नवी दिल्ली | सप्टेंबर २०२६ : ग्राहकांना अधिक निरोगी, सुरक्षित आणि समाधानी जीवन जगण्यास मदत करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या जीवन विमा कंपनी अविवा लाइफ इन्शुरन्स कंपनी इंडिया लिमिटेडने रिटर्न ऑफ प्रीमियम्ससह टर्म इन्शुरन्स प्लॅनच्या नव्या प्रस्तावाची घोषणा केली आहे. अविवा स्मार्ट रिटर्न ऑफ प्रीमियम टर्म प्लॅन अंतर्गत, पॉलिसीधारक मुदतपूर्तीपर्यंत जिवंत राहिल्यास भरलेल्या एकूण प्रीमियमची रक्कम परत मिळणार आहे.
ग्राहक संरक्षण आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन या दोन्ही गरजा पूर्ण करणाऱ्या आर्थिक उपायांच्या शोधात असल्याने हा प्रस्ताव टर्म इन्शुरन्सचा मुख्य लाभ आणि पॉलिसीच्या मुदतीच्या शेवटी मिळणारा निश्चित परतावा यांना एकत्र आणतो. ही योजना पॉलिसीच्या मुदतीदरम्यान जीवन संरक्षण प्रदान करते आणि पॉलिसीच्या मुदतीच्या अखेरीस हयात असल्यास पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून भरलेल्या एकूण प्रीमियमच्या १०५% रिटर्न देते.
हा प्रस्ताव ग्राहकांना पात्रतेचे निकष आणि पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून १० ते ३० वर्षांपर्यंतची पॉलिसी मुदत आणि ५ लाख रूपये ते ५० लाख रूपयांपर्यंतचे लाइफ प्रोटेक्शन निवडण्याची लवचिकता देतो. ग्राहक १८ ते ६० वर्षे वयोगटात या योजनेत सामील होऊ शकतात. त्यात मुदतपूर्तीच्या वेळी कमाल वय ७५ वर्षे असेल.
ग्राहक अपघाती हानी आणि गंभीर आजारांचा समावेश असलेल्या ऐच्छिक रायडर्सद्वारे आपले संरक्षण अधिक वाढवू शकतात. ही योजना प्रीमियम भरण्याच्या वारंवारतेमध्ये लवचिकता आणि पती/पत्नी आणि/किंवा मुलांसाठी पॉलिसीचे लाभ सुरक्षित ठेवण्यास मदत करण्यासाठी मॅरिड विमेन प्रॉपर्टी अॅक्टअंतर्गत (MWPA) पॉलिसी खरेदी करण्याचा पर्याय देखील देते.
टर्मन इन्शुरन्स विथ रिटर्न ऑफ प्रीमियम (टीआरओपी)ची प्रमुख वैशिष्टे:
• १०५% प्रीमियम परतावा: पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या सापेक्ष भरलेल्या एकूण प्रीमियमच्या १०५% रक्कम मुदतपूर्तीनंतर परत मिळवा.
• लवचिक पॉलिसी मुदत: वैयक्तिक संरक्षणाच्या गरजेनुसार १० ते ३० वर्षांपर्यंतची पॉलिसी मुदत निवडा.
• वाढीव संरक्षण: उपलब्ध अपघाती नुकसान आणि गंभीर आजार रायडर्सद्वारे संरक्षण वाढवण्याचा पर्याय.
• लवचिक प्रीमियम भरणा: मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक प्रीमियम भरण्याच्या वारंवारतेमधून निवड.
• एमडब्ल्यूपीए पर्याय: मॅरिड विमेन प्रॉपर्टी अॅक्टअंतर्गत पती/पत्नी आणि/किंवा मुलांसाठी पॉलिसीचे लाभ सुरक्षित करण्याचा पर्याय.
• पॉलिसी कर्ज: पॉलिसी अटींच्या सापेक्ष सरेंडर मूल्याच्या ८०% पर्यंत कर्ज मिळेल.
• कर लाभ: प्रचलित कर कायद्यांनुसार कर लाभ.
या योजनेच्या शुभारंभावर भाष्य करताना अवीवा लाईफ इन्शुरन्सचे सीईओ आणि एमडी, श्री. असित रथ म्हणाले, “आजचे ग्राहक अशा विमा (संरक्षण) उपायांच्या शोधात आहेत, जे महत्त्वपूर्ण आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासोबतच पॉलिसीच्या कालावधीत उपलब्ध होणाऱ्या लाभांविषयी अधिक स्पष्टता देतात. आमच्या 'टर्म इन्शुरन्स विथ रिटर्न ऑफ प्रीमियम' या योजनेद्वारे आम्ही जीवन संरक्षण आणि लागू प्रीमियमचा निश्चित परतावा एकत्र आणत आहोत.
अविवा लाईफ इन्शुरन्समध्ये आमचा दृष्टिकोन केवळ संरक्षणापुरता मर्यादित नाही, तर निरोगी जीवनशैली, सकारात्मक सवयी आणि भविष्यासाठी अधिक चांगली तयारी यांना प्रोत्साहन देऊन आमच्या ग्राहकांच्या सर्वांगीण कल्याणाला पाठिंबा देतो. समर्पक आणि ग्राहककेंद्री उपायांद्वारे व्यक्ती आणि कुटुंबांना आत्मविश्वासाने अधिक निरोगी, अधिक सुरक्षित आणि अधिक चांगल्या प्रकारे तयार असलेले जीवन जगण्यास मदत करण्याचे आमचे ध्येय आहे.”
अविवा लाईफ इन्शुरन्सचे चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर श्री. रजत श्रीवास्तव म्हणाले, “अविवा लाईफ इन्शुरन्समध्ये आमचे वितरणाचे लक्ष ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आर्थिक प्राधान्यांशी सुसंगत असलेल्या संरक्षण उपायांसह अधिक व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्यावर आहे. टर्म इन्शुरन्स विथ रिटर्न ऑफ प्रीमियम आमचा संरक्षण पोर्टफोलिओ अधिक मजबूत करतो आणि आमच्या वितरण समूहांनाजीवनाच्या विविध टप्प्यांवरील ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी एक नवीन संधी देतो. तसेच कुटुंबांना अधिक दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा निर्माण करण्यास मदत करतो. आम्ही विविध माध्यमांतून आणि बाजारपेठांमधून आमची पोहोच मजबूत करत असताना आणि ग्राहकांशी असलेला संवाद अधिक दृढ करत असताना ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ या व्यापक उद्योग दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
या शुभारंभामुळे ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार आपल्या संरक्षण पोर्टफोलिओमध्ये बदल करण्यावर अविवा लाईफ इन्शुरन्सने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. अविवा लाईफ इन्शुरन्स आर्थिक संरक्षणासोबतच व्यक्ती आणि कुटुंबांना अधिक आर्थिक तयारी करण्यास आणि सर्वांगीण कल्याणासाठी सकारात्मक व प्रतिबंधात्मक दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रोत्साहन देत आहे.
अविवा लाईफ इन्शुरन्सबद्दल: अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनी इंडिया लिमिटेड ही यूके-स्थित अविवा इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेडच्या (एआयएच) पूर्ण मालकीची (१००%) उपकंपनी आहे. हा एक विमा समूह असून त्याला १६९६ सालापासूनचा समृद्ध वारसा लाभला आहे. संरक्षणाकडून प्रतिबंधाकडे वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध असलेली अविवा लाईफ इन्शुरन्स ग्राहकांना त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करताना अधिक चांगल्या सवयी लावण्यासाठी मदत करते. टर्म इन्शुरन्स, सेव्हिंग्ज, युलिप आणि रिटायरमेंट सोल्युशन्सच्या आपल्या श्रेणीद्वारे, तसेच आरोग्यकेंद्री सेवा आणि ग्राहककेंद्री उपक्रमांच्या साहाय्याने अविवा लाईफ इन्शुरन्स ग्राहकांना सर्वात महत्त्वाच्या गोष्टींचे संरक्षण करण्यास आणि आत्मविश्वासाने भविष्यासाठी नियोजन करण्यास मदत करते.
वेबसाइट : www.avivaindia.com

0 Comments