नागपूर : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) च्या मार्गदर्शनाखाली, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE), इतर बाजार पायाभूत संस्था (MIIs) आणि AMFI यांच्या सहकार्याने 'ॲडव्हान्टेज विदर्भ' या प्रदर्शनात 'भारतीय रोखे बाजार' (Indian Securities Market) दालन उभारण्यात आले होते. नागपुरातील आरटीएमनू (RTMNU) कॅम्पस मैदानावर ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हे प्रदर्शन पार पडले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी, आणि राज्याचे महसूल व नागपूरचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या महाकुंभात २० हून अधिक देशांतील प्रतिनिधी, २०० हून अधिक उद्योग तज्ज्ञ आणि २५ पेक्षा जास्त ज्ञानसत्रे आयोजित करण्यात आली होती.
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) राज्यमंत्री श्रीमती शोभा करंदलाजे यांनी या दालनाला भेट दिली. यावेळी सेबीचे कार्यकारी संचालक श्री. जीवन सोनपरोटे, एनएसईचे मुख्य नियामक अधिकारी श्री. पीयूष चौरसिया आणि इतर वरिष्ठ प्रतिनिधींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एमएसएमई (MSMEs) साठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये रोखे बाजारातून निधी उभारणीची प्रक्रिया आणि विविध नियामक अनुपालनांची माहिती देण्यात आली.
गुंतवणूकदार जागृती आणि सुरक्षा: सेबीचे कार्यकारी संचालक श्री. जीवन सोनपरोटे आणि एनएसईचे श्री. पीयूष चौरसिया यांनी गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. श्री. सोनपरोटे यांनी जनतेशी संवाद साधताना रोखे बाजारातील संधी आणि जोखीम यावर प्रकाश टाकला. फसवणूक आणि घोटाळ्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी 'SEBI Check' या सुविधेबद्दल माहिती दिली, ज्याद्वारे गुंतवणूकदार नोंदणीकृत मध्यस्थांचे UPI आयडी आणि बँक तपशील सत्यापित करू शकतात.
या दालनाचे उद्घाटन श्री. अविष्कार नाईक (वरिष्ठ उपाध्यक्ष, NSE), श्री. कृष्णन अय्यर (वरिष्ठ उपाध्यक्ष, NSE), श्रीमती बाला कुमारी (उपमहाव्यवस्थापक, SEBI), श्री. राहुल केलापुरे (सहायक महाव्यवस्थापक, SEBI) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.
दालनाची वैशिष्ट्ये :
'गुंतवणूकदार जागृती' आणि 'सेबी विरुद्ध स्कॅम' या संकल्पनेवर आधारित या दालनाचा मुख्य उद्देश गुंतवणूकदारांना योग्य आर्थिक उत्पादनांची माहिती देऊन सक्षम करणे हा होता. यामध्ये 'स्पिन द व्हील' आणि 'सापशिडी' यांसारख्या खेळांच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने गुंतवणूक शिक्षण देण्यात आले. तसेच, वैयक्तिक संवाद आणि तक्रार निवारण कक्ष देखील उपलब्ध होते.
महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची वाढती संख्या:
अव्वल स्थान: महाराष्ट्रात १.९७ कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार असून, देशातील एकूण गुंतवणूकदारांपैकी १५.८% वाटा महाराष्ट्राचा आहे.
नवीन नोंदणी : २०२५ मध्ये महाराष्ट्रात १८.२ लाख नवीन गुंतवणूकदारांची भर पडली.
प्रमुख जिल्हे: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांतून ६०% नवीन नोंदणी झाली आहे.
महिला सहभाग : महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांमध्ये महिलांचे प्रमाण २८.८% आहे, जे राष्ट्रीय सरासरीच्या (२४.८%) तुलनेत लक्षणीय आहे.
लिस्टिंग : २०२५ मध्ये महाराष्ट्रातील २९ कंपन्यांनी मुख्य बोर्डावर ४६,५०० कोटी रुपये, तर २७ लघु उद्योगांनी (SME) १,६०० कोटी रुपये बाजारातून उभे केले.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) बद्दल :
एनएसई (NSE) ही भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्रणाली सुरू करणारी संस्था आहे. १९९४ मध्ये कार्यान्वित झालेली ही संस्था १९९५ पासून भारताची सर्वात मोठी स्टॉक एक्सचेंज आहे. २०२४ च्या आकडेवारीनुसार, व्यवहार संख्येच्या बाबतीत एनएसई ही जगातील सर्वात मोठी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आणि इक्विटी सेगमेंटमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची एक्सचेंज ठरली आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या : www.nseindia.com
मीडिया संपर्कासाठी: cc@nse.co.in

0 Comments