Business

Header Ads

दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये लंग आयसोलेशन तंत्रावर सीएमई आणि प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन !

नागपूर, 30 ऑक्टोबर : अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता मेघे मेडिकल कॉलेजच्या एसईएल आणि एससी येथील अॅनेस्थेसियोलॉजी विभागाने, सोसायटी ऑफ कार्डिओथोरॅसिक अॅ्नेस्थेसियोलॉजिस्ट्स नागपूर (SCAN) यांच्या सहकार्याने ISOLATE 2026 या सीएमई आणि प्रात्यक्षिक कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले. या कार्यशाळेचा विषय ‘लंग आयसोलेशन टेक्निक्स: प्रेडिक्ट, आयसोलेट अँड प्रोटेक्ट’ हा होता. 

या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून 60 प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, पदव्युत्तर विद्यार्थी आणि अॅनेस्थेसियोलॉजी विभागातील प्राध्यापकांचा समावेश होता. एका फुफ्फुसाद्वारे श्वसन सुरू ठेवणे (वन- लंग व्हेंटिलेशन) आणि फुफ्फुसांचे विलगीकरण करण्याच्या तंत्रांबाबत ज्ञान व व्यावहारिक कौशल्य वाढवणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. यामध्ये तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन एआयएचईआरचे मुख्य सेवा अधिकारी रवींद्र मेहरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश अग्रवाल, एसएमएचआरसीचे मुख्य धोरणात्मक सल्लागार डॉ. अनुप मरार, एफएमटी विभागाचे प्राध्यापक व प्रमुख डॉ. प्रकाश मोहिते, SCANचे अध्यक्ष डॉ. एस. के. देशपांडे, सिनियर अॅानेस्थेसियोलॉजिस्ट्स डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. प्रतिभा देशमुख, आयोजन समितीच्या अध्यक्षा आणि अॅनेस्थेसियोलॉजी विभागाच्या प्राध्यापिका व प्रमुख डॉ. अंजली मोडक बोरकर तसेच आयोजन सचिव आणि SCANच्या मानद सचिव डॉ. रुपाली शेंद्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यशाळेतील वैज्ञानिक सत्रांचे संचालन डॉ. वैशाली शेलगावकर, डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. केतकी रामटेके, डॉ. मनीष सोनकुसळे, डॉ. सम्राट मदनाईक, डॉ. अवंतिका जयस्वाल आणि डॉ. यतीन खैरनार यांनी केले. या सत्रांचे अध्यक्षपद डॉ. प्रतिभा देशमुख, डॉ. लुलू फातिमा वली, डॉ. हीना पाहुजा, डॉ. एस. के. देशपांडे, डॉ. मेघा ताजणे आणि डॉ. सोनाली खोब्रागडे यांनी भूषवले.

या प्रशिक्षण कार्यशाळेत प्राध्यापकांमध्ये डॉ. मनीष सोनकुसळे, डॉ. गुंजन बडवाईक, डॉ. प्रियांका पराते, डॉ. सम्राट मदनाईक, डॉ. कीर्ती गुजरकर, डॉ. केतकी रामटेके, डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. अवंतिका जयस्वाल, डॉ. प्राची कोरडे, डॉ. यतीन खैरनार, डॉ. रोशनी मनवानी आणि डॉ. अदीबा सिद्दिकी यांनी प्रशिक्षण दिले. त्यांनी श्वसनमार्गाचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रतिकृती, लंग मॉडेल्स आणि आधुनिक सिम्युलेटरच्या मदतीने सहभागींना प्रत्यक्ष सरावाचे मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (MMC) या कार्यक्रमासाठी दोन क्रेडिट पॉइंट्स दिले. कार्यशाळेच्या शेवटी सहभागी डॉक्टरांची चाचणी घेण्यात आली. कार्यक्रमातील शैक्षणिक माहिती आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग याबद्दल सहभागी डॉक्टरांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

Post a Comment

0 Comments