थोडक्यात पण महत्त्वाचे
गॅलेक्सी एआय आणि शक्तिशाली कार्यक्षमता
• वन यूआय ९ सह लाँच होणारा गॅलेक्सी एस२६ लाइनअपमधील पहिला स्मार्टफोन
• गॅलेक्सी एस२६ एफईमध्ये प्रगत कॅमेरा क्षमता आणि अत्याधुनिक गॅलेक्सी एआयचे उत्तम संयोजन
राष्ट्रीय : सॅमसंग इंडियाने आज गॅलेक्सी एस२६ एफईच्या लाँचची घोषणा केली. हा गॅलेक्सी एस२६ कुटुंबातील सर्वात नवीन स्मार्टफोन आहे, जो वापरकर्त्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असणाऱ्या वैशिष्ट्यांभोवती डिझाइन करण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये प्रगत कॅमेरा अनुभव, कॉन्टेक्स्ट-अवेअर गॅलेक्सी एआय, दैनंदिन वापरासाठी शक्तिशाली कार्यक्षमता आणि वन यूआय ९ आहे. गॅलेक्सी एस२६ एफईमध्ये १२० हर्ट्झपर्यंत रिफ्रेश रेट असलेला ६.७ इंच डायनॅमिक एएमओएलईडी २एक्स डिस्प्ले, एक्सिनॉस २५०० प्रोसेसर, ४९०० एमएएच बॅटरी आणि बहुउद्देशीय ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टम समाविष्ट आहे. हे सर्व एका स्लिम आणि आकर्षक डिझाइनमध्ये सादर करण्यात आले आहे.
"गॅलेक्सी एस२६ एफई भारतातील अधिक ग्राहकांसाठी सर्वोत्तम गॅलेक्सी अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामध्ये व्यक्तींचे राहणीमान, काम आणि सर्जनशीलतेसाठी अर्थपूर्ण ठरणाऱ्या नाविन्यतांचा समावेश आहे. फ्लॅगशिप कॅमेरा क्षमता, कॉन्टेक्स्ट-अवेअर गॅलेक्सी एआय आणि शक्तिशाली कार्यक्षमतेसह, आम्ही ग्राहकांसाठी अत्यंत मोलाचे असणारे अनुभव एका विचारपूर्वक डिझाइन केलेल्या स्मार्टफोनमध्ये एकत्र आणत आहोत," असे सॅमसंग इंडियाच्या एमएक्स बिझनेसचे उपाध्यक्ष आदित्य बब्बर म्हणाले.
प्रत्येक क्षणासाठी डिझाइन केलेला कॅमेरा
गॅलेक्सी एस२६ एफईच्या प्रगत ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टममध्ये ५० मेगापिक्सल वाईड कॅमेरा, १२ मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि ३एक्स ऑप्टिकल झूमसह ८ मेगापिक्सल टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे; तसेच सोबत प्रगत १२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हा स्मार्टफोन गॅलेक्सी एफई सिरीजमध्ये माय फॅनकॅम हे वैशिष्ट्य घेऊन येतो, जे वापरकर्त्यांना एका व्यक्तीची निवड करण्याची आणि ती व्यक्ती हालचाल करत असतानाही फ्रेमच्या मध्यभागी ठेवण्याची सुविधा देते. हे वैशिष्ट्य व्हिडिओला इंटेलिजण्टअली रीफ्रेम करते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मॅन्युअल एडिटिंग न करता सोशल मीडियासाठी योग्य कंटेंट तयार करणे अधिक सोपे होते.
फिरताना किंवा हालचालीदरम्यानचे क्षण टिपणाऱ्या वापरकर्त्यांसाठी, हॉरिझॉन्टल लॉकसह सुपर स्टेडी वैशिष्ट्य अधिक स्थिर आणि सपाट फुटेज प्रदान करते; मग ते प्रवासाचा अनुभव असो, वेगाने घडणाऱ्या हालचाली असोत किंवा दैनंदिन क्षण असोत. सॅमसंगची खास नाइटोग्राफी क्षमता कमी प्रकाशातही अधिक सुस्पष्ट फोटो कॅप्चर करण्यास मदत करते, तर फोटो असिस्ट नैसर्गिक भाषेतील सूचनांचा (प्रॉम्प्ट्स) वापर करून फोटोंमध्ये सुधारणा करणे अधिक सोपे बनवते.
जेमिनी ओम्नीच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या गॅलरीतील फोटो आणि व्हिडिओंचा वापर करून व्हिडिओ क्लिप्स तयार आणि एडिट करू शकतात, ज्यामुळे दैनंदिन आठवणींचे रूपांतर सहज शेअर करण्यायोग्य कंटेंटमध्ये करता येईल. पात्र वापरकर्त्यांसाठी गॅलेक्सी एस२६ एफईमध्ये सहा महिन्यांची गुगल एआय प्रो ट्रायल# समाविष्ट आहे, जे प्रगत एआय क्षमता आणि ५ टीबी क्लाउड स्टोरेजची सुविधा उपलब्ध करून देते.
तुमच्या गरजेनुसार जुळवून घेणारे गॅलेक्सी एआय
गॅलेक्सी एस२६ एफई अत्याधुनिक वन यूआय ९* सह येतो, जे दैनंदिन संभाषणे आणि वापर अधिक सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले अनेक कॉन्टेक्स्ट-अवेअर गॅलेक्सी एआय अनुभव प्रदान करते.
अद्ययावत केलेले नाऊ ब्रीफ कस्टमाइझ करता येण्याजोगे ब्रीफिंग कार्ड्स, हवामानाचे अपडेट्स आणि आरोग्याविषयक माहितीच्या माध्यमातून अधिक वैयक्तिकृत माहिती देते. वापरकर्ते साध्या प्रॉम्प्टद्वारे स्वतःचे कार्ड्स देखील तयार करू शकतात. नाऊ ब्रीफ निवडक थर्ड-पार्टी अॅप्स आणि नोटिफिकेशन्समध्ये संदर्भित सूचनांचा विस्तार करते, ज्यामुळे वापरकर्त्यांना दिवसभरात नजच्या माध्यमातून संबंधित माहिती मिळवणे आणि आवश्यक कृती करणे सोपे होते.
दरम्यान, सर्कल टू सर्च विथ गुगल आता वापरकर्त्यांना एकाच वेळी अनेक गोष्टी शोधण्याची सुविधा देते, ज्यामुळे उत्पादने, ठिकाणे, वस्तू आणि बरेच काही ओळखणे अधिक सोपे होते.
दिवसभरासाठी ऊर्जा आणि शक्तिशाली कार्यक्षमता
गॅलेक्सी एस२६ एफईमध्ये ४९०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी ४५ वॅट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. ज्यामुळे ४५ वॅट अॅडॉप्टरसह जवळपास ३० मिनिटांत ६९ टक्यांेक पर्यंत चार्जिंग होते.
६.७ इंच डायनॅमिक एएमओएलईडी २एक्स डिस्प्ले १२० हर्ट्झपर्यंत रिफ्रेश रेट देतो, ज्यामुळे स्ट्रीमिंग, गेमिंग, ब्राउझिंग आणि सर्जनशील कामांसाठी अत्यंत स्मूथ व्हिज्युअल्स मिळतात. १९०० निट्सपर्यंत ब्राइटनेससह हा डिस्प्ले दैनंदिन वापरादरम्यान विलोभनीय व्ह्यूइंग अनुभव देण्यासाठी डिझाइन केला आहे.
गॅलेक्सी एस२६ एफईच्या केंद्रस्थानी ३एनएम प्रक्रियेवर आधारित एक्सिनॉस २५०० प्रोसेसर आहे, जो या डिवाईसला प्रगत परफॉर्मन्स आणि एआय क्षमता प्रदान करतो.
हा स्मार्टफोन पाणी आणि धुळीच्या प्रतिकारासाठी आयपी६८ रेटिंगसह येतो, ज्यामुळे दैनंदिन वापरामध्ये टिकाऊपणा वाढतो. दीर्घकाळ कार्यरत राहण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला स्मार्टफोन गॅलेक्सी एस२६ एफई दीर्घकालीन वापरासाठी डिझाइन करण्यात आला आहे, जो जागतिक लाँचच्या तारखेपासून सात पिढ्यांपर्यंतच्या ओएस अपग्रेड्सना आणि सात वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सना सपोर्ट करतो. ज्यामुळे वापरकर्ते आगामी अनेक वर्षांपर्यंत अद्ययावत वैशिष्ट्यांचा आनंद घेऊ शकतात आणि सुरक्षित राहू शकतात.
अपग्रेड केलेले स्मार्ट स्विच गॅलेक्सीकडे स्थलांतरित होणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे करते. अँड्रॉइड किंवा आयओएस डिवाईसवरून स्विच करताना, वापरकर्ते कोणत्याही अतिरिक्त अॅप्सची गरज न पडता पासवर्ड्स, पासकीज, कॉल हिस्ट्री, अॅक्सेसिबिलिटी सेटिंग्ज आणि ई-सिम डेटा यांसह डेटा वायरलेस पद्धतीने ट्रान्सफर करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करू शकतात, ज्यामुळे सेटअप प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान होते.
एकत्रितपणे ही वैशिष्ट्ये भारतातील वापरकर्त्यांसाठी गॅलेक्सी एस२६ एफई विश्वासार्ह आणि भविष्याकरिता सुसज्ज अनुभव प्रदान करेल याची खात्री करतात.
मॉडेल रॅम/स्टोरेज रंग किंमत गॅलेक्सी एस२६ एफई ८/२५६ जीबी पिस्ताचिओ, ब्ल्यूबेरी, ग्रॅफाइट ७९,९९९ रुपये
किंमत आणि उपलब्ध
एस२६ एफई खरेदी करणारे ग्राहक खालील ऑफर्समधून निवड करू शकतात:
1. अपग्रेड बोनस: तुमचे जुने डिवाईस एक्सचेंज केल्यावर ८,००० रुपयांपर्यंतचा अपग्रेड बोनस मिळवा.
2. ईएमआय पर्याय: निवडक एनबीएफसी भागीदारांसह ३० महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट ईएमआयचा लाभ घ्या, सोबत ३,००० रुपयांचा अतिरिक्त अपग्रेड बोनस मिळवा.
3. बँक कॅशबॅक: प्रमुख बँक कार्ड्सवर ७,००० रुपये कॅशबॅक मिळवा किंवा १२ महिन्यांचा नो-कॉस्ट बँक ईएमआय पर्याय निवडा.
4. ई-स्टोअर खरेदीसाठी, ग्राहक १८ महिन्यांच्या बँक ईएमआयचा लाभ घेऊ शकतात.

0 Comments