Business

Header Ads

वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरमध्ये अत्याधुनिक रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुरुवात रुग्णांना पुन्हा वेदनारहित चालण्याची नवी संधी !

थोडक्यात पण महत्त्वाचे

मिसो रोबोटिक सिस्टीममुळे जागतिक दर्जाचे ऑर्थोपेडिक (हाडांचे) तंत्रज्ञान आता आपल्या शहरातच उपलब्ध झाले आहे. ज्याचा फायदा नागपूर, विदर्भ आणि मध्यप्रदेशातील रुग्णांना होईल.

नागपूर, 26 नोव्हेंबर 2025 : अत्यंत अचूक आणि रुग्ण-केंद्रित आरोग्यसेवेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत. वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूरने मिसो रोबोटिक सिस्टीमसह आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह अॅडव्हान्स्ड रोबोटिक नी रिप्लेसमेंट प्रोग्राम सुरू केला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अधिक अचूक. सुरक्षित आणि कमी वेदनादायी होते. त्यामुळे गुडघ्याच्या तीव्र संधिवाताने आणि सांध्यांच्या झिजेमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत होते आणि त्यांच्या चालण्याची क्षमता सुधारते.

हा कार्यक्रम विदर्भासाठी एक महत्वाचा टप्पा आहे. ज्यामुळे नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ आणि मध्यप्रदेशातील जबलपूर, छिंदवाडा यासारख्या शहरांमध्ये रुग्णांना जागतिक दर्जाचे हाडांविषयी (ऑर्थोपेडिक) उपचार सेवा मिळू शकणार आहे. या रोबोटिक सिस्टीममुळे वोक्हार्ट हॉस्पिटल रुग्णांना कमी दुखापतीची शस्त्रक्रिया आणि लवकर बरे होण्याची सुविधा देऊन त्यांना वेदनाशिवाय आणि आत्मविश्वासाने आपल्या दैनंदिन आयुष्यात परत येण्यास मदत करेल.

कॉम्प्रिहेन्सिव्ह अॅडव्हान्स्ड रोबोटिक नी रिप्लेसमेंट प्रोग्रामचा भाग म्हणून, वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर रुग्णांना शस्त्रक्रियापूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर सुरक्षित आणि सुलभ काळजी देते. रुग्णांची सविस्तर वैद्यकीय तपासणी डिजिटल इमेजिंग आणि रोबोटिक नियोजन करून प्रत्येक शस्त्रक्रिया रुग्णाच्या वैयक्तिक गरजेनुसार केली जाते. शस्त्रक्रियेनंतर, लवकर बरे होण्यासाठी लवकर हालचाल. वेदना नियंत्रण आणि नियोजित फिजिओथेरपीवर विशेष लक्ष दिले जाते. वैयक्तिक फिजिओथेरपी सत्रांमुळे रुग्णांची ताकद संतुलन आणि चालण्याची क्षमता सुधारते. ज्यामुळे ते आपल्या दैनंदिन कामकाजात लवकर आणि आत्मविश्वासाने परत येऊ शकतात.

या कार्यक्रमाचे उद्‌घाटन वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर सुश्री जहाबिया खोराकीवाला, वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे ग्रुप सीईओ डॉ. पराग रिंदानी, आणि वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरचे सेंटर हेड रवि बगली यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमात या क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांनी आपले मार्गदर्शन केले, ज्यामध्ये डॉ. रोमिल राठी, डॉ. मुकुंद अग्रवाल, डॉ. लघवेंदु शेखर, डॉ. आशिष ठाकूर, डॉ. स्वप्नील गाडगे, डॉ. शांतनू देशमुख आणि डॉ. अंबर दावरे हे रोबोटिक ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन उपस्थित होते

रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणाचे प्रमुख फायदे आणि वैशिष्ट्ये

मिसो रोबोटिक सिस्टीममुळे वोक्हार्ट हॉस्पिटल्स अचूक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. हे रुग्णांना अनेक फायदे देते. 

जसे की

इम्प्लांट बसवताना अधिक अचूकता आणि योग्य संरेखन

मांसपेशींना कमी इजा आणि शस्त्रक्रियेतील रक्तस्राव कमी

शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी होतात आणि लवकर रिकव्हरी होते

रुग्णालयात राहण्याचा वेळ कमी होतो. ज्यामुळे रुग्ण लवकर दैनंदिन जीवनात परत येऊ शकतात

तसेच इम्प्लांट जास्त काळ टिकतो ज्यामुळे चालण्याची क्षमता सुधारते आणि दीर्घकालीन समाधान मिळते.

प्रगत 30 व्हिज्युअलायझेशन आणि शस्त्रक्रियेच्या वेळेची माहिती वापरून हे रोबोटिक सिस्टीम प्रत्येक रुग्णाच्या गुडघ्याच्या रचनेनुसार शस्त्रक्रिया व्यक्तिगत पद्धतीने करण्यास सक्षम बनते. त्यामुळे हाडांची कापणी अचूक होते आणि सांध्यातील लिगामेंट्स योग्य संतुलनात राहतात. ज्यामुळे उपचारांचे परिणाम अधिक दीर्घकाल टिकतात.

सुश्री जहाबिया खोराकीवाला, मॅनेजिंग डायरेक्टर, वोक्हार्ट हॉस्पिटल्स म्हणाल्याः वोक्हार्टमध्ये आमचे उद्दिष्ट नेहमीच तंत्रज्ञानासोबत रुग्णांची काळजी घेऊन सर्वोत्तम आरोग्यसेवा देणे आहे. नागपूरमध्ये रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण सुरू करणे म्हणजे मध्य भारतातील रुग्णांना अत्यंत अचूक आणि कमी दुखापतीची शस्त्रक्रिया त्यांच्या स्वतःच्या शहरात उपलब्ध करून देण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे."

डॉ. पराग रिंदाणी, ग्रुप सीईओ, वोक्हार्ट हॉस्पिटल्स म्हणालेः रोबोटिक्स हा ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेचा भविष्यातला मार्ग आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण फक्त शस्त्रक्रियेची अचूकता वाढवत नाही तर रुग्णांच्या बरे होण्याच्या अनुभवालाही सुधारतो. ही प्रगती आमच्या वैद्यकीय उत्कृष्टतेच्या बांधिलकीची पुष्टी करते आणि ज्या प्रत्येक भागात आम्ही सेवा देतो तिथे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या आमच्या दृष्टीकोनाची खात्री देते.

श्री. रवि वगली, सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर म्हणाले: मिसो रोबोटिक सिस्टीमची सुरवात नागपूर आणि विदर्भासाठी अभिमानाचा क्षण आहे. आता रुग्णांना अत्याधुनिक गुडघा उपचारांसाठी मेट्रो शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. ते आता येथेच नागपूरमध्ये. जागतिक दर्जाची रोबोटिक शस्त्रक्रिया करू शकतात, ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो आणि परिणाम चांगले मिळतात "

Post a Comment

0 Comments