२१ ते ६५ वर्षे वयोगटातील १०० वंचित महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाची किंवा स्तनाच्या कर्करोगाची मोफत तपासणी
नागपुर, जून ८, २०२६ : आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (“एबीएसएलआय”) या भारतातील आघाडीची विविधीकृत वित्तीय सेवा कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटलच्याि आयुर्विमा उपकंपनीने महिलांचे आरोग्य आणि आर्थिक संरक्षणाला पाठबळ देणाऱ्या एका विशेष उपक्रमाद्वारे आपली हर इन्शुरन्स श्रेणी अधिक मजबूत केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, एबीएसएलआय नागपूर परिसरातील १०० वंचित महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या किंवा स्तनाच्या कर्करोग तपासणीला (स्क्रीनिंग) पाठबळ देणार आहे.
या तपासणीमध्ये (स्क्रीनिंग) जागरूकता सत्रे, डॉक्टरांचा सल्ला, शारीरिक तपासणी आणि निदानात्मक चाचण्यां चा समावेश असेल; ज्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेची उपलब्धता सुधारण्यास मदत होईल आणि आजाराचे लवकरात लवकर निदान करण्यास प्रोत्साहन मिळेल. या उपक्रमाच्या माध्यमातून, आर्थिक संरक्षणावरील व्यापक चर्चेसोबतच महिलांच्या कल्याणाचा एक अत्यंत महत्त्वाचा परंतु सहसा कमी प्राधान्य दिला जाणारा पैलू, म्हणजेच आरोग्याची पूर्वतयारी यावर लक्ष केंद्रित करण्याचे एबीएसएलआयचे उद्दिष्ट आहे.
हर इन्शुरन्स ही एबीएसएलआयची महिला-प्रथम विमा श्रेणी आहे, जी महिलांच्या वास्तविक गरजांवरील संशोधन आणि निष्कर्षांवर आधारित आहे. ही श्रेणी जीवन संरक्षण, महिलांशी संबंधित आरोग्य जोखीम, हमी उत्पन्न आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन यांसारखे उपाय एकत्र आणते, जे विविध जीवन टप्पे आणि प्राधान्यक्रमांशी सुसंगत राहण्याची लवचिकता प्रदान करते.
या उपक्रमाला पाठबळ देण्यामागचा एक मुख्य हेतू हर इन्शुरन्स श्रेणी अंतर्गत एबीएसएलआयच्या सुपर टर्म प्लॅनद्वारे दिल्या जाणाऱ्या क्रिटिकल इलनेस रायडरबद्दल (गंभीर आजार रायडर) जागरूकता निर्माण करणे हा आहे. हा क्रिटिकल इलनेस रायडर विशिष्ट तीव्रतेच्या महिला-विशिष्ट कर्करोगांना कव्हर करतो. हर इन्शुरन्स श्रेणी महिलांना त्यांच्या आर्थिक भविष्यासाठी आणि एकंदरीत कल्याणासाठी माहितीपूर्ण व सक्रिय पावले उचलण्यास सक्षम करण्याप्रती एबीएसएलआयची असलेली वचनबद्धता दर्शवते.
या उपक्रमाबाबत मत व्यषक्त करत आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. कमलेश राव म्हणाले, “हर इन्शुरन्सची रचना महिलांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे, ज्यामध्ये आर्थिक संरक्षणासोबतच दीर्घकालीन सुरक्षिततेचा मेळ घालणारे सोल्यूशन्स (उपाय) प्रदान केले जातात. हर इन्शुरन्स अंतर्गत कर्करोग तपासणीला पाठबळ देणे हे केवळ जागरूकतेच्या पलीकडे जाण्याचा आणि आजाराचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान व उपचारांच्या उपलब्धतेद्वारे महिलांच्या आरोग्याच्या पूर्वतयारीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा आमचा हेतू दर्शवते.”
सहा प्रमुख बाजारपेठांमधील एबीएसएलआयच्या संशोधनातून संरक्षणातील एक कायमस्वरूपी तफावत ठळकपणे समोर आली आहे, ज्यामध्ये अनेक महिला स्वतःला विमा उतरवण्याइतपत आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानत नाहीत आणि त्यांच्या आरोग्यासाठी व दीर्घकालीन सुरक्षिततेच्या गरजांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या आयुर्विमा सोल्यूशन्सच्या सुसंगततेवर प्रश्न उपस्थित करतात.
या निष्कर्षांनी महिलांच्या जीवन प्रवासाशी सुसंगत असलेल्या अधिक सोप्या आणि संबंधित विमा सोल्यूशन्स च्या वाढत्या पसंतीकडे देखील अंगुलीनिर्देश केला, ज्याच्या परिणामी हर इन्शुरन्स ची एक समर्पित, महिला-प्रथम श्रेणी म्हणून निर्मिती झाली.
Disclaimer :
Riders/benefits are subject to the policy terms, conditions, definitions and exclusions. For more details on risk factors, terms and conditions, please read the sales brochure carefully before concluding the sale. Super Term Plan is A Non-Linked Non-Participating Life Individual Pure Risk Premium Plan, UIN: 109N153V02.

0 Comments