Kolkata, 29 September, 2026 : Sollfege Smart Electronics IPO Opening: स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रीमियम होम एंटरटेनमेंट क्षेत्रातील Sollfege Smart Electronics Limited आपला Initial Public Offering म्हणजेच IPO घेऊन येत आहे. कंपनीचा IPO 30 सप्टेंबर 2026 रोजी सब्स्क्रिप्शनसाठी खुला होणार असून 5 ऑक्टोबर 2026 रोजी बंद होईल. या IPOच्या माध्यमातून कंपनी ₹21.78 कोटी उभारण्याच्या तयारीत आहे.
IPO ची किंमत ₹55 प्रति शेअर Sollfege Smart Electronics IPO अंतर्गत एकूण 39,60,000 इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू ₹10 असून, IPO ची इश्यू प्राइस ₹55 प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे. कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे लिस्टिंग BSE SME प्लॅटफॉर्मवर करण्याचा प्रस्ताव आहे. IPO ची संपूर्ण इश्यू प्राइस अर्जाच्या वेळी भरावी लागणार आहे.
Retail गुंतवणूकदारांसाठी किती रक्कम? या IPO मध्ये एका मार्केट लॉटमध्ये 2,000 इक्विटी शेअर्स असतील. Retail Investorsना किमान 2 लॉटसाठी अर्ज करावा लागणार आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना किमान ₹2.20 लाख गुंतवावे लागतील.
HNI गुंतवणूकदारांसाठी किमान 3 लॉटची अट असून, त्यासाठी ₹3.30 लाख इतकी किमान गुंतवणूक आवश्यक असेल. Finshore Management Services Ltd. या IPOची Book Running Lead Manager आहे, तर Kfin Technologies Ltd. Registrar म्हणून काम पाहणार आहे.
IPO मधून मिळालेला पैसा कुठे वापरणार?Sollfege Smart Electronics IPO मधून मिळणाऱ्या निधीचा मोठा भाग कंपनीच्या विस्तारासाठी वापरला जाणार आहे. कंपनीने 12 नवीन शो-रूम सुरू करण्यासाठी ₹8.54 कोटी खर्च करण्याचे नियोजन केले आहे.याशिवाय कंपनीच्या वाढत्या व्यवसायासाठी ₹9.67 कोटी Working Capital Requirements पूर्ण करण्यासाठी वापरले जातील. उर्वरित ₹1.80 कोटी General Corporate Purposes साठी वापरण्याचे नियोजन आहे.
कंपनीचा आर्थिक परफॉर्मन्स सुधारला Sollfege Smart Electronicsच्या आर्थिक कामगिरीत मागील तीन आर्थिक वर्षांत सुधारणा झाल्याचे कंपनीने सांगितले आहे. कंपनीचे एकूण उत्पन्न FY23 मध्ये ₹12.74 कोटी होते. ते FY24 मध्ये वाढून ₹19.84 कोटी आणि FY25 मध्ये ₹21.28 कोटी झाले.EBITDA देखील FY23 मधील ₹0.66 कोटीवरून FY24 मध्ये ₹1.73 कोटी आणि FY25 मध्ये ₹3.24 कोटी झाले. त्याचप्रमाणे Profit After Tax म्हणजे PAT ₹0.36 कोटीवरून ₹1.76 कोटी आणि त्यानंतर FY25 मध्ये ₹2.13 कोटी झाला.
Premium Home Entertainment क्षेत्रात विस्तार Sollfege Smart Electronics ही कंपनी Home Theatre, High-End Audio, Projectors आणि Smart Home Automation यांसारख्या उत्पादनांमध्ये कार्यरत आहे. Experience Centre मॉडेलच्या माध्यमातून ग्राहकांना प्रीमियम ऑडिओ-व्हिडिओ आणि स्मार्ट होम सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर आहे.
कंपनीच्या मते, स्मार्ट आणि कनेक्टेड घरांची वाढती मागणी तसेच प्रीमियम Home Entertainment सोल्यूशन्समधील वाढता कल यामुळे या क्षेत्रात विस्ताराच्या संधी निर्माण होत आहेत. IPO नंतर 12 नवीन Showroomsच्या माध्यमातून कंपनी आपले Retail Network वाढवण्याचे लक्ष्य ठेवत आहे.Sollfege Smart Electronics IPO Date, IPO Price, Issue Size, Lot Size आणि निधीचा वापर यामुळे हा SME IPO चर्चेत आला आहे. मात्र IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी कंपनीचे अधिकृत IPO दस्तऐवज, जोखीम घटक आणि आर्थिक माहिती तपासणे महत्त्वाचे आहे.

0 Comments