Business

Header Ads

डीएमआयएचईआरच्या कुलपती डॉ. प्रीती अदाणी यांच्या हस्ते नागपुरात‘शांती आरोग्य मंदिर’चे उद्घाटन !

थोडक्यात पण महत्त्वाचे

🔷 नवीन केंद्रात एकाच ठिकाणी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या, विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांचा सल्ला आणि अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध असतील.

🔷 लवकर निदान, वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप आणि नियमित आरोग्य निरीक्षणावर केंद्राचा भर असेल.

🔷 नागपुरातील कोतवाल नगर येथे स्थित हे केंद्र शहरासह संपूर्ण मध्य भारतातील नागरिक आणि
कुटुंबांसाठी सेवा देणार आहे.

नागपूर, 29 ऑगस्ट 2026: आपल्या वाढदिवसानिमित्त दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (डीएमआयएचईआर),अभिमत विद्यापीठ (डीयू)च्या कुलपती डॉ. प्रीती अदाणी यांनी अदाणी समूहाच्या सहकार्याने नागपुरातील 38, कोतवाल नगर येथे स्थापन करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि वेलनेस केंद्र ‘शांती आरोग्य मंदिर’चे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.

या केंद्रात एकाच छताखाली प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या, विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांचा सल्ला आणि अत्याधुनिक निदान सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.रुग्णालयात उपचाराची गरज भासण्यापूर्वीच आरोग्यविषयक समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करता याव्यात, यासाठी लवकर तपासणी आणि वेळेवर वैद्यकीय सेवा घेण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही सुविधा उभारण्यात आली आहे.

डीएमआयएचईआर (डीयू)च्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेले ‘शांती आरोग्य मंदिर’ “बेटर प्रिवेंशन ,फेवर हॉस्पिटलाइजेशन,हेलथियर कम्युनिटीज.” या दृष्टिकोनातून मार्गदर्शित आहे.नागपूर आणि संपूर्ण मध्य भारतातील नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना ‘शांती आरोग्य मंदिर’चे संचालक डॉ. अनुप मरार म्हणाले, “आरोग्यसेवेचा भर केवळ आजारांवर उपचार करण्यापुरता मर्यादित न राहता आजारांना प्रतिबंध करण्यावरही असला पाहिजे. 

लवकर निदान, वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप आणि सातत्यपूर्ण आरोग्य निरीक्षणाच्या माध्यमातून समुदायांना सक्षम करण्याच्या दिशेने ‘शांती आरोग्य मंदिर’ हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. समाजाच्या एका महत्त्वपूर्ण गरजेची पूर्तता करणाऱ्या या दूरदर्शी आरोग्यसेवा मॉडेलला पाठबळ दिल्याबद्दल आम्ही डीएमआयएचईआर (डीयू) आणि अदाणी समूहाचे आभारी आहोत.” डॉ.प्रीती अदाणी म्हणाल्या, “रुग्णालयांमध्ये किती रुग्ण आहेत, हे आमचे उद्दिष्ट नसून अधिकाधिक लोकांनी आपल्या घरी निरोगी राहावे, हे आमचे ध्येय आहे. ‘शांती आरोग्य मंदिरा’च्या माध्यमातून मध्य भारतातील नागरिकांच्या जवळ प्रतिबंधात्मक आणि आरोग्यवर्धक सेवा पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. वेळेवर तपासण्या, वैद्यकीय सल्ला आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून नागरिकांना अधिक आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्या साठी प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

या उद्घाटनप्रसंगी डीएमआयएचईआर (डीयू)चे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. मलय महादेविया यांच्यासह संस्थेचे वरिष्ठ नेतृत्व, वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी तसेच संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डीएमआयएचईआरचे प्रमुख शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (एसएमएचआरसी) हे 1,020 खाटांचे आरोग्यसेवा संस्थान असून, येथे विविध वैद्यकीय शाखांमधील तसेच अतिविशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

Post a Comment

0 Comments