Business

Header Ads

नागपूरच्या एका ग्राहकाने याच वर्षी एकाच कार्टमध्ये स्मार्टफोन, सोन्याची नाणी आणि मांजरांचे खाद्य खरेदी करत 4.9 लाख रुपये केले खर्च !

नागपूर, 25 डिसेंबर 2025 : ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ओळखले जाणारे नागपूर आता अधिकृतपणे भारतातील वेगाने वाढणाऱ्या कन्झव्हिनियन्स-कॉमर्स शहरांपैकी एक ठरत आहे. भारतातील अग्रगण्य क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने आपल्या वार्षिक ग्राहक ट्रेंड अहवालाची पाचवी आवृत्ती हाऊ इंडिया इंस्टामार्टेड 2025 जाहीर केली असून, त्यानुसार नागपूरच्या ऑर्डर्समध्ये वर्षभरात तब्बल +84 टक्के वाढ नोंदली गेली आहे. 

यामुळे नागपूर भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या टियर-II बाजारांमध्ये सामील झाले आहे. फक्त किराणा मालापुरतेच हे मर्यादित राहिले नाही. शहरात जीवनशैलीत मोठा बदल दिसून आला आहे. याच वर्षी नागपूरमधील एका ग्राहकाने एकाच कार्टमध्ये स्मार्टफोन, सोन्याची नाणी आणि मांजरांचे खाद्य खरेदी करत 4.9 लाख रुपये खर्च केल्याची नोंद या अहवालाची वैशिष्ट्य ठरली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांच्या खरेदीत +502 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली असून, यामुळे शहरातील ग्राहक प्रीमियम तंत्रज्ञानाकडे अधिक झुकत असल्याचे स्पष्ट होते. त्याचबरोबर क्रीडा व फिटनेस श्रेणीत +513 टक्के वाढ नोंदली गेली आहे. रेसिस्टन्स बँड्स, डम्बेल्स आणि योगाचे साहित्य हे नव्या काळातील आवश्यक घटक बनले आहेत. हेल्थ व वेलनेस ही श्रेणी देशपातळीवर वेगाने पुढे येणाऱ्या प्रमुख विभागांपैकी एक ठरली असून, या लाटेत नागपूरही सहभागी झाले आहे. 

नागपूरच्या ग्राहकांचा आत्मविश्वास त्यांच्या कार्टमधूनही दिसून आला. वर्षभरात अनेक ग्राहकांनी 4 लाख रुपयांहून अधिक खर्च केला असून, यावरून नागपूरचे खरेदीदार प्रीमियम सोयीसुविधांपासून मागे हटत नसल्याचे सिद्ध होते. आणि हो, यावर्षी कार्टमध्ये सर्वाधिक महागड्या वस्तूंमध्ये आयफोन 17 मॉडेल्सचाही समावेश होता. यामुळे नागपूर एक उभरते टेक-पॉवरहाऊस म्हणून ओळख निर्माण करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

स्विगी चे चीफ बिझनेस ऑफिसर हरी कुमार जी म्हणाले, “भारतात क्विक कॉमर्स आता केवळ सोयीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आधुनिक भारतीय जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सुरुवातीला शेवटच्या क्षणी लागणाऱ्या वस्तू किंवा अचानक होणाऱ्या खरेदीपुरता मर्यादित असलेला हा प्रवास आता नियोजित खरेदी आणि मोठ्या किमतीच्या वस्तूंपर्यंत पोहोचला आहे, दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून ते प्रीमियम वस्तूंपर्यंत. तातडीची गरज असो, थोडी लक्झरी खरेदी असो किंवा रोजच्या वापरातील वस्तू असोत, लोकांना जे काही हवे आहे त्यासाठी इन्स्टामार्ट एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्वतःला सिद्ध करत आहे. आमच्याकडून अपेक्षित असलेली वेगवान आणि विश्वासार्ह सेवा देत राहणे, हेच आमचे वैशिष्ट्य आहे.”
 
2025 मध्ये नागपूरने सर्वाधिक काय ‘इन्स्टामार्ट’ केले

• स्नॅक्सची भक्कम ओळख असलेले शहर : बटाट्याचे वेफर्स, मसालेदार नमकीन, इन्स्टंट नूडल्स, चॉकलेट बिस्किटे आणि सॉफ्ट ड्रिंक्स यांनी वर्षभर नागपूरच्या चवींवर राज्य केले.
• गोडाची खास आवड: चॉकलेट कोटेड बिस्किटे आणि पारंपरिक चहासोबतचे खाण्याचे पदार्थ शहरातील सर्वाधिक पसंतीस उतरले. यावरून नागपूरची गोड आणि कुरकुरीत पदार्थांवरील खोल रुजलेली आवड दिसून येते.
• रात्रीही जागं असलेलं शहर: उशिरा खरेदी करणाऱ्या ग्राहकांमुळे कांदे, बटाटे आणि दूध यांची मोठी मागणी कायम राहिली.
• कधीही न झोपणारा परिसर: सीताबर्डी हा नागपूरमधील सर्वाधिक गजबजलेला भाग ठरला. या परिसरातून शहरातील इतर कोणत्याही भागापेक्षा जास्त ऑर्डर्स देण्यात आल्या.

नागपूरचे मोठे खर्च करणारे आणि धाडसी कार्ट्स

• 4 लाख रुपयांहून अधिक खर्च करणारे पाच ग्राहक: उच्च मूल्याच्या, विविध श्रेणींच्या कार्ट्स हीच आता शहराची ओळख बनली आहे. गॅजेट्स, वेलनेस साहित्य, स्नॅक्स, दैनंदिन किराणा, सणासुदीचे साहित्य आणि फिटनेस उपकरणांचा यात समावेश होता.
• प्रीमियम टेकची आवड: आयफोनने उच्च मूल्याच्या खरेदी यादीत आघाडी घेतली असून, यावरून नागपूर भारताच्या आकांक्षी डिजिटल लाटेचा ठाम भाग असल्याचे दिसून येते.

दरम्यान, 2025 मध्ये उर्वरित भारत फक्त खरेदी करत नव्हता, तर इन्स्टामार्टच्या मदतीने दैनंदिन जीवन अधिक सोपे आणि कार्यक्षम बनवत होता. दूध देशातील क्रमांक एक गरजेची वस्तू ठरली. भारतात दर सेकंदाला 4 पेक्षा जास्त दूधाच्या पिशव्या ऑर्डर केल्या गेल्या, एवढ्या की त्यातून तब्बल 26,000 ऑलिम्पिक आकाराचे जलतरण तलाव भरू शकतील. मोठ्या खरेदीतही भारत आघाडीवर राहिला. हैदराबादमधील एका युजरने वर्षातील सर्वात मोठी सिंगल कार्ट ऑर्डर 4.3 लाख रुपयांची केली, ज्यामध्ये तीन आयफोन 17 प्रोचा समावेश होता. 

About Instamart

Launched in August 2020, Instamart is India’s leading quick commerce platform. Present in over 128+ cities, Instamart leverages Swiggy’s technology and delivery fleet to bring groceries and other essentials — from hygiene and wellness, home and kitchen, office and electricals, beauty and grooming, and more — to the doorsteps of Indians in 10 minutes or less.
*All insights and figures are derived from an analysis of millions of Instamart orders placed between January and November 2025 across 128+ Indian cities.

Post a Comment

0 Comments