Business

Header Ads

मैक्स हॉस्पिटल, नागपूरने “एव्हरीडे वॉरियर्स” कॅन्सर सर्व्हायव्हर कार्यक्रमाचे दुसरे सत्र आयोजित केले

नागपूर, 14 डिसेंबर 2025 : मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूरने “एव्हरीडे वॉरियर्स” या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले. हा कार्यक्रम कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रेरणादायक कथा शेअर करण्यासाठी, आपली कला सादर करण्यासाठी आणि नव्या आत्मविश्वासासह जीवन जगण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. अशा उपक्रमाद्वारे, हॉस्पिटल कॅन्सरमुळे निर्माण होणाऱ्या भावनिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करताना रुग्णांना मदत करण्याचे आपले कार्य सतत सुरू ठेवत आहे.

कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पंकज भोयर, महाराष्ट्र सरकारचे राज्य मंत्री आणि पालकमंत्री; तसेच गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, खाणकाम, शालेय शिक्षण आणि सहकार विभागाचे मंत्री उपस्थित होते. मान्यवर अतिथी म्हणून डॉ. आनंद पाठक (मेडिकल डायरेक्टर, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर), डॉ. वाय. एस. देशपांडे (माजी अध्यक्ष – आयएमए महाराष्ट्र), तसेच मैक्स हॉस्पिटल नागपूरचे वाइस प्रेसिडेंट– हॉस्पिटल ऑपरेशन्स श्री. घनश्याम गुसाणी तसेच मॅक्स हॉस्पिटलमधील कॅन्सर तज्ञ डॉक्टरांची टीमही या कार्यक्रमात उपस्थित होती. वक्त्यांनी कॅन्सरवर मात करणाऱ्या रुग्णांच्या जिद्दीचे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मजबूत पाठिंब्याचे कौतुक केले. त्यांनी उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला आणि शक्ती, आशा आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टी सांगितल्या.

कार्यक्रमात बोलताना डॉ. अमोल डोंगरे, डायरेक्टर, मेडिकल ऑन्कॉलॉजी, मैक्स हॉस्पिटल नागपूर यांनी कॅन्सरविरुद्धच्या लढाईत समाजाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “कॅन्सरबद्दल जागरूकता, योग्य माहिती आणि समाजाचा पाठिंबा हे चांगले परिणाम मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आजही ‘कॅन्सर’ हा शब्द लोकांना आजारापेक्षा जास्त घाबरवतो, कारण सुरुवातीच्या लक्षणे आणि आधुनिक उपचारांविषयी पुरेशी माहिती नसते. कॅन्सर लवकर ओळखला तर जीव वाचू शकतो, पण गैरसमजांमुळे निदान उशिरा होते.” या वर्षीच्या “एव्हरीडे वॉरियर्स” कार्यक्रमाला विशेष महत्त्व होते, कारण हॉस्पिटलने समाजासाठी केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय आणि निस्वार्थ कार्याबद्दल कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा सत्कार केला.

डॉ. अमोल डोंगरे पुढे म्हणाले, “टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि प्रिसिजन मेडिसिन यांसारख्या आधुनिक उपचारांमुळे कॅन्सरवरील परिणाम खूप सुधारले आहेत. मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूर येथे आम्ही फक्त उत्कृष्ट उपचार देत नाही, तर जुन्या चुकीच्या समजुती दूर करून रुग्णांना सक्षम बनवण्याचेही काम करतो. ‘एव्हरीडे वॉरियर्स’ सारखे उपक्रम कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणतात, त्यांचा आत्मविश्वास वाढवतात आणि त्यांना आशेने पुढे जाण्यास मदत करतात.” 

श्री. घनश्याम गुसाणी, वाइस प्रेसिडेंट– हॉस्पिटल ऑपरेशन्स, मॅक्स हॉस्पिटल नागपूर म्हणाले, “आमचे उद्दिष्ट म्हणजे विश्वासार्ह उपचार आणि प्रेमाने केलेल्या सेवेमुळे लोकांचे जीवन बदलणे. ‘एव्हरीडे वॉरियर्स’ कार्यक्रमाद्वारे आम्ही रुग्णांना आशा देण्याचा, त्यांना प्रोत्साहन देतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या प्रवासात साथ देण्याचा प्रयत्न करतो.” 

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नृत्य, फॅशन शो, गायन आणि मनोगत अशा विविध कार्यक्रमांत भाग घेतला. या उपक्रमांचा उद्देश होता रुग्णांना आत्मविश्वास देणे, त्यांचा विश्वास वाढवणे आणि कुटुंबीयांना त्यांच्या प्रियजनांना पाठिंबा देण्यासाठी सक्रियपणे सहभागी होण्यास प्रोत्साहित करणे.

“एव्हरीडे वॉरियर्स” उपक्रमाच्या सातत्यपूर्ण यशामुळे, मैक्स सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल, नागपूरने मध्य भारतात अग्रगण्य सर्वसमावेशक कॅन्सर केअर सेंटर म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे आणि हे क्षेत्रातील दुसरे असे मान्यताप्राप्त केंद्र बनले आहे. हॉस्पिटल आपल्या सर्वांगीण आणि विश्वासार्ह उपचार पद्धतीद्वारे हजारो रुग्णांच्या जीवनात बदल घडवत आहे आणि जागतिक दर्जाची कॅन्सर सेवा देण्याची तसेच ताकद, आशा आणि एकतेवर आधारित समुदाय तयार करण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवत आहे.

Post a Comment

0 Comments