Business

Header Ads

क्रॉम्प्टनने नवीन मास्टर ब्रँड ओळख सादर केली; प्रीमियम उत्पादनांचा विस्तार केला

थोडक्यात पण महत्त्वाचे

क्रॉम्प्टनने नवीन व्हिज्युअल आणि साउंड ओळख तसेच नवीन टॅगलाइन सादर केली. या सोबतच ‘क्रॉम्प्टन रिऑन’ हा सुपर-प्रीमियम ब्रँड लॉन्च केला असून ‘एनर्जियन’ ब्रँडही अधिक मजबूत करण्यात आला आहे.

मुंबई, 21 ऑगस्ट 2026 : भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रिकल कंपन्यांपैकी एक असलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने आज आपली नवीन मास्टर ब्रँड ओळख सादर केली. यासोबत कंपनीच्या ‘क्रॉम्प्टन 2.0’ या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या नव्या टप्प्यात कंपनीचे लक्ष नवीन तंत्रज्ञान, ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांवर आधारित व्यवसाय उभारण्यावर राहणार आहे. 

गेल्या दशकात क्रॉम्प्टनने तंत्रज्ञान आणि उत्पादनांमधील नवकल्पनांमध्ये सातत्याने गुंतवणूक करून आपल्या पारंपरिक उत्पादनांच्या पलीकडे जाऊन आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. नवीन ब्रँड ओळख हा कंपनीतील या बदलांचा भाग आहे. यामुळे क्रॉम्प्टनच्या सर्व उत्पादनांसाठी एकसंध ब्रँड ओळख तयार होईल. तसेच नाविन्यपूर्ण आणि प्रीमियम उत्पादनांवर अधिक भर देत कंपनीच्या दीर्घकालीन वाढीलाही चालना मिळेल.

क्रॉम्प्टनच्या नवीन ओळखीचा मुख्य भाग म्हणजे ‘सेफायर’ (Cephyr). याचा उच्चार ‘सॅफ-फायर’ असा केला जातो. हे क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे नवीन चिन्ह आणि प्रमुख व्हिज्युअल ओळख आहे.‘ सेफायर’ हे नाव दोन गोष्टींपासून प्रेरित आहे. सॅफायर (Sapphire) या रत्नाच्या गडद आणि टिकाऊ निळ्या रंगापासून तसेच ग्रीक पौराणिक कथांमधील झेफायरस या सौम्य वाऱ्यापासून प्रेरित आहे. यात काळजी, गुणवत्ता, आकर्षकता आणि कायमस्वरूपीपणा यांचा अर्थ व्यक्त होतो.‘ सेफायर’ हे चिन्ह क्रॉम्प्टनच्या आधुनिक आणि आकर्षक डिझाइनकडे होणाऱ्या बदलाचे प्रतीक आहे. 

कंपनीच्या उत्पादनांमध्ये लवचिकता, बदल स्वीकारण्याची क्षमता आणि आकर्षक डिझाइन यांना महत्त्व दिले जाणार आहे. या चिन्हातील ‘C’ हे कंज्यूमर, कस्टमर, केयर, कनेक्टिव्हिटी आणि क्रॉम्प्टन यांचे प्रतीक आहे. यामधून ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यांच्यासाठी नावीन्यपूर्ण उत्पादने आणि कनेक्टेड लिव्हिंगचा अनुभव देण्याची कंपनीची बांधिलकी दिसून येते. ‘C’ च्या टोकाकडे जाणारा वरच्या दिशेचा वक्र आकार जबाबदारी आणि सातत्याने प्रगती करण्याची कंपनीची भूमिका दर्शवतो. तसेच ‘C’ मधून बाहेर येणारे अनंताचे (Infinity) चिन्ह क्रॉम्प्टनच्या सतत नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि नावीन्याचा शोध घेण्याच्या प्रवासाचे प्रतीक आहे.

सेफायर’ हे चिन्ह बारा वर्तुळांपासून तयार करण्यात आले आहे. ही बारा वर्तुळे वर्षातील बारा महिन्यांचे प्रतीक आहेत. यामधून वर्षभर बदलणाऱ्या ऋतू आणि ग्राहकांच्या गरजांनुसार क्रॉम्प्टन स्वतःला बदलत राहते, हे दर्शवले आहे. उन्हाळ्यात घर थंड ठेवणे, हिवाळ्यात उबदारपणा देणे, सणांच्या काळात प्रकाश देणे आणि रोजच्या जीवनातील गरजांसाठी ऊर्जा उपलब्ध करून देणे, अशा प्रकारे क्रॉम्प्टन वर्षभर ग्राहकांच्या जीवनाचा एक भाग राहते. 

या चिन्हातील गोलाकार आणि प्रवाही रचना ऋतूंच्या चक्राचे तसेच बदलत्या गरजांनुसार स्वतःला जुळवून घेण्याच्या क्रॉम्प्टनच्या क्षमतेचे प्रतीक आहे. ग्राहक वर्षभर कोणत्याही ठिकाणी किंवा कोणत्याही परिस्थितीत असले, तरी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी क्रॉम्प्टनची उत्पादने आणि सेवा त्यांच्या सोबत असतील, हा या चिन्हामागील मुख्य संदेश आहे. 

सेफायर’ सोबत क्रॉम्प्टनने नवीन ब्रँड टॅगलाइन ‘अमेझिंग, एव्हरी डे.’ सादर केली आहे. ही केवळ एक टॅगलाइन नसून, रोजच्या जीवनातील साध्या गोष्टी अधिक चांगल्या, सोप्या आणि आनंददायी करण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने देण्याची कंपनीची बांधिलकी दर्शवते. ‘अमेझिंग म्हणजे दैनंदिन जीवनात आनंद देणारे चांगले अनुभव आणि ग्राहकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी नावीन्यपूर्ण उत्पादने. याचा अर्थ केवळ मोठ्या किंवा आकर्षक गोष्टी असा नाही, तर जीवन अधिक सोपे, आरामदायी आणि आनंददायी करणारे छोटे-छोटे बदल असा आहे. 

‘एव्हरी डे म्हणजे विश्वासार्हता आणि ग्राहकांसोबत कायम राहणे. रोजच्या जीवनातील गरजांच्या वेळी क्रॉम्प्टनची उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध राहतील आणि त्यांच्या जीवनात अधिक मूल्य वाढवतील, असा त्याचा अर्थ आहे. या टॅगलाइनमध्येही क्रॉम्प्टनच्या ब्रँडची ओळख दर्शवणारे काही खास डिझाइन घटक आहेत. ‘अमेझिंग मधील ‘i’ हे Wi-Fi चिन्हासारखे दिसेल अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. यामधून स्मार्ट, बुद्धिमान आणि कनेक्टेड उत्पादनांच्या इकोसिस्टमसाठी क्रॉम्प्टनची बांधिलकी दिसून येते. तसेच ‘एव्हरी डे मधील ‘E’ चे डिझाइन इलेक्ट्रिकल प्लग आणि पॉवर बटणाच्या चिन्हापासून प्रेरित आहे. हे क्रॉम्प्टनच्या 85 वर्षांहून अधिक काळाच्या इलेक्ट्रिकल क्षेत्रातील अनुभवाला आणि भारतीय घरांना ऊर्जा देण्याच्या कंपनीच्या मूळ ओळखीला दर्शवते.

या व्हिज्युअल बदलासोबत क्रॉम्प्टनने नवीन आणि खास साउंड ओळख (सोनिक आयडेंटिटी) देखील सादर केली आहे. यामुळे ब्रँडची वेगळी आणि सहज ओळखता येणारी साउंड ओळख तयार होईल. ही साउंड ओळख जाहिराती, डिजिटल प्लॅटफॉर्म, उत्पादनांचा अनुभव आणि दुकानांमधील ग्राहकांचा अनुभव अशा विविध ठिकाणी वापरली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना क्रॉम्प्टन ब्रँड त्याचा आवाज ऐकूनही सहज ओळखता येईल आणि तो त्यांच्या लक्षात राहील. या नवीन साउंड ओळखीमुळे क्रॉम्प्टन ग्राहकांना दृश्य आणि ध्वनी अशा दोन्ही माध्यमांतून एकसंध, आधुनिक आणि प्रभावी ब्रँड अनुभव देऊ शकणार आहे.

प्रोमीत घोष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, म्हणाले, "घरगुती सुविधा आणि उत्पादनांच्या क्षेत्रात सध्या मोठे बदल होत आहेत. ग्राहकांचे दैनंदिन जीवन अधिक सोपे करण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना, सहज अनुभव आणि विश्वासार्ह उत्पादने यांना महत्त्व वाढत आहे. भविष्यातील मजबूत ब्रँड केवळ एका उत्पादनाच्या श्रेणीपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर त्यांची ओळख ठरेल.

याच विचारातून ‘क्रॉम्प्टन 2.0’ ही आमची धोरणात्मक वाटचाल सुरू झाली आहे. यामध्ये क्रॉम्प्टनला विविध प्रकारच्या उत्पादनांसह नावीन्यपूर्ण होम सोल्युशन्स कंपनीमध्ये विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या दशकात आम्ही पारंपरिक उत्पादनांच्या पलीकडे विस्तार केला, नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करण्याची क्षमता मजबूत केली आणि भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारी उत्पादनांची श्रेणी तयार केली. मात्र, गेल्या 85 वर्षांहून अधिक काळ क्रॉम्प्टनने मिळवलेला ग्राहकांचा विश्वास आजही आमच्या कामाचा आधार आहे.

आमची नवीन ब्रँड ओळख केवळ बाह्य स्वरूपातील डिझाइनमधील बदल नाही. ‘Cephyr’ हे नवीन चिन्ह, नवीन टॅगलाइन आणि खास साउंड ओळख यांच्या माध्यमातून आम्ही क्रॉम्प्टनला भविष्यासाठी तयार असा ब्रँड बनवत आहोत. ही केवळ नवीन ब्रँड ओळख नसून, ग्राहकांमध्ये क्रॉम्प्टनबद्दल अधिक पसंती निर्माण करणे, प्रीमियम उत्पादनांच्या दिशेने आमची वाटचाल वेगाने पुढे नेणे आणि ग्राहक, भागीदार तसेच भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याच्या आमच्या उद्दिष्टाला अधिक मजबूत करणारी आहे."

तन्मय प्रुस्टी, मुख्य विपणन अधिकारी (CMO), क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, म्हणाले, "गेल्या काही वर्षांत क्रॉम्प्टनमध्ये मोठे बदल झाले आहेत आणि आमची नवीन ब्रँड ओळख या परिवर्तनाचे प्रतिबिंब आहे. व्हिज्युअल आणि साउंड ओळख यांचा समावेश असलेली ही एकसंध ब्रँड प्रणाली आहे. यामुळे ग्राहकांना क्रॉम्प्टनचा अधिक वेगळा आणि चांगला अनुभव मिळेल.

त्याचबरोबर, ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन विविध ग्राहकवर्गांसाठी योग्य उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आमच्या विविध ब्रँड्सचा मजबूत पाया तयार करत आहोत. क्रॉम्प्टनची नवीन मास्टर ब्रँड ओळख टप्प्याटप्प्याने कंपनीच्या विविध उत्पादनांमध्ये, पॅकेजिंगमध्ये, रिटेल स्टोअर्समध्ये, डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणि ग्राहकांशी होणाऱ्या संवादामध्ये लागू केली जाणार आहे. यामुळे ग्राहकांना क्रॉम्प्टनच्या प्रत्येक संपर्काच्या ठिकाणी एकसंध आणि समान ब्रँड अनुभव मिळेल.

क्रॉम्प्टनने नवीन उत्पादन श्रेणी आणि विविध ग्राहकवर्गांमध्ये विस्तार केल्यानंतर, एकाच ब्रँडच्या माध्यमातून सर्व ग्राहकांच्या वाढत्या आणि वेगवेगळ्या गरजा पूर्ण करणे नेहमीच शक्य होणार नाही, हे कंपनीच्या लक्षात आले. त्यामुळे क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज लिमिटेडच्या विविध ब्रँड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्राहकांसाठी स्वतंत्र उत्पादने आणि सुविधा विकसित करता येणार आहेत. यासोबतच ‘क्रॉम्प्टन’ या नावाचा विश्वास आणि प्रतिष्ठा कायम ठेवता येणार आहे.

सीजीसीईएलचा ‘एनर्जियन हा स्मार्ट ऊर्जा क्षेत्रातील ब्रँड आहे. आज ऊर्जा क्षेत्र केवळ स्वतंत्र उपकरणांपुरते मर्यादित न राहता विविध ऊर्जा उपाय आणि तंत्रज्ञान एकत्र जोडणाऱ्या इंटिग्रेटेड एनर्जी सिस्टीम्सकडे वाटचाल करत आहे. ही बदलती गरज लक्षात घेऊन एनर्जियन ची निर्मिती करण्यात आली आहे. एनर्जियनची ब्रँड टॅगलाइन – “द पावर बिहाइंड एव्हरीडे प्रोग्रेस” म्हणजेच “दररोजच्या प्रगतीमागची ऊर्जा”. या माध्यमातून घरगुती ग्राहक आणि व्यवसायांना विश्वासार्ह, स्मार्ट आणि पर्यावरणपूरक ऊर्जा उपाय उपलब्ध करून देणारा विश्वासू भागीदार म्हणून एनर्जियन ची ओळख निर्माण केली जात आहे. ‘एनर्जियन हे नाव ‘Energy’ या शब्दापासून प्रेरित आहे. हे विजेचा प्रवाह आणि ऊर्जेचा वापर यांच्याशी संबंधित आहे. घर, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनासाठी ऊर्जेची स्मार्ट पद्धतीने हालचाल, साठवणूक आणि वापर याचे हे प्रतीक आहे. 

एनर्जियन हा ब्रँड ऊर्जा निर्मितीपासून ऊर्जा रूपांतरण, साठवणूक आणि चार्जिंग सोल्युशन्सपर्यंत संपूर्ण ऊर्जा मूल्यसाखळीत काम करणार आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा प्लॅटफॉर्म कोणत्याही एका उत्पादन श्रेणीपुरता मर्यादित नाही. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातील नव्या आणि विकसित होत असलेल्या संधींमध्ये क्रॉम्प्टनला सहभागी होता येईल. त्याचवेळी प्रीमियम दर्जा आणि ग्राहकांसाठी परवडणारी किंमत यामध्ये संतुलन राखण्याचा कंपनीचा प्रयत्न राहणार आहे.

प्रीमियम उत्पादनांवर अधिक भर देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून क्रॉम्प्टनने आज ‘क्रॉम्प्टन रिऑन’ हा नवीन सुपर-प्रीमियम ब्रँड सादर केला आहे. क्रॉम्प्टनच्या व्यवसायवाढीच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा पुढचा टप्पा आहे. आधुनिक आणि अधिक दर्जेदार जीवनशैलीचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी रिऑन’ हा ब्रँड तयार करण्यात आला आहे. यामध्ये उपयोगी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, तांत्रिक कौशल्य आणि आकर्षक डिझाइन यांचा एकत्रित वापर करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना अधिक आधुनिक, सहज वापरता येणारा आणि दर्जेदार अनुभव देण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

प्रोमीत घोष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, म्हणाले, "क्रॉम्प्टन रिऑन’ची लॉन्चिंग आमच्या प्रीमियम उत्पादनांच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. सुपर-प्रीमियम बाजारपेठेत आमची उपस्थिती मजबूत करण्याचा आमचा उद्देश यामधून स्पष्ट होतो. आमचा स्वतंत्र सुपर-प्रीमियम ब्रँड म्हणून क्रॉम्प्टन रिऑन उत्कृष्ट डिझाइन, आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या उपायांद्वारे अधिक चांगला अनुभव देईल. तांत्रिक कौशल्य आणि सहज वापरता येणारे नावीन्य यांचा संगम करून क्रॉम्प्टन रिऑन प्रीमियम जीवनशैलीसाठी एक नवा दर्जा आणि उत्तम अनुभव निर्माण करेल."

क्रॉम्प्टन रिऑन ‘प्रॉवेस इनसाइड. पॉइज़ आउटसाइड.’ या संकल्पनेवर आधारित आहे. याचा अर्थ आतून उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि तांत्रिक कौशल्य, तर बाहेरून आकर्षक आणि सुंदर डिझाइन असा आहे. या संकल्पनेनुसार, रिऑनच्या प्रत्येक उत्पादनामध्ये उत्कृष्ट इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान आतून काम करेल, तर त्याचे बाह्य डिझाइन आकर्षक आणि आधुनिक असेल.

क्रॉम्प्टन रिऑनच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनामध्ये नवीन पिढीचे तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित डिझाइन यांचा समावेश आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन उत्पादने वापरण्यास सोपी आणि अधिक सहज अनुभव देणारी असतील. क्रॉम्प्टन रिऑनने प्रीमियम वॉटर प्युरिफिकेशन श्रेणीत प्रवेश केला असून, क्रॉम्प्टन रिऑन वॉटर बायोफायर हे उत्पादन सादर केले आहे. पाण्याच्या शुद्धीकरणाच्या क्षेत्रात हे एक नवीन प्रकारचे उत्पादन असल्याचा कंपनीचा दावा आहे. याचा उद्देश केवळ पाणी शुद्ध करणे नसून, मानवी वापरासाठी गरजेनुसार योग्य पद्धतीने पाणी उपलब्ध करून देणे हा आहे.

या उत्पादनाची लॉन्चिंग अशा वेळी झाली आहे, जेव्हा भारतातील घरगुती इलेक्ट्रिक वॉटर प्युरिफायर बाजारपेठेचा आकार अंदाजे 5,565 कोटी आहे. यामध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) तंत्रज्ञानाचा वाटा सुमारे 85 टक्के आहे. बाजारपेठ मोठी असली तरी, देशातील केवळ 6 टक्के घरांमध्ये वॉटर प्युरिफायरचा वापर होतो. त्यामुळे या क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची तसेच प्रीमियम उत्पादनांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. क्रॉम्प्टन रिऑन वॉटर बायोफायर हे पाणी शुद्ध करण्याच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळा विचार करून विकसित करण्यात आले आहे. यामध्ये केवळ पाणी शुद्ध करण्याऐवजी मानवी सेवनासाठी अधिक योग्य आणि संतुलित पाणी देण्यावर भर देण्यात आला आहे. या उत्पादनातून रिऑनची उत्कृष्ट तांत्रिक क्षमता आणि आकर्षक, सहज अनुभव यांचा संगम साधण्याची भूमिका स्पष्ट होते.

Post a Comment

0 Comments