नागपूर : अदानी फाउंडेशन व अदानी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत भारकस व बीडगणेशपूर गावांमध्ये नागरिकांसाठी विविध शासकीय योजना व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये ग्रामस्थांची आयुष्मान भारत कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड, रेशन कार्ड ई-केवायसी, मतदान ओळखपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे काढून देण्यात आली. याशिवाय विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला दोन्ही गावांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरादरम्यान एकूण ८६२ विविध कागदपत्रे काढून देण्यात आली, तसेच नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक सहाय्य करण्यात आले. या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांशी जोडण्यात यश आले.
कार्यक्रमास अदानी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडचे सुरक्षा विभाग प्रमुख श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भारकस ग्रामपंचायतीच्या मा. सरपंच सौ. रोशनाताई उमरे व बीडगणेशपूर गटग्रामपंचायतीच्या मा. सरपंच सौ. शारदाताई शिंगारे यांच्यासह गावातील अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन अदानी फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी श्री. राजेश मेश्राम यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ममता पेंदाम व अपर्णा पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया तसेच शासकीय लाभ मिळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ झाले.
या लोकहितकारी उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी अदानी फाउंडेशन व अदानी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड यांचे आभार व्यक्त केले. भविष्यातही अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्यात यावीत, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजना व सेवांचा लाभ सहज उपलब्ध करून देण्यासाठी अदानी फाउंडेशन सातत्याने कार्यरत असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले

0 Comments