Business

Header Ads

एपीएसईझेड आणि मदरसन च्या भागीदारीमुळे दिघी पोर्ट दरवर्षी 2 लाख वाहन हाताळण्यासाठी सज्ज !

अहमदाबाद, 05 डिसेंबर 2025 : मदरसनने आपल्या संयुक्त उपक्रम कंपनी ‘समवर्धन मदरसन हामाक्युरेक्स इंजिनिअर्ड लॉजिस्टिक्स लिमिटेड’ (एसएएमआरएक्स) मार्फत आज दिघी पोर्ट लिमिटेड (डीपीएल) सोबत भागीदारी जाहीर केली आहे. डीपीएल ही अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड) ची उपकंपनी आहे. या करारानुसार महाराष्ट्रातील दिघी पोर्टवर वाहन निर्यातीसाठी एक विशेष सुविधा उभारली जाणार आहे.

या धोरणात्मक भागीदारीमुळे मुंबई–पुणे ऑटो बेल्टमधील वाहन उत्पादकांसाठी दिघी पोर्ट हा महत्त्वाचा ऑटोमोबाईल निर्यात केंद्र बनेल. एपीएसईझेडच्या 15 महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असलेले दिघी पोर्ट आता ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाखाली भारताच्या वाढत्या ऑटोमोबाईल उद्योगाला समर्थन देण्यासाठी आपली क्षमता वाढवली आहे. ज्यामुळे जागतिक बाजारात वाहनांची निर्यात आणि आयात अधिक सुरळीत होईल.

या भागीदारीबद्दल बोलताना अदानी पोर्ट्स आणि सेझचे सीईओ आणि पूर्णवेळ संचालक श्री. अश्वनी गुप्ता म्हणाले," दिघी पोर्टवरील मदरसनसोबतची ही भागीदारी भारतातील ऑटोमोबाईल लॉजिस्टिक्समध्ये मोठा बदल घडवून आणेल. एपीएसईझेडचे मजबूत पायाभूत नेटवर्क आणि मदरसनचे अनुभव एकत्र येऊन देशभरात वाहन वाहतुकीसाठी एक सुरळीत आणि मजबूत व्यवस्था तयार होईल. हा रोरो टर्मिनल केवळ व्यापार वाढवणार नाही, तर पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम करेल आणि ग्राहक व स्थानिक समुदायांना दीर्घकालीन फायदा देईल."

भागीदारीबाबत भाष्य करताना, मदरसन ग्रुपचे व्हाइस चेअरमन श्री. लक्ष वामन सेहगल म्हणाले,"एपीएसईझेड सोबतची ही भागीदारी आमच्या जागतिक दर्जाच्या लॉजिस्टिक सेवांचा विस्तार करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. दिघी पोर्टवर हा रोरो टर्मिनल विकसित करून आम्ही आमच्या सेवांचा विस्तार करत आहोत आणि आमच्या ओईएम भागीदारांसाठी कार्यक्षमता वाढवणारा आणि खर्च कमी करणारा एक महत्त्वाचा सुविधा प्रकल्प उभारत आहोत. या सहकार्यामुळे भारताची ऑटोमोबाईल पुरवठा साखळी आणखी मजबूत होईल आणि ग्राहकांना थेट फायदा देईल."

नवीन रोरो (रोल-ऑन/रोल-ऑफ) टर्मिनलमध्ये पूर्णपणे अत्याधुनिक पायाभूत सुविधा असतील. येथे तयार वाहनांच्या (पूर्ण झालेली वाहने) लॉजिस्टिकची सर्व कामे एकाच ठिकाणी पार पडतील, ज्यामुळे प्रमुख ऑटोमोबाईल ओईएम कंपन्यांसाठी ऑपरेशन्स अधिक सोपे होतील. एसएएमआरएक्स या टर्मिनलमध्ये गुंतवणूक करून आपली सेवा अधिक सुसंगत करणार असून ग्राहकांना 360-डिग्री कार्गो ट्रॅकिंग आणि पूर्ण लॉजिस्टिक समाधान देणार आहे.

ही सुविधा खालीलप्रमाणे अतिरिक्त (वॅल्यू-ऍडेड) सेवा पुरवेल:

• सिंगल-विंडो रोरो ऑपरेशन्स – यार्ड व्यवस्थापन, पीडीआय, चार्जिंग, स्टोरेज आणि जहाजावर वाहन चढवणे अशी सर्व कामे एकाच ठिकाणी, सुरळीत हाताळल्या जातात.
• एआय-आधारित यार्ड ऑप्टिमायझेशन – वाहनांची थांबण्याची वेळ जवळजवळ शून्य होते आणि वाहनांचे थेट ट्रॅकिंग करता येते
• महाराष्ट्रातील ऑटो बेल्टसाठी सर्वात जलद वाहतूक मार्ग – NH-66 मार्गे ओईएम वाहनांची तात्काळ हलवाहलव करते.
• रोरो-रेडी जेट्टी (1.3 किमी) इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा– संरक्षित पाण्यामुळे वर्षभर कोणत्याही हवामानात सुरळीत कामकाज सुनिश्चित करते.
• ईव्ही रेडी लॉजिस्टिक्स हब – पुढील पिढीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्यातीसाठी सक्षम सुविधा.
• ओईएम - इंटिग्रेटेड डॅशबोर्ड्स – लोड प्लॅनिंग आणि वाहनांच्या लाईव्ह ट्रॅकिंगसाठी सुविधा.

दिघी पोर्ट का?

पश्चिम किनाऱ्यावर धोरणात्मक ठिकाणी असलेले दिघी पोर्ट महाराष्ट्राच्या अंतर्गत औद्योगिक भागांसाठी एक महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. येथे बंद गोडाऊन, टँक फार्म आणि खुले स्टॉकयार्ड उपलब्ध आहेत, जे विविध वस्तू सुरक्षितरीत्या साठवण्यासाठी वापरले जातात. थेट जहाज थांबवण्याची सुविधा आणि उत्कृष्ट रस्ते संपर्कामुळे हे बंदर तेल, रसायन, कंटेनर आणि मोठ्या प्रमाणातील मालवाहतूक सहजपणे हाताळू शकते. रोरो ऑपरेशन्समध्ये पोर्टचा विस्तार एपीएसईझेडच्या भविष्यासाठी तयार लॉजिस्टिक हब तयार करण्याच्या दृष्टीकोनात महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

भारताची सर्वात मोठी इंटिग्रेटेड पोर्ट्स व लॉजिस्टिक्स कंपनी एपीएसईझेड, दिघी पोर्टच्या मजबूत कामगिरीमुळे देशभर आपले नेटवर्क अधिक बळकट करत आहे. हा उपक्रम एपीएसईझेडच्या जागतिक दर्जाच्या पोर्ट सुविधांचा विकास, शाश्वत विकास आणि भारत तसेच जागतिक भागीदारांसाठी सुरळीत व्यापार- सुविधा देण्याच्या वचनबद्धतेला अधिक मजबूत करतो.

एपीएसईझेड बद्दल

एपीएसईझेड, जागतिक स्तरावर विविधीकृत अदानी ग्रुपचा एक भाग, एक आघाडीची एकात्मिक वाहतूक सेवा प्रदाता कंपनी आहे. ही कंपनी कार्गो ओरिजिनेशन पासून (आंतरराष्ट्रीय फ्रीट नेटवर्क) पोर्ट हँडलिंग, रेल्वे वाहतूक, मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक पार्क्स, गोदाम व्यवस्थापन, आणि रस्ते वाहतुकीपासून ते ग्राहकांना अंतिम वितरणापर्यंत सर्व सेवा देते. या संपूर्ण “शोर-टू-डोअर” क्षमतेला अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा आणि एआय-आधारित ऑप्टिमायझेशन समर्थन देतात, ज्यामुळे एपीएसईझेड भारतातील एक प्रमुख एकात्मिक लॉजिस्टिक सोल्यूशन्स प्रदाता म्हणून ओळखली जाते.

कंपनी भारताच्या पश्चिम, दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावरील 15 धोरणात्मक ठिकाणी पोर्ट्स आणि टर्मिनल्स चालवते, 127 जलवाहनांची विविध नौदल, 12 मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक पार्क्स, 3.1 मिलियन चौ.फु. गोदामे आणि 25,000 हून अधिक ट्रक आपल्या प्लॅटफॉर्मवर चालवते. यामुळे किनारपट्टी तसेच अंतर्गत भागातून मोठ्या प्रमाणावर कार्गो हाताळण्याची क्षमता एपीएसईझेडकडे उपलब्ध आहे. 

सध्या एपीएसईझेडची वार्षिक कार्गो हाताळण्याची क्षमता 633 दशलक्ष टन आहे आणि भारताच्या एकूण पोर्ट वॉल्यूमच्या सुमारे 28% हिस्सा कंपनीकडे आहे. कंपनी 2030 पर्यंत 1 अब्ज टन कार्गो हाताळण्याचे लक्ष्य ठेवते. 2025 च्या एस अँड पी ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंटमध्ये जागतिक स्तरावरील टॉप 5% वाहतूक आणि वाहतूक पायाभूत सुविधा कंपन्यांमध्ये एपीएसईझेडला मान्यता मिळालेली आहे (जागतिक स्तरावर 95व्या टक्केवारीत), तसेच कंपनीच्या पाच पोर्ट्सना वर्ल्ड बँकेच्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2024 मध्ये स्थान मिळाले आहे. एपीएसईझेडच्या कार्यक्षमता, उत्कृष्ट ऑपरेशन आणि एकात्मिक क्षमतांमुळे जागतिक व्यापार सहजतेने शक्य होतो.

Post a Comment

0 Comments