Business

Header Ads

टुईंग, किफायतशीर फूड ऍप, आता नागपूरमध्ये उपलब्ध !

थोडक्यात पण महत्वाचे 

• फूड डिलीव्हरी ऍप आता भारतामधील 6 शहरांमध्ये सुरू
• रेस्टॉरंटच्या मेनूतील किमतीइतके किंवा त्यापेक्षा कमी दर देण्याची हमी 
• सर्व ऑर्डर्सवर पॅकेजिंग शुल्क नाही आणि प्लॅटफॉर्म फी शून्य

नागपूर, 12 फेब्रुवारी 2026: टुईंग, एक नवीन किफायतशीर फूड डिलिव्हरी अॅप, ने आज नागपूर शहरात आपल्या सुरुवातीची घोषणा केली. या सुरुवातीपासून टुईंग आता देशातील 6 उदयोन्मुख शहरांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये पुणे, आग्रा, वडोदरा, गुवाहाटी आणि नाशिक यांचा समावेश आहे. 2025 च्या दुसऱ्या सहामाहीत पुण्यात पहिल्यांदाच सुरू झालेल्या या अॅपने आता नागपूरमध्येही सर्व्हिस सुरू केली असून शहरातील आघाडीचे रेस्टॉरंट्स आधीच प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध आहेत.

टुईंग सर्वात कमी दरांची हमी देत असून रेस्टॉरंटच्या टेबल मेनूतील किमतीइतके किंवा त्यापेक्षा कमी दर देण्याची खात्री देते. याशिवाय कोणतेही पॅकेजिंग शुल्क किंवा प्लॅटफॉर्म फी आकारली जात नाही. यूजर बिर्याणी, बर्गर आणि बाउल्ससह विविध पदार्थ केवळ रु. 99 पेक्षा कमी किमतीत ऑर्डर करू शकतात.

टुईंग हे फूड डिलिव्हरीला केवळ कधीतरी होणारी चैनीची गोष्ट न मानता रोजचा पर्याय बनवू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी, नोकरीची सुरुवात करणाऱ्या तरुणांसाठी आणि किमतीबाबत जागरूक असलेल्या Gen Z साठी तयार करण्यात आले आहे. दैनंदिन परवडणाऱ्या किमतींवर लक्ष केंद्रित करून टुईंग आपल्या यूजरला अतुलनीय मूल्य आणि विश्वासार्हता सुनिश्चित करते. या अॅपवर नागपूरमधील रामजी’ज फूड प्लाझा, हल्दीराम्स रेस्टॉरंट, बार्बेक्यू सदर, टू ब्रदर्स शावरमा एक्सप्रेस, व्हरायटी फूड्स आणि मुल्लाजी जिल्हा बिर्याणी सेंटर यांसारखी लोकप्रिय रेस्टॉरंट्स उपलब्ध असून नॉर्थ इंडियन, बिर्याणी, चायनीज, चाट आणि कॉन्टिनेंटल (फास्ट फूड) अशा विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे पर्याय दिले आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला सुरुवात झालेल्या या अॅपद्वारे ग्राहक बर्गर, पिझ्झा, मोमोज, बिर्याणी आणि रोल्ससारखे स्थानिक आवडीचे पदार्थ ऑर्डर करू शकतात.  

स्विगी फूड मार्केटप्लेसचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्री. सिद्धार्थ भाकू या विस्ताराबाबत बोलतांना म्हणाले,  “Gen Z, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि किमतीबाबत जागरूक ग्राहकांवर भर देत टुईंग फूड ग्राहकांची एक नवी श्रेणी निर्माण करत आहे आणि आपल्या ग्राहकांना सर्वात कमी दरांची हमी देत आहे. आमच्या विस्तारासाठी नागपूर हे निश्चितपणे पुढचे पाऊल होते. देशातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून नागपूरमधील उत्साही विद्यार्थी वर्ग म्हणजे टुईंग साठी अत्यंत योग्य बाजारपेठ आहे.” 

भारतभर 10 लाखांहून अधिक डाउनलोड्स आणि 4.5 चे उल्लेखनीय रेटिंग मिळवत, टुईंग किफायतशीर फूड डिलिव्हरी क्षेत्रात एक मजबूत पर्याय म्हणून उदयास येताना दिसत आहे. 

Post a Comment

0 Comments