Business

Header Ads

गुरु'ला म्हणा हॅलो: भारतीय रेस्टॉरंट उद्योगासाठी तयार केलेला स्विगीचा24x7 AI बिझनेस पार्टनर !

थोडक्यात पण महत्त्वाचे

● स्विगीच्या रेस्टॉरंट पार्टनर अॅतपवर 24x7 उपलब्ध असलेला वैयक्तिक AI बिझनेस पार्टनर, जो रेस्टॉरंट मालकांना त्यांच्या पेआउट्सची सखोल माहिती घेण्यास, त्यांच्या मोहिमांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यास, तसेच अॅाड मोहिमा आणि सवलती त्वरित सुरू करण्यास आणि सुधारण्यास सक्षम करतो. 

● हिंदी, कन्नड, तमिळ, आसामी, मराठी, पंजाबी, बंगाली, गुजराती, मल्याळम आणि तेलगूसह 20 हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध. 

नॅशनल, 19 ऑगस्ट 2026 : भारताचे अग्रेसर ऑन-डिमांड सुविधा प्लॅटफॉर्म असलेल्या स्विगीने (Swiggy Ltd, NSE: SWIGGY / BSE: 544285) आज 24x7 AI बिझनेस पार्टनर – 'गुरु' – लाँच करण्याची घोषणा केली, जे विशेषतः त्यांच्या रेस्टॉरंट पार्टनर्ससाठी तयार केलेले प्लॅटफॉर्म इनोव्हेशन आहे. हे अशा प्रकारचे पहिले AI असिस्टंट स्विगीच्या रेस्टॉरंट पार्टनर्सना डेटा-आधारित निर्णय घेण्यास, विक्रीचे प्रमाण वाढवण्यास आणि काही सेकंदात कार्यप्रणालीशी संबंधित प्रश्नांचे निरसन करण्यास सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

 हे सर्व एका सोप्या, संवादात्मक चॅटद्वारे शक्य होते. हा इंटरफेस हिंदी, कन्नड, तमिळ, आसामी, मराठी, पंजाबी, बंगाली, गुजराती, मल्याळम आणि तेलगूसह 20 हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, हे रेस्टॉरंट पार्टनर्सना त्यांच्या जाहिराती आणि सवलती मोहिमा व्यवस्थापित करण्यास, तसेच टॅक्स रिपोर्ट्स आणि पेआउट सारांशांसह त्यांचे पेआउट तपशील सविस्तरपणे पाहण्यास सक्षम करते. 

'गुरु' मुळे, स्विगीच्या रेस्टॉरंट पार्टनर्सना 24x7 AI असिस्टंट मिळाला आहे, जो त्यांना दैनंदिन रेस्टॉरंट व्यवस्थापन सोपे करण्याच्या उद्देशाने विविध कामांमध्ये आणि प्रश्नांमध्ये मदत करू शकतो. रेस्टॉरंट पार्टनर्स 'गुरु'चा वापर करून एकाच चॅट प्रॉम्प्टद्वारे त्यांच्या जाहिरात मोहिमा त्वरित सुरू करू शकतात, त्यांचे पुनरावलोकन करू शकतात आणि त्यामध्ये बदल करू शकतात. 

याव्यतिरिक्त, ते त्यांच्या GMV आणि ऑर्डर्सचे पूर्ण फनेल विश्लेषण मिळवू शकतात, तसेच काय व्यवस्थित काम करत नाही आहे याचा सविस्तर अहवाल आणि ते ठीक करण्यासाठीच्या शिफारसी देखील मिळवू शकतात. 'गुरु' हे विक्री, ऑर्डर्स, AOV आणि 30 हून अधिक इतर महत्त्वाच्या घटकांचे वेळेनुसार सातत्याने मूल्यमापन करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. 

एवढेच नाही. 'गुरु'वरील मेनू इनसाईट्स पार्टनर्सना कॅटेगरी परफॉर्मन्स आणि त्यांच्यासाठी काय उत्तम काम करत आहे याचे विश्लेषण करून नवीन पदार्थ जोडण्याची, त्याचे वर्णन तयार करण्याची आणि सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पदार्थांना हायलाइट करण्याची सुविधा देतात, ज्यामुळे वैयक्तिकृत माहिती मिळते. 

या लाँचबद्दल अधिक माहिती देताना, स्विगी फूड मार्केटप्लेसचे CEO रोहित कपूर म्हणाले, "आज, AI ने व्यवसाय करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल घडवून आणला आहे आणि सर्वच उद्योगांमध्ये कार्यक्षमता वाढवली आहे. 12 हून अधिक वर्षांपासून रेस्टॉरंट्ससोबत भागीदारी करत असल्याने, आमच्या पार्टनर्सना दररोज कराव्या लागणाऱ्या कामांची आणि सततच्या मल्टी-टास्किंगची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. 

त्यांच्या दैनंदिन कामाकाजात AI चा वापर करणे हा आपल्या एकत्र प्रवासातील पुढील नैसर्गिक टप्पा आहे. 'गुरु' सोबत, आम्ही एका सहज-सोप्या, AI-प्रथम असिस्टंटची सुरुवात करत आहोत जो दैनंदिन रेस्टॉरंट व्यवस्थापनाला नवीन व्याख्या देतो; 24x7 सपोर्ट, प्रश्नांचे जलद निरसन आणि कार्यक्षमतेची उपयुक्त माहिती पुरवतो, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होते.”

720 हून अधिक शहरांमध्ये लाँच होणारा 'गुरु' हा 2.7 लाखांपेक्षा जास्त रेस्टॉरंट्सना फायदेशीर ठरेल, ज्यामध्ये स्थानिक छोट्या किचनपासून ते अनेक आऊटलेट्स असलेल्या मोठ्या रेस्टॉरंट्सचा समावेश आहे. हा नवीन उपक्रम रेस्टॉरंट पार्टनर्सना त्यांचे कामकाज सुलभ करण्यासाठी, नफा वाढवण्यासाठी आणि रिअल-टाईम माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठीची स्विगीची सततची वचनबद्धता दर्शवतो.

Post a Comment

0 Comments