्कूल्स स्थापन केल्या जातील. त्याचा फायदा समाजातील सदस्य आणि कुटुंबांसह ९.३ लाखांहून अधिक व्यक्तींना होईल.
नागपूर येथे ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाचे प्रतिनिधी आणि फ्लिपकार्ट फाउंडेशनच्या उपस्थितीत या उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. पर्यावरण शिक्षण आणि युवा-नेतृत्वाखालील संवर्धनासाठी राज्यव्यापी चळवळ उभारण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती येथे आयोजित प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण (टीओटी) कार्यशाळांमध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांतील शिक्षकांना सहभागी करून घेण्यात आले आणि शाळांमधील इको क्लबना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना परस्परसंवादी शिक्षण मॉड्यूल आणि सुविधा तंत्रांनी सुसज्ज करण्यात आले.
महाराष्ट्र वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) श्री विवेक खांडेकर आयएफएस म्हणाले, “वसुंधरा मित्र कार्यक्रम हा शिक्षण आणि सामाजिक सहभागाद्वारे पर्यावरणीय व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाचे संवर्धन करण्याच्या शासनाच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. हे शासनाच्या मिशन लाईफ (पर्यावरणवादी जीवनशैली) आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० शी सुसंगत असून त्यातून दैनंदिन शिक्षणात पर्यावरणीय जाणीवेचा समावेश करण्यावर भर दिला जातो. आपले संवर्धन नीतिमूल्य विद्यार्थ्यांपर्यंत आणून वसुंधरा मित्र विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आपल्या आसपासच्या निसर्गाचे सक्रिय पालक बनण्यास सक्षम करतो. फ्लिपकार्ट फाउंडेशन आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया यांनी महाराष्ट्रात या दृष्टिकोनाचे अर्थपूर्ण कृतीत रूपांतर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो.”
हा कार्यक्रम परस्परसंवादी, कृतीवर आधारित शिक्षणाद्वारे पर्यावरणीय जागरूकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो. विद्यार्थी ग्रीन ऑडिट आणि प्रमुख पर्यावरणीय दिनांवरील जागरूकता मोहिमांसारख्या सामुदायिक उपक्रमांसह वृक्ष टॅगिंग, कंपोस्टिंग, निसर्ग निरीक्षण, कचरा वर्गीकरण आणि पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी असे हरित प्रकल्प हाती घेतील. या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित शिक्षक या उपक्रमांचे मार्गदर्शन आणि समर्थन करतील. त्यामुळे शाळा आणि समाजात दीर्घकालीन पर्यावरणीय सहभाग शक्य होईल. या उपक्रमांतर्गत विकसित केलेली संरचित चौकट शिक्षकांना प्रशिक्षण साधने आणि मापन सुविधांसह सुसज्ज करेल जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरणीय शिक्षणाचा दीर्घकालीन अवलंब होईल.
या सहकार्याबद्दल बोलताना कम्युनिकेशन्स आणि फ्लिपकार्ट फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सारा गिडॉन म्हणाल्या, “फ्लिपकार्ट फाउंडेशनमध्ये आमचा असा विश्वास आहे की पर्यावरणीय जाणीव वाढवणे हे शालेय शिक्षण आणि कृतीने सुरू होते. या भागीदारीद्वारे आम्ही लहान मनांना आपले पर्यावरण समजून घेण्यासाठी, त्यांचा आदर करण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल आणि नेतृत्वगुण वाढवून आम्हाला अशी पिढी प्रेरित करायची आहे जी केवळ शाश्वतता शिकत नाही तर रोजच्या आयुष्यात त्याचा अवलंब करते.”
डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाचे सरचिटणीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवी सिंग म्हणाले, “वसुंधरा मित्र कार्यक्रम पर्यावरणाविषयी जागरूक पिढीचे निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करून, त्यांची उत्सुकता, स्व-शिक्षण आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवून संगोपन करण्याचा प्रयत्न करतो. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण कृती करण्यासाठी साधने आणि कौशल्ये देऊन, ही भागीदारी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील नॅशनल ग्रीन कॉर्प्स (एनजीसी) योजनेअंतर्गत शाळांमध्ये इको-क्लब मजबूत करण्यास आणि शाश्वत भविष्यासाठी नाविन्यपूर्ण उपायांना प्रेरणा देण्यास मदत करेल.”
ही भागीदारी फ्लिपकार्ट फाउंडेशन आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाच्या पर्यावरणीय जबाबदारीला प्रोत्साहन देण्यासाठी, समुदाय-आधारित संवर्धनाला चालना देण्यासाठी आणि हिरव्या आणि अधिक शाश्वत भविष्यासाठी सामूहिक कृतीला प्रेरणा देण्यासाठीच्या सामायिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंबित करते.

0 Comments