Business

Header Ads

इव्होनिथ स्टीलने वर्ध्यात कम्युनिटी स्पोर्स डे चे आयोजन केले, ज्यात 20 गावांमधील 1,000 हून अधिक लाभार्थी झाले सहभागी

नागपूर, 13 डिसेंबर : एव्होनिथ स्टील या अग्रेसर पोलाद उत्पादक कंपनीने 9 आणि 10 डिसेंबर रोजी नागपूर येथील वर्धा प्रकल्पात दोन दिवसीय कम्युनिटी स्पोर्ट डे चे यशस्वी आयोजन केले, ज्यामुळे समाज कल्याण, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामाजिक समावेशकता यांप्रती असलेली आपली वचनबद्धता अधिक दृढ झाली. या उपक्रमामुळे आसपासच्या 20 गावांमधील लाभार्थी एकत्र आले आणि क्रीडा, सलोखा व सामूहिक सहभागासाठी एक उत्साही व्यासपीठ निर्माण झाले.

या कार्यक्रमात खो-खो, कबड्डी आणि क्रिकेटसह विविध पारंपरिक आणि लोकप्रिय खेळांचा समावेश होता, ज्यामुळे सर्व वयोगटांतील पुरुष आणि महिलांना सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळाले. 1,000 हुन अधिक लाभार्थी सहभागी झाल्यामुळे, गेल्या वर्षाच्या तुलनेत सहभाग जवळपास दुप्पट झाला, ज्यामुळे स्थानिक समाजामध्ये खेळ आणि शारीरिक हालचालींबद्दल उत्साह वाढलेला दिसून येतो.

इव्होनिथ स्टीलचे अध्यक्ष जय सराफ म्हणाले, “खेळ हा लोकांना एकत्र आणण्याचे नेहमीच एक शक्तिशाली माध्यम राहिला आहे आणि या कम्युनिटी स्पोर्ट डे ने सामाजिक बंध दृढ करण्याची आणि निरोगी जीवनशैलीला चालना देण्याची त्याची क्षमता सिद्ध केली. इव्होनिथमध्ये, आमचा विश्वास आहे की जबाबदार विकास हा आता आमच्या कार्याच्या पलीकडे जाऊन आम्ही ज्या समुदायांशी जोडलेले आहोत, त्या समुदायांपर्यंत पोहोचतो. सहभागींनी दाखवलेली ऊर्जा आणि उत्साह शारीरिक शिक्षण आणि समाज-नेतृत्व असलेल्या उपक्रमांबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन दर्शवतो.”

ही केवळ एक स्पर्धात्मक घटना नसून, या उपक्रमाने ग्रामीण तरुणांमध्ये सक्षमीकरण, लैंगिक समावेशकता आणि आत्मविश्वास वाढवण्यावर भर दिला. महिला आणि तरुण सहभागींना सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणारे सर्वसमावेशक वातावरण निर्माण करून, या कार्यक्रमाने टीमवर्क, समानता आणि आत्मविश्वास या मूल्यांना बळकटी दिली.

गावकऱ्यांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने या कार्यक्रमाचे यश दिसून आले आहे आणि ज्या प्रदेशांमध्ये कंपनी कार्यरत आहे, त्या प्रदेशांमध्ये महत्त्वपूर्ण सामाजिक प्रभाव निर्माण करण्यावर आणि सर्वांगीण सामाजिक विकासाला पाठिंबा देण्यावर इव्होनिथ स्टीलचा सतत भर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Post a Comment

0 Comments