Business

Header Ads

मैक्स हेल्थकेअर फाउंडेशनने मैक्स मेडिकल स्कॉलरशिपचा विस्तार केला; चौथ्या वर्षात २५० गुणवंत एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य !

थोडक्यात पण महत्त्वाचे

• यावर्षी वार्षिक शिष्यवृत्ती प्रवेशसंख्या १०० विद्यार्थ्यांवरून २५० विद्यार्थ्यांपर्यंत वाढवण्यात आली असून, या कार्यक्रमाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे
• मैक्स मेडिकल स्कॉलरशिप प्रोग्राम हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना पाठबळ देण्याच्या फाउंडेशनच्या उद्देशाशी सुसंगत आहे
• चौथ्या वर्षात प्रवेश करताना, हा उपक्रम पाच वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीत सर्वसमावेशक आर्थिक सहाय्य देत राहणार आहे

नागपूर, सप्टेंबर २०२६ : मैक्स हेल्थकेअर फाउंडेशनने आज आपल्या प्रमुख मैक्स मेडिकल स्कॉलरशिप प्रोग्रामच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रारंभाची घोषणा केली. यावर्षी वार्षिक प्रवेशसंख्या २५० नवीन विद्यार्थ्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे, जी मागील वर्षांतील १०० विद्यार्थ्यांच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे. या विस्तारामुळे कार्यक्रमाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढणार असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

या वर्षी नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) परीक्षेत पात्र ठरलेल्या आणि शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी दिल्ली एनसीआर, मुंबई, नागपूर, लखनऊ, मोहाली, डेहराडून, भटिंडा आणि भुवनेश्वर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवलेल्या २५० नवीन विद्यार्थ्यांपर्यंतच्या वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिष्यवृत्तीअंतर्गत केला जाणार आहे.

नवीन अर्जदारांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासोबतच, मैक्स मेडिकल स्कॉलरशिप प्रोग्राम मागील वर्षांत शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही अर्थसहाय्य सुरू ठेवणार आहे. हे विद्यार्थी आता वैद्यकीय शिक्षणाच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षात आहेत. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात सातत्यपूर्ण मदत सुनिश्चित होणार आहे.

मैक्स मेडिकल स्कॉलरशिप प्रोग्राम हा मैक्स हेल्थकेअर फाउंडेशनच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांचा एक भाग असून, वैद्यकीय क्षेत्रातील भावी व्यावसायिकांचे संगोपन आणि त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे.

या घोषणेबाबत बोलताना श्रीमती तरुणा सोई, चेअरपर्सन, मैक्स हेल्थकेअर फाउंडेशन म्हणाल्या, “आर्थिक अडचणींमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यापासून अनेकदा अडथळा निर्माण होतो. गेल्या तीन वर्षांत मैक्स मेडिकल स्कॉलरशिप प्रोग्रामने २४५ विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मदत केली आहे. यावर्षी आम्ही या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करून २५० नवीन विद्यार्थ्यांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

यामुळे अनेक अधिक पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींच्या ओझ्याशिवाय डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल. या भावी वैद्यकीय व्यावसायिकांना पाठबळ देऊन आम्ही केवळ वैयक्तिक आकांक्षांना सक्षम करत नाही, तर गुणवत्तेला प्रोत्साहन देत आहोत, व्यवस्थात्मक अडथळे दूर करत आहोत आणि अधिक समावेशक व निरोगी भविष्य घडवत आहोत.”

या शिष्यवृत्तीसाठी नोंदणी १६ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे (www.maxhealthcarefoundation.org).मैक्स मेडिकल स्कॉलरशिप ही भारतातील वैद्यकीय शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या वार्षिक शिष्यवृत्ती अनुदानांपैकी एक आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ५ वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी सर्वसमावेशक आर्थिक सहाय्य दिले जाईल. या शिष्यवृत्तीअंतर्गत ट्युशन फी, लॅपटॉप, पाठ्यपुस्तके तसेच बोन सेट, डिसेक्शन किट, स्टेथोस्कोप यांसारखी साधने, मासिक खर्चासाठी भत्ता आणि मार्गदर्शनाच्या (मेंटॉरशिप) संधी यांचा संपूर्ण खर्च समाविष्ट असेल.

अर्ज ४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत स्वीकारले जातील. निवड प्रक्रियेत अर्जांचे परीक्षण, 
शॉर्टलिस्टिंग, मुलाखती आणि अनिवार्य कागदपत्रांची पडताळणी अशा अनेक टप्प्यांचा समावेश असेल. या २५० विद्यार्थ्यांपर्यंतच्या शिष्यवृत्तीधारकांची निवड मैक्स हेल्थकेअर फाउंडेशनच्या ज्युरीकडून कठोर मूल्यांकन निकषांच्या आधारे केली जाईल.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी, दिल्ली एनसीआर, मुंबई, नागपूर, लखनऊ, मोहाली, डेहराडून, भटिंडा आणि भुवनेश्वर येथील प्रतिष्ठित सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज www.maxhealthcarefoundation.org वर उपलब्ध आहेत.

शिष्यवृत्तीसाठी पात्रता निकषांची मार्गदर्शक तत्त्वे :

• अर्ज ४ ऑक्टोबरपर्यंत खुले आहेत. विद्यार्थी www.maxhealthcarefoundation.org वर अर्ज भरून सादर करू शकतात.
• मैक्स हेल्थकेअरच्या सोशल मीडिया हँडल्सवरही कार्यक्रमाबाबत वेळोवेळी अद्ययावत माहिती शेअर केली जाईल.
• निवड प्रक्रियेत विविध सामाजिक-आर्थिक निकष आणि नीट रँक यांचे सविस्तर मूल्यांकन व पडताळणी केली जाईल.
• एमएचआयएल ला आपल्या विवेकाधिकारानुसार कोणत्याही वेळी अटींमध्ये बदल, सुधारणा, भर किंवा काही भाग वगळण्याचा अधिकार आहे. कृपया वेबसाइटवरील अटी आणि कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वांमध्ये होणारे बदल जाणून घेण्यासाठी वेळोवेळी वेबसाइट तपासा.

मॅक्स हेल्थकेअर फाउंडेशनविषयी :

मॅक्स हेल्थकेअर फाउंडेशन हे भारतातील सर्वात मोठ्या हॉस्पिटल चेनपैकी एक असलेल्या मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट लिमिटेड (एमएचआयएल) च्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांचे प्रतिनिधित्व करते. शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि जल शाश्वतता या क्षेत्रांमध्ये कार्य करून वंचित आणि गरजू समुदायांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.स्थापनेच्या पहिल्याच वर्षी फाउंडेशनने दोन प्रमुख उपक्रम सुरू केले. मॅक्स मेडिकल स्कॉलरशिप ही भारतातील वैद्यकीय शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या वार्षिक शिष्यवृत्ती अनुदानांपैकी एक आहे. 

मॅक्स स्किल ट्रेनिंग फॉर सस्टेनेबल लाइव्हलीहुड्स या उपक्रमांतर्गत तिहार येथील १७०० विचाराधीन कैद्यांना टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी स्किल कौन्सिल (टीएचएससी) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) लेव्हल ४ अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांना हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील औपचारिक रोजगाराच्या संधी मिळवून देण्यावर भर देण्यात आला.जल शाश्वततेच्या क्षेत्रात, ग्रामीण भागातील तसेच मॅक्स हेल्थकेअरच्या सुविधांच्या आसपासच्या समुदायांमधील जलस्रोतांचे पुनर्भरण करून मार्च २०२५ पर्यंत १००% जल-न्यूट्रल होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments