Business

Header Ads

पिरामल फायनान्स महाराष्ट्रात विस्तार , FY28 पर्यंत देशभरात एकूण ₹1.5 लाख कोटी AUM साध्य करण्याचे लक्ष्य

मुंबई, 29 नोव्हेंबर 2025 : पिरामल फायनान्स लिमिटेडने आज महाराष्ट्रभर मोठ्या विस्ताराची घोषणा केली असून आर्थिक वर्ष 2028 पर्यंत एकूण 1.5 लाख कोटी रुपये AUM गाठण्याचे चे लक्ष्य ठेवले आहे. महाराष्ट्र पिरामल फायनान्ससाठी सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असून नाशिक, नागपूर, पुणे आणि कोल्हापूरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 77 शाखांच्या मदतीने 1,21,000 हून अधिक ग्राहकांना सेवा पुरवली जाते. राज्यात गृहकर्जे आणि बिझनेस लोन्ससाठी विशेषतः मोठी मागणी दिसून येत आहे.

कंपनीने आपल्या प्रमुख मोहिमेच्या पुढील टप्प्याचे अनावरणही केले ‘हम काग़ज़ से ज़्यादा नीयत देखते हैं, ज्यामध्ये भारतभरातील कुटुंबे आणि लहान उद्योजकांच्या आकांक्षा अधोरेखित करणारी तीन नवीन फिल्म्स समाविष्ट आहेत.
पिरामल फायनान्सचे रिटेल एयूएम 75,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले असून चार वर्षांत साडेतीन पट वाढ नोंदवली आहे. कंपनीचे आर्थिक वर्ष 2026 च्या अखेरीस 1,00,000 कोटी रुपयांचे उद्दीष्ट आहे. उत्सव काळात रिटेल वितरणात 45 टक्क्यांची वाढ झाली, जी गृहकर्ज, वैयक्तिक आणि व्यवसाय कर्जासाठी उपनगरी बाजारातून मिळालेल्या मागणीमुळे झाली आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या सहामाहीत 32 टक्के वाढ नोंदवली गेली. 

कंपनी डिजिटल सोल्यूशन्स आणि वैयक्तिक सेवांचा समन्वय साधणाऱ्या आपल्या “हाय टेक अँड हाय टच”मॉडेलच्या माध्यमातून विस्तार सुरू ठेवत आहे.

जगदीप मल्लारेड्डी, सीईओ – रिटेल लेंडिंग, पिरामल फायनान्स यांनी सांगितले,“सशक्त आणि वेगाने विस्तारत असलेल्या रिटेल फ्रँचायझीसह देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या एनबीएफसी पैकी एक म्हणून, महाराष्ट्रासारख्या बाजारपेठांमध्ये मोठी संधी आम्हाला दिसते. उपनगरी आणि उदयोन्मुख बाजारपेठा आमची वाढ वेगाने पुढे नेत आहेत, आणि आमचे लक्ष साधे, पारदर्शक आणि विश्वासार्ह क्रेडिट सोल्युशन्स देण्यावर आहे, विशेषतः अशा ग्राहकांना ज्यांच्याकडे नेहमीच पारंपरिक दस्तावेज नसतात. आमचे हाय-टेक, हाय-टच मॉडेल आम्हाला ग्राहकांच्या वास्तविक गरजांशी जोडले ठेवते आणि जबाबदारीने वाढ साध्य करत दीर्घकालीन विश्वास निर्माण करते.”

सुनित मदान,सीओओ,पिरामल फायनान्स म्हणाले,“महाराष्ट्र आमच्या सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि आम्ही ग्राहकांना अधिक सातत्यपूर्ण आणि सुसंगत सेवा देण्यासाठी आमची ऑपरेशनल क्षमता मजबूत करत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित प्रक्रिया आणि प्रदेशकेंद्रित उत्पादन डिझाईनमध्ये गुंतवणूक करून आम्ही घरगुती ग्राहक आणि लहान व्यवसायांना जलद प्रक्रिया, उत्तम सेवा आणि त्यांच्या गरजेनुसार योग्य वित्तीय समाधान देण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक टचपॉईंटवरील अनुभव सुधारण्यावर आमचे प्रयत्न केंद्रित आहेत.”

पिरामल फायनान्सची 7 नोव्हेंबर 2025 रोजी एनएसई आणि बीएसई वर सूचीबद्धता झाली.कंपनी 428 शहरांतील 517 शाखांद्वारे 13,000 पिनकोडमध्ये 5.2 दशलक्ष ग्राहकांना सेवा देते. आर्थिक वर्ष 2021 मधील 49,000 कोटी रुपये एयूएम वरून आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या तिमाही मध्ये 91,477 कोटी रुपयांपर्यंत जवळपास दुप्पट वाढ झाली असून रिटेल पोर्टफोलिओचा हिस्सा 82 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

कंपनी 45 हून अधिक एआय मॉडेल्सद्वारे अंडररायटिंग, कलेक्शन्स आणि ग्राहक अनुभव मजबूत करते, ज्यायोगे औपचारिक क्रेडिट इतिहास नसलेल्या ग्राहकांनाही कर्जप्राप्ती शक्य होते.

Post a Comment

0 Comments