Business

Header Ads

डि बियर्स ग्रुपने स्वतःवर प्रेम करणाऱ्या महिलांसाठी‘इंटेन्शन पेंडंट्स’सह लिहिला हिरेजडित नवा अध्याय: स्वतःचा मार्ग घडवणाऱ्या महिलांसाठी नैसर्गिक हिरे बनतात आता ‘इंटेन्शन’ची खऱ्या अर्थाने झळाळती अभिव्यक्ती

राष्ट्रिय :  डि बियर्स ग्रुपने ‘द इंटेन्शन पेंडंट’ कलेक्शन लाँच करत आधुनिक इंटेन्शन-सेटिंगच्या ट्रेंडला एक नवं रूप दिलं आहे. या कलेक्शनमध्ये नैसर्गिक हिरे हे महिलांच्या उद्दिष्टांची आणि स्वतःच्या शक्तीची सुंदर, जवळची अभिव्यक्ती ठरतात. शांतपणे, पण जाणतेपणाने आपल्या जीवनातील टप्पे साजरे करणाऱ्या महिलांसाठी तयार केलेलं हे हाय-ग्लॅमर कलेक्शन अर्थ, भावना आणि आत्मविश्वासावर आधारलेली ‘सेल्फ-गिफ्टिंग’ची नवी भाषा उलगडतं. हा लॉन्च एका मोठ्या सांस्कृतिक बदलाकडेही निर्देश करतो—जिथे यशाची व्याख्या बाहेरून नव्हे तर स्वतःच्या मनातून ठरते, आणि लक्झरी ही केवळ वस्तू न राहता स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचं एक खोल, वैयक्तिक हस्ताक्षर बनते.

Gen Z आणि मिलेनियल्ससाठी मॅनिफेस्टेशन, व्हिजन बोर्डिंग आणि स्क्रिप्टिंग ड्रीम्स या गोष्टी आता ट्रेंड नसून त्यांच्या दैनंदिन जीवनातील मुख्य रिच्युअल बनल्या आहेत. इंटेन्शन-सेटिंग हे स्वतःला सक्षम करण्याचं रोजचं पाऊल ठरलं आहे. ही भावना पकडत डि बियर्स ग्रुपने एक कॅम्पेन सुरू केले आहे. ज्यात एक तरुणी स्वतःचा व्हिजन बोर्ड तयार करताना, स्वतःच्या अंतरंगाशी पुन्हा जोडली जाते. तिच्या या शांत क्षणांमध्ये, आत्मशोधाच्या प्रवासात, हे पेंडंट तिचा सतत सोबत राहणारा साथीदार बनतो.

“आजच्या महिला दैनंदिन इंटेन्शन्सद्वारे स्वतःचा उत्सव साजरा करण्याची निवड करत आहेत. ‘इंटेन्शन पेंडंट्स’ हे नैसर्गिक हिऱ्यांच्या असामान्य वारशातून प्रेरणा घेत, या बदलत्या संस्कृतीचा सन्मान करतात,” असे टोरंज मेहता, उपाध्यक्ष (मार्केटिंग), डि बियर्स ग्रुप इंडिया यांनी सांगितले. “नैसर्गिक हिऱ्यांच्या विलक्षण परंपरेवर आधारित हे कलेक्शन दागिन्यांना वैयक्तिक प्रगतीचे चिन्ह मानण्याच्या वाढत्या प्रवृत्तीचं प्रतीक आहे. या कलेक्शनमधील प्रत्येक पेंडंट स्त्रीच्या तिच्या आतल्या निर्धाराचा आणि तिच्या भविष्यासाठी केलेल्या वचनांचा एक शांत, नाजूक स्मरण म्हणून काम करते.

या लॉन्चला प्रिंट, टेलिव्हिजन, रेडिओ, सिनेमा, आउटडोअर, डिजिटल आणि सोशल मीडिया अशा सर्व माध्यमांमध्ये विस्तारलेल्या व्यापक ३६०° कॅम्पेनचा पाठिंबा आहे. बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तीं—तमन्ना भाटिया , अथिया शेट्टी आणि सानिया मिर्झा—यांनी हे पेंडंट घालून स्वतःचे पर्सनल व्हिजन बोर्ड्स तयार करून शेअर केले आहेत, ज्यामुळे या कलेक्शनची खरी भावना आणि प्रेरणादायी संदेश आणखी प्रभावीपणे पुढे गेला आहे.

प्रत्येक इंटेन्शन पेंडंटमध्ये असलेला नैसर्गिक हिऱ्या अब्जावधी वर्षांत घडलेला—निसर्गाने संयमाने आकार दिलेला—एक शाश्वत सातत्याचा संदेश आजच्या क्षणात आणतो. काळाच्या शक्तींनी परिष्कृत झालेला हा हिरा, तग धरण्याचा आणि तेजस्वीपणाचा अढळ प्रतीक बनतो. आकाशीय आकारांपासून आणि वैयक्तिक उर्जेपासून प्रेरित या डिझाइनमध्ये, निसर्गाच्या हृदयातून तिच्या आयुष्यापर्यंत येणाऱ्या या प्रवासाला आधुनिक, परिधान करण्याजोगं रूप दिलं आहे. हृदयाजवळ परिधान केलेला हा पेंडंट तिचा वैयक्तिक टचस्टोन बनतो—तिच्या मनातील इंटेन्शन, आतली शक्ती आणि ती घडवत असलेल्या जीवनप्रवासाचं नाजूक, पण सतत जाणवत राहणारं प्रतिबिंब.

इंटेन्शन पेंडंट कलेक्शन हे डि बियर्सच्या जागतिक ‘सेल्फ-गिफ्टिंग’ फोकसला पुढे नेणारं पाऊल आहे—जिथे स्वतःवरील प्रेमाची अभिव्यक्ती सतत नवे रूप घेत आहे. जगभरात नैसर्गिक हिरे आता वाढत्या प्रमाणात स्वतंत्र निर्णय, वैयक्तिक टप्पे, आणि अंतरंगातील बदलाचे क्षण चिन्हांकित करण्यासाठी निवडले जात आहेत. यामुळे पारंपरिक ‘गिफ्टिंग’च्या चौकटीपलीकडे जाऊन, व्यक्तिमत्त्व आणि उद्देश प्रतिबिंबित करणाऱ्या दागिन्यांची नवी प्रवृत्ती आकार घेत असल्याचं स्पष्ट दिसतं.

वर्षअखेरच्या आत्मचिंतनाच्या काळाच्या आधी सादर केलेलं हे कलेक्शन — नवी सुरुवात, स्पष्टता आणि इंटेन्शन यांना समर्पित असलेल्या हंगामाशी सहज जुळून येतं. इंटेन्शन पेंडंट हे कुठलं मोठं स्टेटमेंट पीस नाही; ते एक वैयक्तिक प्रतीक आहे—जे स्त्रीच्या शांत, पण ठाम प्रवासात तिच्यासोबत राहते, जशी ती यशाची मोजमाप स्वतःच्या मार्गाने ठरवते.

‘इंटेन्शन पेंडंट कलेक्शन’ नैसर्गिक हिऱ्यांच्या शाश्वत सौंदर्यातून आणि वैयक्तिक अभिव्यक्तीतून स्वतःच्या क्षमतेची कोमल जाणीव करून देतं. डि बियर्स तुम्हाला निसर्गाच्या अंतरंगातून वाहणाऱ्या त्या कॉस्मिक एनर्जीशी जोडण्यासाठी आमंत्रित करतं—जी प्रवाह तिच्या हृदयातून सरळ तुमच्यापर्यंत पोहोचतो.

अधिक माहितीसाठी आणि स्टोअरच्या तपशीलांसाठी भेट द्या:
 www.adiamondisforever.com.

Post a Comment

0 Comments