नागपूर, 28 ऑगस्ट : वर्ध्यातील तरुण पिढीने कबड्डीच्या मॅटवर आणि खो-खोच्या मैदानावर नेहमी आपली ताकद आणि चपळता सिद्ध केली आहे. हे खेळ या भागाच्या क्रीडा संस्कृतीत खोलवर रुजलेले आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून इव्होनिथ स्टीलने वर्ध्यातील तळागाळातील क्रीडा परंपरेचे रूपांतर विविध समुदायांमधील नवोदित तरुण खेळाडूंकरिता संधींमध्ये करण्यासाठी आपल्या प्रयत्नांना अधिक चालना दिली आहे.
इव्होनिथ स्टीलसाठी स्थानिक खेळ हे तरुणांना सक्रिय राहण्यास, शिस्त व सांघिक भावना विकसित करण्यास आणि आत्मविश्वास निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्याचे एक माध्यम आहे. क्षमता आणि महत्त्वाकांक्षा असलेल्या खेळाडूंसाठी हे व्यावसायिक स्पर्धात्मक खेळांमध्ये एक सुटसुटीत आणि संरचित मार्ग उपलब्ध करून देते.
इव्होनिथ योध्दा कबड्डी उपक्रम या विश्वासाला अधिक दृढ करतो. कंपनीने अलीकडेच वर्ध्यातून नवोदित टॅलेंट शोधण्यासाठी ट्रायल्स घेतल्या, ज्यामध्ये १२ ते २५ वर्ष वयोगटातील जवळपास ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला. या भागातील आशादायक तरुण टॅलेंटसाठी एक मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत इव्होनिथ योध्दा कबड्डी संघाची घोषणा सप्टेंबरमध्ये केली जाणार आहे. निवडलेले खेळाडू इव्होनिथ योध्दा क्लबचा भाग बनतील आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि या भागातील स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल.
कबड्डीवर लक्ष केंद्रित करण्याचे कारण म्हणजे या भागातील खेळाची लोकप्रियता, जिथे हा खेळ लोकांमध्ये अत्यंत आवडता आणि लोकप्रिय आहे. तळागाळातील टॅलेंट शोधून त्यांना व्यावसायिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देत इव्होनिथ योद्धा उपक्रम उदयोन्मुख खेळाडूंना त्यांच्या गावांच्या पलीकडे नेऊन उच्च पातळीवरील स्पर्धांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
वर्ध्यातील समुदायांना सक्षम बनवण्याच्या या व्यापक दृष्टिकोनाचा भाग म्हणून कंपनीची वार्षिक मॅरेथॉन ‘१०के रन फॉर एन्व्हायर्नमेंट' खेळाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य सुधारण्यावर भर देते.
याआधीची मॅरेथॉन वर्धा शहरात तीन वेगवेगळ्या वयोगटांसाठी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये १६ वर्षांवरील ४,५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि वैयक्तिक पर्यावरणविषयक प्रभाव कमी करणे आणि लहान व सुसाध्य संकल्प करून निरोगी आयुष्य जगण्याबाबत जागरूकता पसरवण्याच्या कार्यात योगदान दिले.
मोठ्या प्रमाणावर जनसहभागाला प्रोत्साहन देऊन ही मॅरेथॉन अधिक निरोगी वर्ध्याच्या ध्येयाला पुढे नेण्याच्या खेळाच्या क्षमतेवरील इव्होनिथचा विश्वास दर्शवते.
वर्ध्यातील उत्पादन प्लांटच्या आवारात आयोजित केल्या जाणाऱ्या कंपनीच्या वार्षिक क्रीडा दिनामध्ये खो-खो, कबड्डी आणि क्रिकेट यांसारख्या विविध लोकप्रिय खेळांमध्ये २० गावांतील जवळपास ८०० तरूण, महिला आणि मुलींचा सहभाग पाहायला मिळतो. खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आणि या उपक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी क्रीडा प्रकार कशा प्रकारे समुदायांना एकत्र आणू शकतात, याची ही वार्षिक आठवण आहे.
वर्धा हे इव्होनिथ स्टीलच्या लोखंड निर्मिती आणि फिनिश्ड स्टील उत्पादनांच्या निर्मिती प्रकल्पाचे केंद्र आहे. उपजीविका विकास, आरोग्य सेवा आणि ग्रामीण खेळांमधील आपल्या व्यापक सीएसआर उपक्रमांद्वारे इव्होनिथ स्टीलने ३० गावांमधील ५०,००० हून अधिक ग्रामीण नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. कंपनीचे क्रीडा उपक्रम वर्ध्यातील ऑपरेशन्सच्या सभोवतालच्या सर्वसमावेशक समुदाय विकासाच्या कटिबद्धतेचा अविभाज्य भाग आहेत.
विविध गावांमधील जनसहभागाची जोड देत उदयोन्मुख खेळाडू शोधणे व त्यांना घडवण्याच्या संधी उपलब्ध करून देऊन इव्होनिथ स्टील वर्ध्याच्या समुदायांमध्ये रुजलेली आणि इथल्या तरुणांसाठी मोठ्या संधींशी जोडलेली क्रीडा संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

0 Comments