नोव्हेंबर 26, 2025 : देशभरात क्रिकेटचे आकर्षण सर्वोच्च स्तरावर असताना, भारतातील आघाडीचा रंग आणि डेकोर ब्रँड असलेल्या एशियन पेंट्सला भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय) सोबत भारतीय क्रिकेटसाठी अधिकृत रंग भागीदार या नात्याने भागीदारीची घोषणा करताना अभिमान वाटतो. तीन वर्षांच्या या सहभागात भारतात खेळल्या जाणाऱ्या सर्व पुरुष, महिला आणि देशांतर्गत, 110 पेक्षा अधिक सामन्यांची व्याप्ती असणार्या मालिका समाविष्ट असतील. हा सहभाग एशियन पेंट्सचा क्रिकेटशी असलेला संबंध अधिक मजबूत करतो आणि क्रिकेटमधील प्रत्येक रंगाच्या 1.4 अब्ज हृदयांना एकत्र आणतो.
भारतीय घरांमध्ये रंग, सर्जनशीलता आणि भावना अनेक दशकांपासून साजरे करणारा ब्रँड या नात्याने, एशियन पेंट्सने आता देशातील सर्वात मोठे आकर्षण - क्रिकेट क्षेत्रात आपली चैतन्यशील उपस्थिती विस्तारली आहे. हा मोठ्या प्रभावाचा सहभाग प्रेरणा आणि अभिव्यक्तीच्या पारस्पारिक भावनेवर आधारित आहे जो भारतातील चाहत्यांना एकत्र करत, रंग आणि क्रिकेटमध्ये नाते जोडतो. धाडसी निर्णय ते चैतन्यमय अभिव्यक्तींपर्यंत, एशियन पेंट्स आणि भारतीय क्रिकेट हे दोन्ही्ही खरे नेतृत्व कसे असते ते प्रदर्शित करतात. यामुळे अब्जावधी हृदयांना जोडणाऱ्या रंगांचा उत्सव साजरा करणारी एक सशक्त भागीदारी सजीव होते.
या भागीदारीबद्दल बोलताना, एशियन पेंट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. अमित सिंगल म्हणाले, “क्रिकेट अब्जावधी हृदयांना एकत्र आणते आणि ती आसक्ती सजीव करणाऱ्या व्यासपीठावर बीसीसीआयसोबत भागीदारी करण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. एशियन पेंट्समध्ये, आम्ही नेहमीच लोकांचे जीवन, अनुभव आणि अभिव्यक्ती यावर रंगाच्या सामर्थ्याच्या प्रभावावर विश्वास ठेवला आहे आणि हा सहभाग त्या विश्वासाला बळकटी देतो.
बीसीसीआयसोबतच्या आमच्या भागीदारीद्वारे एका रोमांचक नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे - जिथे आम्ही भारतास सर्वात जास्त आवडणाऱ्या खेळाच्या गाभ्यात रंगाचे विश्व निर्माण करतो. अधिकृत रंग भागीदार या नात्याने, आम्ही चाहते आणि ग्राहकांशी अर्थपूर्ण मार्गांनी सहभाग साधण्यास, क्रिकेटचे चैतन्य आणि ऊर्जा साजरी करण्यास आणि खेळाच्या प्रत्येक क्षणात अधिक थरार आणि आनंद जोडण्यास उत्सुक आहोत.
एशियन पेंट्समध्ये, घरे केवळ वास्तव्याच्या जागा नसून त्यात 1.4 अब्ज स्वप्ने एकच बनतात असा आमचा विश्वास आहे. या सामूहिक उत्कटतेमध्ये, आपल्याला रंगाचा खरा उद्देश = नातेसंबंध जोडणे, हा दिसतो. आमच्याकडे अनेक मनोरंजक एकीकरणे आहेत जी या क्रिकेटशी सर्वात "रंगीत" नातेसंबंध जुळवतील.
बीसीसीआयचे प्रवक्ता, श्री. देवजित सैकिया पुढे म्हणाले, “भारतीय क्रिकेटचा अधिकृत रंग भागीदार म्हणून एशियन पेंट्सचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. लोकांच्या जीवनात रंग आणि भावना जोडण्याचा एशियन पेंट्सचा वारसा भारतीय क्रिकेटच्या भावनेला पूर्णत: पूरक आहे. एकत्रितपणे, आम्ही देशभरातील चाहत्यांसाठी संस्मरणीय अनुभव निर्माण करण्यास उत्सुक आहोत”
एशियन पेंट्सची भागीदारी आकर्षक ऑन-ग्राउंड आणि डिजिटल सक्रियकरणांच्या मालिकेद्वारे सजीव होईल, स्टेडियम अनुभवांपासून ते चाहत्यांच्या सहभाग मोहिमेपर्यंत - जे सर्व भारताच्या क्रिकेट उत्साहाचा उत्सव साजरा करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. पहिल्यांदाच तुम्हा प्रत्यकास "द एशियन पेंट्स कलर कॅम" नावाचा फॅन कॅम दिसेल जो "सर्वात रंगीबेरंगी चाहत्यां"ना साजरा करेल. या प्रथमच येणाऱ्या फॅन कॅममुळे खूप सहभाग निर्माण करेल आणि अशा रीतीने एका वेळेस एक छटा या प्रकारे "क्रिकेटमध्ये रंग" जोडला जाईल. या व्यतिरिक्त, ब्रँडमध्ये "कलर काउंटडाउन" देखील असेल जो प्रेक्षकांना 'रंग आणि गृह सजावटीचे ट्रेंड' दाखवेल जे चाहत्यांच्या हृदयात आणि घरांमध्ये प्रवेश करतील. हा ब्रँड मीडिया, डीलर आणि ग्राहक संपर्क बिंदूंमधील संबंधांना एकरूप करेल, ज्यामुळे लाखो भारतीयांशी भावनिक बंध मजबूत करण्यासाठी क्रिकेट हे एक नवीन चैतन्यशील व्यासपीठ बनेल.
आठ दशकांहून अधिक काळ, एशियन पेंट्स म्हणजे हे भारतातील रंग नेतृत्व आणि डिझाइन नवोपक्रमाचे असे मानले जाते. या भागीदारीतून, ब्रँडचे उद्दिष्ट क्रिकेट आणि त्यापलीकडे असलेल्या अब्जावधी भारतीयांशी भावनिक संबंध अधिक दृढ करणे हे आहे - म्हणजेच क्रिकेट प्रेरणा देणार्या उत्कटतेच्या छटा, सर्जनशीलता आणि एकतेचे रंग साजरे करणे.

0 Comments