नागपूर, 23 नोव्हेंबर 2025 : नागपूर येथील मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटलला प्रतिष्ठित द वीक-हंसा रिसर्च सर्व्हे 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट मल्टीस्पेशियलिटी हॉस्पिटल (खाजगी) म्हणून आपले नंबर 1 रँकिंग जाहीर करताना अभिमान वाटत आहे. ही मान्यता हॉस्पिटलच्या प्रगत आरोग्यसेवा, वैद्यकीय उत्कृष्टता आणि रुग्ण-केंद्रित सेवांबद्दलच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला अधोरेखित करते.
पूर्वी अॅलेक्सिस हॉस्पिटल म्हणून ओळखले जाणारे आणि आता मैक्स हेल्थकेअरचा भाग असलेले हे हॉस्पिटल, सलग सहा वर्षांपासून द वीक-हंसा रिसर्च सर्व्हेमध्ये "मल्टीस्पेशियलिटी हॉस्पिटल (खाजगी)" म्हणून नंबर वन वर आहे.
द वीक-हंसा रिसर्च सर्व्हे हे भारतातील सर्वात विश्वासार्ह आरोग्यसेवा मूल्यांकनांपैकी एक आहे, ज्यामध्ये हॉस्पिटलची संपूर्ण प्रतिष्ठा, डॉक्टरांची वैद्यकीय कौशल्ये, पायाभूत सुविधा, संशोधन,नवोन्मेष आणि रुग्णसेवा यासारख्या प्रमुख निकषांवर हॉस्पिटलचे मूल्यांकन केले जाते. हे रँकिंग देशभरातील आरोग्यसेवा तज्ञांच्या प्राथमिक सर्वेक्षणावर आधारित असते, ज्यामध्ये त्यांच्याशी संबंधित असलेल्या संस्थांचे मूल्यांकन वगळले जाते.
या यशाबद्दल बोलताना, मैक्स हॉस्पिटल, नागपूरचे व्हाइस प्रेझिडेंट – हॉस्पिटल ऑपरेशन्स श्री घनश्याम गुसानी यांनी म्हणाले, “हा पुरस्कार आमच्या टीम्सच्या रुग्णसेवेत दाखविलेल्या समर्पण आणि वैद्यकीय उत्कृष्टतेची दखल घेतो. आमचे लक्ष नेहमीच रुग्णांची सुरक्षा, सहानुभूतिशील आणि उच्च दर्जाची अनुभवदायक सेवा प्रदान करण्यावर असते. प्रत्येक संवाद आणि प्रत्येक वैद्यकीय प्रक्रिया ही गुणवत्तापूर्ण काळजी घेण्याची आमची वचनबद्धता पुन्हा सिद्ध करण्याची संधी आहे.”
श्री गुसानी पुढे म्हणाले,“ आमच्यासाठी हा पुरस्कार फक्त रँकिंग नाही, तर हजारो कुटुंबांबद्दल असलेल्या आमच्या जबाबदारीची आठवण आहे, जे उपचार, आराम आणि मनःशांती शोधण्यासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये येतात. हा पुरस्कार आमच्या सेवेची कटिबद्धता आणखी मजबूत करतो, जी फक्त वैद्यकीय दृष्ट्या उत्कृष्ट नाही तर मानवी दृष्टीनेही काळजी घेणारी आहे.”
नागपूर येथील मैक्स हॉस्पिटल, या उपलब्धिमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांच्या वैद्यकीय टीमचे, रुग्णांचे आणि भागीदारांचे आभार मानते आणि सर्वांना सुलभ, सर्वसमावेशक आणि सहानुभूतिपूर्ण आरोग्यसेवा देण्याचे त्यांचे ध्येय पुढे चालू ठेवण्यास उत्सुक आहे.

0 Comments