थोडक्यात पण महत्वाचे
• 110cc सेगमेंटमध्ये ड्युअल टोन स्टायलिंगमध्ये वैशिष्ट्यपूर्ण स्पेक्ट्रल रंग सादर करणारी टीव्हीएस ज्युपिटर पहिली बाईक ठरली आहे.
• वैशिष्ट्यांमध्ये सेगमेंटमधील पहिले सिक्वेन्शियल टर्न सिग्नल लॅम्प्स (TSL), प्रीमियम आरामदायी सुविधा आणि USB टाइप-C चार्जिंग.
बंगळूर, 27 ऑगस्ट, 2026: टीव्हीएस वेणूचा एक भाग आणि दुचाकी तसेच तीनचाकी वाहन निर्मितीमधील जागतिक आघाडीवरील टीव्हीएस मोटर कंपनीने, आज भारतातील सर्वात प्रगतिशील फॅमिली स्कूटरच्या श्रेणीत नवीन भर घालत, टीव्हीएस ज्युपिटर ड्युअल टोन स्पेक्ट्रल रेंज सादर केली. ही नवीन श्रेणी 110 सीसी स्कूटर सेगमेंटमध्ये स्पेक्ट्रल ब्लू आणि स्पेक्ट्रल कॉपर हे दोन नवीन ड्युअल-टोन स्पेक्ट्रल रंग घेऊन आली आहे. यामुळे टीव्हीएस ज्युपिटर ही या सेगमेंटमधील अशी पहिली स्कूटर ठरली आहे, जी हे वैशिष्ट्यपूर्ण रंग सादर करत आहे. यासोबतच स्टायलिंग, आराम आणि तंत्रज्ञान यातही विचारपूर्वक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
टीव्हीएस ज्युपिटर ड्युअल टोन स्पेक्ट्रल रेंज ठळक वैशिष्ट्ये
श्रेणी प्रमुख वैशिष्ट्ये
या प्रकारातील प्रथमच नावीन्यपूर्ण सुधारणा • 110सीसी स्कूटर श्रेणीमध्ये ड्युअल-टोन स्टायलिंगसह वैशिष्ट्यपूर्ण स्पेक्ट्रल रंग (स्पेक्ट्रल ब्लू आणि स्पेक्ट्रल कॉपर) देणारी पहिली स्कूटर
• सिक्वेन्शियल टर्न सिग्नल लॅम्प्स (TSL)
शैलीविषयक नवीन सुधारणा • डायनॅमिक कलर-शिफ्टिंग फिनिशसह टीव्हीएस स्पेक्ट्रल कलर टेक्नॉलॉजी
• रंगाशी सुसंगत असे आतील पॅनेल्स
• प्रीमियम दर्जाचे सीट फिनिश
• पार्शिअल क्रोम मिरर्स
आरामदायी बॅकरेस्ट असलेली प्रीमियम लांब सीट
सोय आणि तंत्रज्ञान • USB Type-C चार्जिंग पोर्ट
• नेव्हिगेशन, कॉल आणि SMS अलर्ट्ससह SmartXonnect™ कनेक्टेड तंत्रज्ञान
कामगिरी अधिक वेगवान प्रवेग (ॲक्सिलरेशन) आणि सुधारित इंधन कार्यक्षमतेसाठी TVS iGO असिस्ट
व्यावहारिकता या श्रेणीतील सर्वोत्तम ३३-लिटरची सीटखालील साठवणूक क्षमता (दोन हेल्मेट्स मावतात)
वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीला पूरक असे आतील रंगीत पॅनेल्स, सीटचाही नवीन रंग आणि अंशतः क्रोमचे आरसे, रस्त्यावर एक सुसज्ज आणि आधुनिक अस्तित्व निर्माण करतात.
रायडर आणि मागे बसणाऱ्यासाठी बॅकरेस्ट असलेल्या प्रीमियम लांब सीटसह नवीन व्हेरिएंट दैनंदिन आराम आणि सोय आणखी वाढवते. यात सेगमेंट-मधील पहिलेच सिक्वेन्शियल टर्न सिग्नल लॅम्प्स (TSL) देखील सादर केले आहेत, जे दृश्यमानता वाढवताना एक वैशिष्ट्यपूर्ण लाइटिंग सिग्नेचर देतात, आणि प्रवासात सोईस्कर चार्जिंगसाठी एक USB टाइप-C चार्जिंग पोर्ट देखील आहे. स्कूटरमध्ये स्मार्टएक्सकनेक्ट™ कनेक्टेड तंत्रज्ञानासह, दोन हेल्मेट ठेवण्याची क्षमता असलेली, तिच्या वर्गातील सर्वोत्तम ३३-लीटरची सीटखालील स्टोरेज क्षमता कायम आहे.
या नवीन आवृत्तीबद्दल टीव्हीएस मोटर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (कम्युटर आणि ईव्ही व्यवसाय प्रमुख तसेच कॉर्पोरेट ब्रँड आणि मीडिया प्रमुख) अनिरुद्ध हलदार म्हणाले, "शहरी भागातील तरुण भारतीय कुटुंबे नवनवीन अनुभव, डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या संपर्कात येत आहेत, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या (मोबिलिटीच्या) अपेक्षा आणि आकांक्षा बदलत आहेत. भारतातील स्कूटर संस्कृतीच्या प्रवासात टीव्हीएस ज्युपिटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे; लाखो कुटुंबांचे प्रेम आणि विश्वास संपादन करून या स्कूटरने 'स्कूटर ऑफ इंडिया' (भारताची स्कूटर) म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.
काळाच्या ओघात यात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा आणि नावीन्यपूर्ण बदल करण्यात आले, तरीही कुटुंबांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींशी असलेली बांधिलकी कंपनीने जपली आहे. प्रगत डिझाइन आणि वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशा या स्कूटरचा वारसा पुढे नेत, नवीन 'टीव्हीएस ज्युपिटर ड्युअल-टोन' अधिक आधुनिक रूप घेऊन आली आहे. यात या श्रेणीतील (सेगमेंटमधील) प्रथमच सादर केलेली 'स्पेक्ट्रल कलर्स' आणि 'सिक्वेन्शियल टर्न सिग्नल लॅम्प्स' यांसारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. या सर्व सुधारणांमुळे, आजच्या आधुनिक आणि नव्या युगातील कुटुंबांसाठी प्रवासाचे पसंतीचे साधन बनण्याच्या टीव्हीएस ज्युपिटरच्या वचनबद्धतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे."
टीव्हीएस ज्युपिटरने नेहमीच भारतीय कुटुंबांना अधिक काहीतरी देण्यावर भर दिला आहे. 'ज्यादा का फायदा' या तत्त्वज्ञानाचा आधार घेत, नवीन 'ड्युअल-टोन स्पेक्ट्रल रेंज' दैनंदिन रायडिंगच्या अनुभवातील प्रत्येक पैलू अधिक समृद्ध करून हे तत्त्वज्ञान पुढे नेते. गेली 13 वर्षांहून अधिक काळ, भारतीय कुटुंबांच्या बदलत्या गरजांनुसार या ब्रँडने स्वतःमध्ये सुधारणा केल्या आहेत. आणि अर्थपूर्ण नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे सातत्याने गुणवत्तेचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत.
2024 मध्ये सादर झालेल्या टीव्हीएस ज्युपिटरने आपला वारसा अधिक समृद्ध केला आहे. यात आपल्या श्रेणीतील सर्वोत्तम आणि या विभागातील प्रथम अशी 29 वैशिष्ट्ये आहेत. यात पूर्वीप्रमाणेच प्रगत 113.3 सीसी, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहे, जे 5.9 kW पॉवर आणि TVS iGO Assist सह 9.8 Nm पर्यंत टॉर्क निर्माण करते; यामुळे इंधनाची कार्यक्षमता सुधारण्यासोबतच अधिक दमदार वेग मिळतो.
टीव्हीएस ज्युपिटरची नवीन 'ड्युअल-टोन स्पेक्ट्रल' श्रेणी लवकरच अधिकृत टीव्हीएस मोटर डीलरशिप्सकडे ₹89,825 (एक्स-शोरूम दिल्ली) या किमतीत उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: https://www.tvsmotor.com/tvs-jupiter/

0 Comments