थोडक्यात पण महत्त्वाचे
२२ कॅरेट सोन्याचे नाणे आणि आकर्षक कलाकुसरीच्या डिझाइन्ससह साजरा करा समृद्धी आणि नवारंभाचे प्रतीक असलेल्या सोन्याचा उत्सव!
राष्ट्रीय : सोनाटाने आपल्या 'सोनाटा गोल्ड' कलेक्शनची नवी आवृत्ती सादर केली आहे. त्यामुळे आता धनत्रयोदशीच्या मुहूर्तासाठी गोल्ड-लेड घड्याळांमध्ये उत्कृष्ट डिझाइन आणि रंगांचे नावीन्यपूर्ण पर्याय उपलब्ध झाले आहेत. सोन्याला आपण समृद्धी, सौभाग्य आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानतो. याच पारंपरिक भावनेचा आदर करत, हे कलेक्शन रोजच्या वापरासाठी आधुनिक आणि आकर्षक डिझाइन्स प्रस्तुत करते. अतिशय देखणी कलाकुसर असलेले नवीन 'सोनाटा गोल्ड' कलेक्शन सणांच्या पेहरावाला व्यक्तिगत लूक देते; त्यामुळे आता सोन्याप्रती मंगल भावना केवळ सणांपुरती मर्यादित न राहता, अगदी रोजच्या रोज मनगटावर अभिमानाने मिरवता येईल. पारंपरिक महत्त्व आणि रोजची स्टाईल यांचा सुरेख संगम साधणारे हे कलेक्शन सणांच्या खरेदीला अधिक अर्थपूर्ण बनवते. तुमची स्वतःची स्टाईल आणि उत्सवाचा आनंद यांचा सुंदर मिलाप साधण्याची ही सुवर्णसंधी आहे.
नवीन 'सोनाटा गोल्ड' कलेक्शन निळ्या आणि हिरव्या अशा दोन ताज्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्याला आकर्षक गोल्ड-टोन बेझलची जोड देण्यात आली आहे. घड्याळाच्या डायलवरील सुरेख डिझाईन पॅटर्न त्याचा लूक अधिकच खुलवते. खालच्या बाजूला मध्यभागी असलेले २२ कॅरेट सोन्याचे नाणे या घड्याळाचे सर्वात मुख्य आकर्षण आहे, याच्या भोवती एक सुंदर आऊटलाईन रिंग देण्यात आली आहे. सध्या सोन्याचा दर प्रति ग्रॅम सुमारे ₹१४,४०० वर पोहोचला असताना, हे कलेक्शन सोन्याची खरेदी अधिक बजेटमध्ये आणि सोपी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे ग्राहकांना धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याची आपली पारंपरिक प्रथा आधुनिक पद्धतीने साजरी करता येणार आहे.
या कलेक्शनमधील प्रत्येक घड्याळ धनत्रयोदशीचा सण साजरा करण्यासाठी एक उत्तम आणि विचारपूर्वक निवडलेला पर्याय ठरते. घड्याळाच्या क्राऊनवरील नाजूक कलाकुसर, आकर्षक इंडायसेस, नव्या डिझाईनची मिनिट रिंग आणि अधिक स्पष्ट काटे, यामुळे घड्याळाला उत्कृष्ट फिनिशिंग लूक मिळतो आणि वेळ पाहणे अधिक सोपे होते. सोन्याचे पारंपरिक महत्त्व आणि फॅशनेबल डिझाईन यांचा उत्तम मेळ या कलेक्शनमध्ये साधण्यात आला आहे. सणांचा शुभ आनंद रोजच्या आयुष्यातही जपण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी ही एक आगळीवेगळी आणि खास निवड ठरते.
ब्रँड हेड - सोनाटा, टायटन कंपनी लिमिटेड, पुलक नारायण म्हणाले, "सोनाटा गोल्ड हे आमच्या ब्रँडचे मुख्य कलेक्शन आहे. उत्कृष्ट डिझाईनची कलाकुसर आणि सोन्याचे मूल्य यांचा सुरेख संगम यात घडवला असून, धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्ताशी घट्ट नाते जोडण्याचा आमचा उद्देश आहे. आमच्या ग्राहकांना मौल्यवान आणि पारंपरिक तसेच सणाच्या आनंदापलीकडेही वर्षानुवर्षे टिकणाऱ्या गोष्टी खरेदी करण्याची सुवर्णसंधी 'सोनाटा गोल्ड'च्या माध्यमातून आम्ही देत आहोत. या वर्षी धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर आम्ही सादर करत असलेले हे नवीन 'सोनाटा गोल्ड' कलेक्शन एक पाऊल पुढे टाकणारे आहे. यात डिझाईन, प्रीमियम मटेरिअल्स आणि विचारपूर्वक केलेल्या कलाकुसरीवर अधिक भर देण्यात आला आहे, ज्यामुळे कलेक्शनचे पारंपरिक आणि वांशिक मूळ जपण्यासोबतच त्याला आधुनिक लूक मिळाला आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की, हे कलेक्शन आमच्या ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल आणि 'सोनाटा गोल्ड' नेहमीप्रमाणेच आमचे सर्वात जास्त विकले जाणारे कलेक्शन ठरेल.”
नवे 'सोनाटा गोल्ड' कलेक्शन म्हणजे उत्कृष्ट कलाकुसर आणि रोजचा सहजसुलभ वापर यांचा सुंदर मिलाप आहे. धनत्रयोदशीला स्वतःसाठी खरेदी करायची असो किंवा प्रियजनांना भेट द्यायची असो, नवीन 'सोनाटा गोल्ड' कलेक्शन ही आपली सुवर्णपरंपरा पुढे नेण्याची आधुनिक पद्धत आहे. ८,६९५ पासून सुरू होणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेले नवे 'सोनाटा गोल्ड' कलेक्शन सर्व 'टायटन वर्ल्ड' स्टोअर्स, अधिकृत रिटेल आउटलेट्स, प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध असेल. यंदाच्या सणासुदीला सोन्याचा आधुनिक आणि पिढ्यानपिढ्या जपून ठेवावा असा ठेवा नक्की खरेदी करा.

0 Comments