नागपुर : भक्तिसंगीत रामभक्ती आणि सामहिक गायनाचा अनोखा संगम असलेली 'गंज ऑफ सीताराम' ही नागपातील सर्वात मोठी झिरो माईल यूथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात लोकप्रिय चित्रपट 'हनुमान अंश'ची टीम आपल्या संगीताची प्रस्तुती करणार आहे. मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
'हनुमान अंश' हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पाच दशकांपूर्वी देहत्याग केलेल्या नीम करोली बाबा यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक विशाल चतुर्वेदी, संगीत दिग्दर्शक शंतनू सुदामे आणि धीरेंद्र मुलकलवार, गायक साधू सुशील तिवारी आणि सुनील लोधी यांच्यासह चित्रपटाची सुमारे २० जणांची टीम या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
या चित्रपटातील 'हे खरारी', 'पार्वती' आणि 'जय हनुमान' यांसारखी भक्तिगीते लोकप्रिय ठरली आहेत. ही गीते या कार्यक्रमात सादर केली जाणार असून, संगीतप्रेमीना चित्रपटाच्या टीमसोबत भक्तिसंगीताचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
'संगीत में भक्ति, भक्ति में सभी का संग' या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात सामूहिक गायन, भजन, सूफी संगीत, रामभक्ती आणि लाइव्ह जॅमिंगच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण अनुभवता येणार आहे. नागपूरमधील सर्वात मोठी भजन जॅमिंग बैठक म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम विनामूल्य असला तरी प्रवेशिकांद्वारेच कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला जाणार आहे. प्रथम येणा-यास प्रथम प्रवेश या तत्वावर बैठक व्यवस्था राहील. युवक, महिला आणि पुरुषांसह सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेला झिरो माईल यूथ फाउंडेशनचे कल्याण देशपांडे, प्रशांत कुकडे आणि समय बनसोड, जॅमिंग बैठकचे मयूर मोटवानी, नो डिफरन्स फाउंडेशन आणि हाफ टाइमचे हिमांशू अरमारकर, माहौलचे यश तुमाने आणि पारस रोकडे तसेच माधव नेत्रालयाचे सागर गभणे उपस्थित होते.

0 Comments