Business

Header Ads

एअरटेलचा जागतिक स्तरावर ऐतिहासिक उपक्रम; एअरटेलकडून ३६ कोटी भारतीय ग्राहकांना अडोबी एक्सप्रेस प्रीमियम मोफत मिळणार !

नवी दिल्ली, जानेवारी, २०२६ : भारताची आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारती एअरटेलने आता आपल्या ग्राहकांसाठी खास सोय उपलब्ध करुन दिली आहे. एअरटेलने ३६ कोटी भारतीय ग्राहकांसाठी अडोबी एक्सप्रेस हे अत्याधुनिक एप आता उपलब्ध केले आहे. अडोबी एप्लिकेशन हे वापरण्यासाठी अतिशय सोप्पे आहे. शिवाय या एप्लिकेशनच्या मदतीने डिजीटल कामही जलदरित्या पूर्ण होते. त्यामुळे सोशल मिडीयाशी संबंधित कोणतेही डिजीटल काम करणे आता सहज शक्य होणार आहे.  

भारती एअरटेल आणि अडोबी यांच्यात पहिल्यांदाच या विषयासंदर्भातील ऐतिहासिक करार झाला आहे. या भागीदारीतून एअरटेल आपल्या सर्व ग्राहृकांना अडोबी एक्सप्रेस प्रीमियमची सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे. याद्वारे एअरटेलचे ग्राहक सोशल मिडीया पोस्ट, मार्केटिंग संबंधित डिजीटल काम, छोटे व्हिडिओ आणि इतर कोणतेही डिझाइन अत्यंत कमी श्रमात करु शकतील. या एप्लिकेशच्या मदतीने होणारी सर्व कामे उच्च दर्ज्याची असतील. या एप्लिकेशनच्या सबस्किप्शनची मूळ किंमत चार हजार रुपये आहे. मात्र एअरटेलच्या ग्राहकांसाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन वर्षभरासाठी मोफत असेल. विविध सोयीसुविधांच्या उपलब्धतेमुळे डिझायनिंगचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या ग्राहकांनाही आपल्या कल्पकतेच्या बळावर व्यावसायिक दर्ज्याचे कंटेट तयार करता येतील. 

अडोबी एक्सप्रेस प्रीमियमचे हे विशेष सबस्क्रिप्शन एअरटेलच्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. मोबाईल, वाय-फाय आणि डीटीएच सेवा वापरणा-या ग्राहकांना या एप्लिकेशनचा वापर करता येईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना फक्त एअरटेल थँक्स एपवर लॉग-इन करुन या सर्व सोयीसुविधांला लाभ घेता येईल. हे सबस्क्रिप्शन सुरु करण्यासाठी कोणत्याही क्रेडिट कार्डची आवश्यकता नाही. 

या भागीदारीबद्दल भारती एअरटेलचे कनेक्टेड होम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मार्केटिंग संचालक सिद्धार्थ शर्मा यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘अत्याधुनिक एआय साधनांच्या माध्यमातून कोट्यावधी भारतीयांना सर्जनशीलता आणि नवकल्पनांसाठी सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वतःचा पहिल्यांदाच रिझ्युम बनवणारा विद्यार्थी असो वा आपल्या व्यवसायाचे पोस्टर डिझाइन करणारा छोटा उद्योजक किंवा फॉलोअर्ससाठी व्हिडिओ एडीट करणारा एखादा क्रिएटर, या एअरटेलच्या सर्व ग्राहकांना स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक साधने पुरवणे हा आमचा उद्देश आहे. अडोबी एक्सप्रेसमुळे आता जागतिक दर्ज्याची सर्जनशील साधने ही केवळ चैनीची वस्तू म्हणून मर्यादित न राहता प्रत्येक भारतीयासाठी सहज उपलब्ध होणारे वास्तव ठरत आहे.’’

अडोबीचे डिजीटल मीडिया विभागाचे अध्यक्ष डेव्हिड वाधवानी यांनाही या भागीदारीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘आम्ही अडोबी एक्सप्रेस या अत्यंत सोप्या आणि अष्टपैलू एप्लिकेशनच्या माध्यमातून प्रत्येकाला आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी सक्षम करण्यास कटिबद्ध आहोत. एअरटेलसोबत भागीदारी करुन आम्ही भारतातील लाखो लोकांना अडोबी एक्सप्रेस प्रीमियमची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत. या उपक्रमामुळे भारतातील गतिमान क्रिएटर इकॉनॉमीला (निर्मिती क्षेत्राला) मोठी चालना मिळेल. लोकांना आपले करिअर घडवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा आपल्या आवडीच्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी उच्च दर्ज्याचे कंटेंट आता सहजरित्या तयार करता येतील.’’ 

अडोबी एक्सप्रेस प्रीमियम हे अडोबीची सर्वोत्तम वैशिष्ट्ये थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवते. या सबस्क्रिप्शनमध्ये हजारो प्रोफेशनल डिझाईन टेम्पलेट्सचा समावेश आहे. हे सर्व टेम्प्लेट्स भारतीय सण-उत्सव, लग्नसभारंघ आणि स्थानिक व्यवसायांचा गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत. यामध्ये बॅकग्राउंड काढणे, स्वतःच्या कल्पनेनुसार इमेज तयार करणे आणि एका क्लिकवर व्हिडिओ एडिटिंग करणे यांसारखे अत्याधुनिक एआय फीचर्स मिळतात. यामध्ये ३० हजारांहून अधिक प्रोफेशनल फॉन्ट्स, १०० जीबी क्लाउड स्टोरेज, प्रिमियम स्ट़क इमेजेस आणि ऑटो-कॅप्शन तसेच इन्संट रिझाईज यांसारख्या प्रगत सुविधा उपलब्ध आहेत. तयार केलेल्या कंटेंटवर कोणताही वॉटरमार्क नसेल आणि ग्राहक आपली कामे विविध उपकरणांवरुन सहजपणे सिंक करु शकतील. 

अडोबी एक्सप्रेस इंग्रजी भाषेसह हिंदी, तामिळ आणि बंगाली या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे. या सोयीमुळे ग्राहकांना आता त्यांच्या मातृभाषेतही सर्व फिचर्स वापरता येतील. सणासुदीची शुभेच्छापत्रे, लग्नाची निमंत्रणे, स्थानिक दुकानांसाठी जाहिराती, व्हॉट्सअप स्टेटरचे अपडेट्स हे सर्व आता अडोबी एक्सप्रेसच्या मदतीने सामान्य माणसालाही तयार करता येईल. 

एअरटेलसोबत अडोबी एक्सप्रेस प्रीमियम वापरल्यास होणारे फायदे - 
या भागीदारीमुळे आता एअरटेलच्या सर्व ग्राहकांना अडोबी एक्सप्रेस प्रीमियमच्या सामर्थ्यशाली जनरेटीव्ह एआय या तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल. या आधुनिक सुविधेमुळे ग्राहकांना त्यांचे काम अधिक वेगाने पूर्ण करता येईल, त्यांच्या कामाचा दर्जा वृद्धिंगत होईल. आजच्या गजबजलेल्या डिजिटल जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणे शक्य होईल. ग्राहक खालील विविध माध्यमांतून आपल्या 

कल्पकतेला अधिक प्रभावीपणे मांडू शकतील :

• क्रिएटर्स आणि इन्फ्लूएन्सर्स : कंटेट क्रिएटर आणि इन्फ्लूएन्सर्ससाठी हे व्यासपीठ अत्यंत फायदेशीर आहे. कंटेट क्रिएटर्स आणि इनफ्लूएन्सर्स या दोघांनाही आपल्या पेहरावापासून ते भाषेच्या लहेजापर्यंत आपली स्वतंत्र ओळख दर्शवणारा कंटेट झटपट तयार करता येईल. या सुविधेमुळे त्यांच्या ऑनलाईन अभिव्यक्तीला एक नवे रुप मिळेल. यातील सोपी व्हिडिओ एडिटिंग साधने आणि एआय इफेक्ट्समुळे सोशल मीडियावरील रिल्सपासून ते यूट्युब थंबनेल्सपर्यंत सर्व काही अत्यंत प्रभावीपणे तयार करता येईल. यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय उच्च दर्ज्याचा व्हायरल होण्यालायक कंटेट बनवणे हे आता प्रत्येक क्रिएटर्ससाठी सुलभ आणि सोप्पे झाले आहे. 

• ग्राहक: सामान्य ग्राहकांसाठी अडोबी एक्सप्रेस हे अत्यंत उपयुक्त साधन आहे. 
कारण याद्वारे ते आपल्या मित्रपरिवाराशी आणि नातेवाईकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाऊ शकतात. अडोबी एक्सप्रेसमध्ये प्रोफेशनल डिझाइन्सचा संग्रह मोठा आहे. या संग्रहांचा वापर करुन ग्राहक सण-उत्सवांच्या शुभेच्छा देऊ शकतात, गुडमॉर्निंगच्या शुभेच्छा देण्यासाठी आकर्षक संदेश तयार करु शकतात. यात वैयक्तिक निमंत्रण पत्रिकाही सहजरित्या तयार होते. यामुळे दैनंदिन संवाद अधिक कल्पक आणि प्रभावी होण्यास मदत होते.  

• विद्यार्थी : विद्यार्थ्यांना या एप्लिकेशनच्या वापराने अतिशय प्रभावी प्रकल्प सादर करता येतील. दर्जेदार सादरीकरणे आणि स्वतःचा आकर्षक पोर्टफोलिओही तयार करता येईल. याद्वारे केवळ नवीन गोष्टींची निर्मितीच नव्हे तर डिजीटल कम्युनिकेशनसारखी आजच्या काळातील महत्त्वाची कौशल्येही आत्मसात करता येतील. विद्यार्थी दशेतील ग्राहकांना त्यांच्या शैक्षणिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करता येईल.  

लहान व्यावसायिक आणि उद्योजक : आपला स्वतःचा व्यवसाय किंवा प्रोफेशनल ब्रँण्ड प्रस्थापित करु इच्छिणा-या लघुउद्योजकांना आता सोशल मिडीयावर जाहिराती तयार करणे आता सहज शक्य आहे. यासह मार्केटिंग पोस्टर्स, क्यूआर कोड आणि लोगो यांसारख्या गोष्टीही काही मिनिटांत तयार करता येतील. या सुविधेमुळे वेळेची बचत होईल. डिझाईनिंगचा खर्च कमी होईल. 

मार्केटर्स : मार्केटिंग क्षेत्रातील व्यावसायिक आणि जाहिरातदारांसाठी हे साधन अत्यंत उपयुक्त ठरेल. मार्केटर्स आणि जाहिरात क्षेत्रातील व्यावसायिकांना अडोबी एक्सप्रेसच्या मदतीने आपल्या मूळ ब्रँण्डच्या ओळखीशी सुसंगत आणि आकर्षक दृश्य सामग्री आणि प्रभावी मोहिमा आता सहज आखता येतील. या जाहिराती, मोहिमांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि स्थानिक वातावरणाचे सुयोग्य प्रतिबिंब दिसेल. यामुळे नेहमीच्या साच्यातील तसेच सामान्य वाटणा-या डिझाईन्स यापलीकडे जाऊन ग्राहकांना आकर्षित करणारे आणि स्वतःचे वेगळेपण सिद्ध करणारे दर्जेदार व्यावसायिक साहित्य तयार करणे आता सोप्पे होईल.   

*ग्राहकांना मिळणारा लाभ हा सध्याच्या सबस्क्रिप्शनच्या आधारे केवळ एका वर्षाकरिता असेल. नियम व अटी लागू.

Post a Comment

0 Comments