Business

Header Ads

पीपीएफएएस म्युच्युअल फंडने नागपुरमध्ये नवीन कार्यालय सुरू केले !

नागपूर 24 ऑगस्ट 2026: पीपीएफएएस म्युच्युअल फंडने विदर्भातील आपली उपस्थिती वाढवत नागपुरमध्ये नवीन कार्यालय सुरू केले आहे. विदर्भातील गुंतवणूकदारांशी आपले संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पीपीएफएएस म्युच्युअल फंडचे बिझनेस हेड – ईस्ट अँड वेस्ट, श्री. महेश सरोदे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत या नवीन शाखेचे उद्घाटन केले. हे नवीन कार्यालय पीपीएफएएस अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, फर्स्ट फ्लोअर, सी.टी.एस. क्र. 1656/1 आणि प्लॉट नं. 317 K, अॅक्सिस बँकेजवळ, आर.टी. रोड, सिव्हिल लाइन्स, नागपूर – 440001, महाराष्ट्र येथे स्थित आहे.

ही शाखा इन्व्हेस्टर सर्व्हिस सेंटर (ISC) आणि ऑफिशियल पॉइंट ऑफ अॅक्सेप्टन्स (OPA) म्हणून काम करणार आहे. येथे पीपीएफएएस म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांशी संबंधित व्यवहारांच्या सुविधा उपलब्ध असतील. हे शाखा कार्यालय शुक्रवार, 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाले आहे.

या विस्ताराबाबत भाष्य करताना, पीपीएफएएस म्युच्युअल फंडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी नील पराग पारीख म्हणाले, “महाराष्ट्रात, विशेषतः नागपूरमध्ये, आपली उपस्थिती वाढवणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्र हे पीपीएफएएस म्युच्युअल फंडसाठी महत्त्वाचे बाजारपेठ आहे. नागपूरमुळे विदर्भातील गुंतवणूकदार आणि भागीदारांच्या अधिक जवळ जाण्याची संधी आम्हाला मिळत आहे. या भागातील गुंतवणूकदारांशी अधिक चांगले आणि दीर्घकालीन संबंध निर्माण करणे तसेच आमच्या सेवा त्यांच्यापर्यंत अधिक सहज उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

पीपीएफएएस म्युच्युअल फंड सातत्याने आपल्या नेटवर्कचा विस्तार करत असून, गुंतवणूकदारांसाठी आपल्या सेवा अधिक सुलभ आणि सहज उपलब्ध करून देण्यावर भर देत आहे. तसेच, गुंतवणूकदारांसोबत दीर्घकालीन आणि विश्वासाचे संबंध निर्माण करण्यावरही कंपनी भर देत आहे.

पीपीएफएएस म्युच्युअल फंडच्या सध्याच्या प्रमुख योजना:

• पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड: ही ओपन-एंडेड डायनॅमिक इक्विटी योजना असून, यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. 
• पराग पारिख ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड: ही ओपन-एंडेड इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज योजना आहे. यामध्ये ३ वर्षांचा अनिवार्य लॉक-इन कालावधी असतो आणि गुंतवणूकदारांना कर बचतीचा लाभ मिळतो. 
• पराग पारिख कन्झर्व्हेटिव्ह हायब्रिड फंड: ही ओपन-एंडेड हायब्रिड योजना असून, यामध्ये प्रामुख्याने डेट म्हणजेच कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. 
• पराग पारिख डायनॅमिक अॅसेट अलोकेशन फंड: ही ओपन-एंडेड डायनॅमिक अॅसेट अलोकेशन योजना आहे. 
• पराग पारिख आर्बिट्राज फंड: ही ओपन-एंडेड योजना असून, यामध्ये वेगवेगळ्या बाजारपेठांमधील किमतीतील फरकाचा फायदा घेऊन गुंतवणूक केली जाते. 
• पराग पारिख लिक्विड फंड: ही ओपन-एंडेड लिक्विड योजना आहे. या योजनेत व्याजदरातील बदलांचा धोका आणि क्रेडिट रिस्क तुलनेने कमी असतो. 
• पराग पारिख लार्ज कॅप फंड: ही ओपन-एंडेड इक्विटी योजना असून, यामध्ये प्रामुख्याने मोठ्या कंपन्यांच्या (लार्ज कॅप) शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते.

Post a Comment

0 Comments