Business

Header Ads

सॅमसंग सीईएस 2026 मधील ‘द फर्स्ट लूक’ या कार्यक्रमात आपल्या डीएक्स व्हिजनची घोषणा करणार आहे

15 डिसेंबर 2025 : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स 4 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता (पीएसटी) [5 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता आयएसटी] विन लास वेगासमधील लटूर बॉलरूम येथे ‘द फर्स्ट लूक’ या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठ्या आयटी आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन सीईएस 2026 च्या उद्घाटनापूर्वी दोन दिवस आधी होणार आहे.

या कार्यक्रमात सॅमसंग 2026 साठी डिव्हाइस एक्सपीरियन्स (डीएक्स) विभागाबाबत आपली दृष्टी सादर करणार असून, एआयवर आधारित नवे ग्राहक अनुभवही दाखवले जाणार आहेत. डिव्हाइस एक्सपीरियन्स (डीएक्स) विभागाचे सीईओ आणि प्रमुख टीएम रोह हे ‘द फर्स्ट लूक’ कार्यक्रमाचे मुख्य वक्ते असतील. तसेच व्हिज्युअल डिस्प्ले (व्हीडी) बिझनेसचे अध्यक्ष आणि प्रमुख एसडब्ल्यू यॉन्ग, तसेच डिजिटल अप्लायन्सेस (डीए) बिझनेसचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट आणि प्रमुख चेओलगी किम हेही मंचावर उपस्थित राहून येत्या वर्षासाठी आपल्या-आपल्या बिझनेसच्या दिशा मांडतील.

हा कार्यक्रम सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर आणि सॅमसंग न्यूजऱूमवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच कंपनीच्या मोफत, जाहिरात-आधारित टीव्ही स्ट्रीमिंग सेवेसाठी असलेल्या सॅमसंग टीव्ही प्लसवरही तो पाहता येईल. याशिवाय, विन लास वेगास येथील कंपनीच्या विशेष प्रदर्शनात 7 जानेवारीपर्यंत सॅमसंगचे अनेक इतर विविध कार्यक्रम आणि प्रदर्शनेही आयोजित केली जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments