थोडक्यात पण महत्त्वाचे
🔷 या लाँचसह, ओबेन इलेक्ट्रिक आता महाराष्ट्रात ७ शोरूम चालवणार आहे.
🔷 ओबेन रॉर ईझी सिग्माला (Oben Rorr EZ Sigma) असलेली वाढती मागणी, ओबेन इलेक्ट्रिकच्या देशभरातील नवीन आणि उदयोन्मुख ईव्ही बाजारपेठांमध्ये आक्रमक प्रवेशाला बळ देत आहे.
नागपूर, 21 नोव्हेंबर २०२५ : माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये ओबेन इलेक्ट्रिकच्या ७५ व्या शोरूमचे उद्घाटन केले, जो भारतातील स्वदेशी आणि संशोधन आणि विकास-चालित इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादकासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हनुमान नगरमध्ये स्थित असलेल्या या नवीन शोरूमला समर्पित ओबेन केअर सर्व्हिस सेंटर पूरक आहे, जे ग्राहकांना विश्वसनीय देखभाल आणि तज्ञांद्वारे विक्री-पश्चात साहाय्याची सोयीस्कर सुविधा प्रदान करते. या वाढीमुळे महाराष्ट्रात ओबेन इलेक्ट्रिकची उपस्थिती आणखी मजबूत झाली आहे आणि इथे ओबेन रॉर ईझी सिग्माची मागणी वेगाने वाढत आहे.
या लॉन्चसह, ओबेन इलेक्ट्रिक आता संपूर्ण महाराष्ट्रात 7 शोरूम चालवत आहे, जी नागपूर, पुणे (वाकड, शिवाजीनगर, अरण्येश्वर, चिंचवड); छत्रपती संभाजीनगर (जालना रोड); आणि सोलापूर (बार्शी) येथे आहेत. कंपनीने आधीच भारतभर ७५ शोरूम आणि सर्व्हिस सेंटरपर्यंत विस्तार केला आहे आणि ती, या आर्थिक वर्षाच्या अखेरीस तिचे नेटवर्क १५० हून अधिक शोरूम आणि सर्व्हिस सेंटरपर्यंत वाढवण्याच्या मार्गावर आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे आणि देशभरात ईव्ही च्या वाढत्या स्वीकारामुळे, बेंगळुरू, दिल्ली, कोची, जयपूर, अमृतसर, हैदराबाद आणि लखनऊ यासारख्या प्रमुख भारतीय शहरांमध्येही तिने मजबूत उपस्थिती राखली आहे.
या लाँचबद्दल बोलताना, ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापक आणि सीईओ मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, “आम्हाला रायडरकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामुळे ओबेन इलेक्ट्रिकची देशव्यापी उपस्थिती वाढवण्याच्या आमच्या प्रयत्नांना चालना मिळत आहे. नागपूरमधील आमच्या ७५ व्या शोरूमचे लाँचिंग हे, प्रीमियम कम्युटर इलेक्ट्रिक मोटारसायकली अधिक सुलभ बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते. ग्राहक-प्रथम दृष्टिकोन आणि मजबूत अंतर्गत संशोधन आणि विकास यांच्या पाठिंब्याने, आम्ही केवळ नाविन्यपूर्ण उत्पादनेच नव्हे, तर मालकी हक्काला अधिक सुधारित करणारी संपूर्ण ईव्ही इकोसिस्टम प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करतो.”
३.४ किलोवॅट प्रति तास आणि ४.४ किलोवॅट प्रति तास या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेली ओबेन रॉर ईझी सिग्मा, १७५ किमी आयडीसी पर्यंतची रेंज देते आणि तिच्यात तीन राइड मोड (इको, सिटी, हॅवॉक) आहेत आणि ती, ९५ किमी/ताशी कमाल वेग प्राप्त करते. ओबेनच्या पेटंट केलेल्या एलएफपी बॅटरी तंत्रज्ञानाद्वारे समर्थित असलेली ही इलेक्ट्रिक मोटरसायकल, ५०% जास्त उष्णता प्रतिरोधकता आणि दुप्पट जीवनचक्र टिकाऊपणा देते, जे भारतातील विविध हवामानात विश्वसनीय कामगिरी सुनिश्चित करते. १.१६ लाख रुपयांपासून सुरू होणारी किंमत असलेली रॉर ईझी सिग्मा ३.४ किलोवॅट प्रति तास आणि ४.४ किलोवॅट प्रति तास अशा व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, जी दररोजच्या प्रवाशांच्या आवाक्यात असलेला रायडिंगचा एक उच्च-दर्जाचा, आकर्षक अनुभव देते. रॉर ईझी सिग्मा ही इलेक्ट्रिक मोटरसायकल, दररोजच्या प्रवाशांच्या आवाक्यातील एक प्रीमियम, स्मार्ट-रायडिंगचा अनुभव देते.
या मध्ये सोयीस्कर रिव्हर्स मोड, नेव्हिगेशनसह ५-इंचाचा रंगीत टीएफटी डिस्प्ले, कॉल आणि टेक्स्ट अलर्ट आणि लाईव्ह ट्रॅकिंग, स्मार्ट नोटिफिकेशन्स आणि रिमोट लॉक अॅक्सेससाठी ओबेन इलेक्ट्रिक अॅपद्वारे अॅप कनेक्टिव्हिटी देखील आहे, ज्यामुळे एक अखंड, कनेक्टेड राइड मिळते. रॉर ईझी सिग्मा, फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर देखील उपलब्ध आहे.
ग्राहक-केंद्रित तत्वज्ञानाच्या अनुषंगाने, ओबेन इलेक्ट्रिक २४/७ ग्राहक समर्थन आणि जलद सेवा निराकरण पुरवते, ७२ तासांच्या आत ९०% समस्या-निराकरण दर राखते. प्रत्येक शोरूममध्ये प्लॅटिनम-प्रमाणित तंत्रज्ञांसह एक ओबेन केअर सर्व्हिस सेंटर आहे, जे बॅटरी, मोटर आणि व्हेईकल कंट्रोल युनिटसह सर्व इन-हाऊस विकसित घटकांसाठी तज्ञ देखभाल सुनिश्चित करते.

0 Comments