नागपुर : विदर्भ आता फक्त शक्यतांचा प्रदेश राहिलेला नाही, तर भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी नवीन केंद्र बनण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. अदाणी ग्रुपचे संचालक जीत अदाणी यांनी अॅडव्हांटेज विदर्भ 2026 कार्यक्रमात बोलताना सांगितले, “मजबूत नेतृत्व, आधुनिक पायाभूत सुविधा आणि उद्योग–सरकार यांचा सहयोग यामुळे विदर्भ आपल्या ऐतिहासिक वारशाचे रूपांतर आर्थिक आणि औद्योगिक सामर्थ्यात करत आहे.”
जीत अदाणी म्हणाले, “विदर्भ हे नावच त्याची ओळख आणि सामर्थ्य दाखवते. हा प्रदेश प्राचीन काळापासून ज्ञान, संस्कृती आणि धैर्याचा केंद्र राहिला आहे. नागपूर, जे कधी मध्य प्रांतांची राजधानी होती, आज देशाच्या भौगोलिक केंद्रावर असून लॉजिस्टिक्स, ऊर्जा, विमान वाहतूक आणि तंत्रज्ञानाचा एक उदयोन्मुख केंद्र बनला आहे.”त्यांनी असेही सांगितले की, “विदर्भाचे हे परिवर्तन अचानक झालेले नाहीत, तर ते अनेक वर्षांच्या धोरणात्मक विचारसरणी आणि नेतृत्वाचे परिणाम आहेत.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले, आणि म्हटले की पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि संतुलित प्रादेशिक विकासावर त्यांचे लक्ष केंद्रित केल्याने विदर्भ गुंतवणुकीसाठी आकर्षक बनला आहे. जीत अदाणी म्हणाले, “आज विदर्भ फक्त त्याच्या क्षमतेसाठीच नाही तर त्याच्या प्रगतीसाठी ओळखला जातो.”
अदानी ग्रुपच्या भूमिकेबद्दल बोलताना, जीत अदानी यांनी स्पष्ट केले की, अदाणी ग्रुपची विदर्भमधील उपस्थिती फक्त व्यवहारासाठी नाही, तर ही दीर्घकालीन आणि पिढ्यान्पिढ्या चालणारी वचनबद्धता आहे. तिरोड़ा येथील 3,300 मेगावाट सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट आणि बुटीबोरी येथील 600 मेगावाट प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाने महाराष्ट्राची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे. 25 वर्षांच्या करारामुळे, सौर आणि थर्मल ऊर्जेच्या संयोजनातून 6,600 मेगावाट विश्वसनीय वीज उपलब्ध होत आहे, जो उद्योग, शहर आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
विदर्भाच्या औद्योगिक भविष्याला आकार देणाऱ्या प्रकल्पांमध्ये, त्यांनी कळमेश्वर मधील लिंगा येथील प्रस्तावित 70,000 कोटी रुपयांच्या इंटीग्रेटेड कोल गॅसिफिकेशन आणि डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह्ज कॉम्प्लेक्सला सर्वात महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे 30,000 थेट रोजगार निर्माण होतील आणि नागपूरला स्वच्छ ऊर्जा आणि प्रगत रासायनिक उद्योगांसाठी जागतिक नकाशावर स्थान मिळेल.
जीत अदानी म्हणाले की, हा प्रकल्प आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मजबूत पाऊल आहे. त्यांनी गोंडखैरी भूमिगत खाण प्रकल्पाचे जबाबदार आणि पर्यावरणपूरक खाणकामाचे उदाहरण म्हणून वर्णन केले, जिथे किमान जमिनीचा वापर, शून्य विस्थापन आणि जलसंवर्धनाला प्राधान्य दिले जाते. बोरखेडी येथे 75 एकर आयसीडी आणि महाराष्ट्रातील सीमा तपासणी नाक्यांच्या अधिग्रहणामुळे विदर्भ एक मजबूत लॉजिस्टिक्स गेटवे बनत आहे. मिहान येथील विमान एमआरओ सुविधेच्या विस्तारामुळे नागपूर वेगाने आंतरराष्ट्रीय विमान देखभाल केंद्र म्हणून उदयास येत आहे. सामाजिक विकासावर भर देताना त्यांनी सांगितले, "अदानी फाउंडेशन विदर्भात आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, स्वच्छ ऊर्जा आणि क्रीडा क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहे. विकास तेव्हाच अर्थपूर्ण ठरतो जेव्हा तो समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतो."

0 Comments