Business

Header Ads

टाटा हिताचीच्या 'रिलायबल ऑरेंज' ने एक्सकॉन 2025 मध्ये दमदार कामगिरी दाखवली; नेक्स्ट-जेन मशीनरी आणि इलेक्ट्रिक एक्स्कॅव्हेटर सादर केली

बेंगळुरू,10 डिसेंबर 2025 : भारतातील आघाडीच्या कंस्ट्रक्शन मशीनरी उत्पादकांपैकी एक असलेल्या टाटा हिताचीने एक्सकॉन 2025 मध्ये आपले पॅव्हिलियन अधिकृतपणे सुरू केले. एक्सकॉन ही दक्षिण आशियातील सर्वात मोठी कंस्ट्रक्शन इक्विपमेंट प्रदर्शनी आहे. यावर्षीची थीम होती “रिलायबल ऑरेंज”.
टाटा हिताचीच्या एक्सकॉन 2025 पॅव्हिलियनचे उद्घाटन जपानमधील हिताची कन्स्ट्रक्शन मशिनरीचे रिप्रेझेंटेटिव्ह एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, प्रेसिडेंट अँड एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि सीओओ श्री. मासाफुमी सेंझाकी यांच्या हस्ते झाले. त्यांची उपस्थिती विशेष ठरली कारण ती भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाबद्दलच्या त्यांच्या वाढत्या विश्वासाचा पुरावा आहे. तसेच, गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ टाटा हिताचीला दिलेल्या एचसीएमच्या सातत्यपूर्ण सहकार्याचेही हे प्रदर्शन होते. यामुळे हिताची कन्स्ट्रक्शन मशिनरी जपानच्या जागतिक विकास धोरणात भारताची वाढती भूमिका देखील अधोरेखित झाली आहे.

यावर्षीची थीम ‘रिलायबल ऑरेंज’ ही टाटा हिताचीच्या विश्वासार्हता, नवकल्पना आणि सातत्यपूर्ण कार्यक्षमतेच्या वचनाला अधोरेखित करतो. हे वचन त्यांच्या दीर्घकाळाच्या विश्वास, उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्य आणि ग्राहक केंद्रित दृष्टिकोनावर आधारित आहे.

‘रिलायबल ऑरेंज’ ही भावना आज 1,20,000 पेक्षा जास्त टाटा हिताची मशीनामध्ये दिसून येते, ज्या आपल्या ग्राहकांसोबत काम करत आहेत. या मशीनद्वारे ग्राहकांना उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि चांगली रीसेल व्हॅल्यू याचा अनुभव मिळाला आहे. 1,20,000 पेक्षा जास्त मशीन विक्रीचा टप्पा गाठताना, कंपनीने अभियांत्रिकीतील उत्कृष्टता आणि ग्राहकांचा विश्वास यांची आपली परंपरा आणखी मजबूत केली आहे. टाटा हिताचीचे पोर्टफोलिओ विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता देण्यासाठी ओळखले जाते. यामुळे ग्राहकांची कामाची क्षमता आणि परफॉर्मन्स वाढतो, सस्टेनेबिलिटी सुधारते आणि परिचालन खर्चातही मोठी बचत होते.

श्री. मासाफुमी सेंझाकी, रिप्रेझेंटेटिव्ह एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, प्रेसिडेंट अँड एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि सीओओ, हिटाची कन्स्ट्रक्शन मशिनरी, जपान म्हणाले, “आज भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कन्स्ट्रक्शन मार्केटपैकी एक आहे. टाटा हिताचीसोबतची आमची भागीदारी आम्हाला भारतीय ग्राहकांच्या अपेक्षांनुसार जागतिक दर्जाची मशीनरी आणि विश्वासार्ह सेवा देण्यास सक्षम करते. 2025 मध्ये टाटा हिताचीचे नवीन इनोव्हेशन सादर करून आमचे उद्दिष्ट ग्राहकांना उच्च उत्पादनक्षमता, कमी ऑपरेटिंग खर्च आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या विश्वासार्ह मशीन उपलब्ध करून देणे आहे. ही सर्व वैशिष्ट्ये आमच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेवरील सामायिक तत्त्वज्ञानाची खास ओळख आहेत .”

टाटा हिताचीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. संदीप सिंग म्हणाले: आमचा काम करण्याचा दृष्टिकोन ग्राहक-प्रधान राहिला आहे. आमच्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे आणि प्रभावी कार्यप्रक्रियांमुळे आम्ही गेल्या 60 वर्षांच्या प्रवासात सतत प्रगती करू शकलो. याच विचारसरणीमुळे आम्ही भारतातील खोदक यंत्र (एक्स्कॅव्हेटर) क्षेत्रातील सर्वात मोठ्या ग्राहक-सेवा नेटवर्कपैकी एक उभारण्यात यशस्वी झालो आहोत.”

एक्सकॉन 2025 मध्ये सहभागाबद्दल बोलताना, श्री संदीप सिंग म्हणाले: “एक्सकॉन कन्स्ट्रक्शन उपकरण उद्योगासाठी अजूनही सर्वात महत्वाचे व्यासपीठ आहे, आणि आम्हाला ‘रिलायबल ऑरेंज’ या थीमअंतर्गत आपले विस्तारित पोर्टफोलिओ सादर करताना अभिमान वाटतो. ही थीम आमच्या विश्वासार्हता, टिकाऊ उत्पादने आणि ग्राहकांशी असलेल्या अनेक वर्षांच्या वचनबद्धतेचे प्रतिक आहे. आमच्या इलेक्ट्रिक मशीन, नवीन अटॅचमेंट्स आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या लाईव्ह डेमोद्वारे आम्ही भारताच्या कन्स्ट्रक्शन इकोसिस्टमच्या भविष्यात योगदान देण्याची आपली बांधिलकी पुन्हा दाखवत आहोत. या डेमोमुळे अभ्यागतांना मशीनची वास्तविक वापरातील क्षमता, कार्यक्षमता आणि ऑपरेटरचा आराम प्रत्यक्ष अनुभवता येईल. तसेच, स्मार्ट सिस्टीम्स, ऑटोमेशन आणि प्रिसिजन तंत्रज्ञान कामाच्या ठिकाणी उत्पादकता आणि सुरक्षितता कशी वाढवत आहे हेही पाहता येईल.” त्यांनी पुढे सांगितले, “जसजसा देश वेगाने पायाभूत सुविधा विकसित करत आहे, तसतसे आमचे लक्ष विश्वासार्ह, कार्यक्षम आणि प्रत्यक्ष कामासाठी योग्य मशीन देण्यावर आहे.”

टाटा हिताचीचा एक्सकॉन 2025 मधील सहभाग हे दाखवतो की कंपनी नवकल्पना, टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांच्या आधारे कन्स्ट्रक्शन उपकरण उद्योगाच्या भविष्यातील विकासासाठी सातत्याने काम करत आहे.
टाटा हिताचीने एक्सकॉन 2025 मध्ये चार नवीन उत्पादने आणि दोन नवीन अटॅचमेंट्स लाँच केले.

नवीन लाँच झालेल्या मशीन्स: नवीन लाँच केलेले अटॅचमेंट्स :
१) झॅक्सिस 890 १) सोलर पॅनल लिफ्टर
२) एक्स210 एलसी इलेक्ट्रिक २) क्रशर बकेट
 ३) स्मार्ट एसएम230 रॉक ब्रेकर
 ४) मॅग्नम सिरीज रॉक ब्रेकर
 ५) रिपर टूथ
 ६) टिल्ट कपलर
 ७) मिनी एक्स्कॅव्हेटर ग्रॅपल

टाटा हिताचीच्या बूथवर खालील उपकरणे प्रदर्शित केली गेली :
झेडअॅ क्सिस 23 यू, 33e इलेक्ट्रिक, झेड अॅकक्सिस 33 यू, एनएक्स 50, एनएक्स 80, शिनराय प्राइम, शिनराय प्रो, टीएल 340 एच प्राइम, झेडडब्ल्यू 225, झेडअॅेक्सिस 140 एच अल्ट्रा, इएक्स 210 इन्फ्रा, इएक्स 210एलसी इलेक्ट्रिक, झेड अॅरक्सिस 220एलसी अल्ट्रा, इएक्स 350एलसी प्राइम, झेडअॅएक्सिस 370एलसीएच अल्ट्रा, झेडअॅलक्सिस 490 एच अल्ट्रा आणि झेडअॅेक्सिस 890.  

याशिवाय, उद्योगाच्या विशेष गरजा पूर्ण करण्यासाठी सानुकूल अटॅचमेंट्सची मोठी श्रेणी आणि ओरिजिनल स्पेअर पार्ट्स सेक्शनही उपलब्ध होती.
अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या: www.tatahitachi.co.in

टाटा हिताची विषयी:

टाटा हिताची ही भारतातील अग्रगण्य कन्स्ट्रक्शन मशीनरी कंपन्यांपैकी एक आहे आणि सर्वात मोठी हायड्रॉलिक एक्स्कॅव्हेटर उत्पादक कंपनी आहे. ही टाटा मोटर्स आणि हिटाची कन्स्ट्रक्शन मशिनरी (HCM) यांच्यातील सर्वात जुनी इंडो-जपानी संयुक्त उपक्रम आहे. HCM सोबतची भागीदारी 1984 मध्ये सुरू झाली आणि आज ही उद्योगातील सर्वात दीर्घकालीन संयुक्त उपक्रमांपैकी एक आहे. कंपनीचा धारवाड आणि खडगपूर येथे उत्पादन केंद्र असून देशभर 300 हून अधिक ग्राहक संपर्क केंद्रे आहेत.

1961 मध्ये टाटा इंजिनीअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी (TELCO) च्या कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसाय युनिट म्हणून सुरू झालेली ही कंपनी आज मिनी एक्स्कॅव्हेटर्स, कन्स्ट्रक्शन एक्स्कॅव्हेटर्स, मायनिंग एक्स्कॅव्हेटर्स, बॅकहो लोडर्स, व्हील लोडर्स यांसह विविध पोर्टफोलिओची मालक आहे. याशिवाय अटॅचमेंट्स, पार्ट्स आणि विशेषज्ञ सेवा उपायही उपलब्ध आहेत.

टाटा हिताची भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि मायनिंग गरजांसाठी जागतिक दर्जाची कन्स्ट्रक्शन उपकरणे प्रदान करण्यात आघाडीची कंपनी आहे.

Post a Comment

0 Comments