Business

Header Ads

सरोज जींची जादू, देव साब चे आशीर्वाद आणि माधुरी दीक्षित व जॅकी श्रॉफसोबत सुनील ग्रोवरचे धमाकेदार गाणे — नेटफ्लिक्सच्या द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये !

मुंबई, 21 फेब्रुवारी 2026 : नेटफ्लिक्स वरील द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमात 90च्या दशकातील आवडते कलाकार माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या एकत्रित आयकॉनिक चित्रपट प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. परिंदा, राम लखन, त्रिदेव, संगीत ते खलनायक या चित्रपटांपर्यंतच्या त्यांच्या आठवणी त्यांनी शेअर केल्या. जॅकी यांनी त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीच्या अनेक छटा आठवत हसत सांगितले की, माधुरीने त्यांच्या समोर जवळजवळ प्रत्येक नातं साकारलं आहे — “वाइफ बनी, गर्लफ्रेंड बनी, मेरी बहन बनी, मेरी एमआयएल बनी… मला आनंद वाटतोय.” सूत्रसंचालक कपिल शर्मा यांनी मस्करीत विचारले की, बॉलिवूडमधील सर्वोत्तम नृत्यांगनांपैकी एकीसोबत नाचताना त्यांना कधी तणाव जाणवला का? त्यावर जग्गू दादा स्टाईलमध्ये म्हणाले, “मुझे टेंशन था ही नाही… सब उनको देखते थे,” आणि प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्या व हशा मिळाला.

आठवणींची ही सफर आणखी रंगतदार झाली जेव्हा माधुरीने सांगितले की त्यांची आवडती कोरिओग्राफर नेहमीच सरोज खान राहिली आहे. राम लखन च्या वेळी सरोज जींनी त्यांच्या लाजाळू ऑन-स्क्रीन पात्राला साजेसं व्हावं म्हणून काही क्षणांत संपूर्ण डान्स रूटीन बदललं होतं.ज्यातून बॉलिवूडमधील काही आयकॉनिक गाण्यांमागचं जादू दिसून येतं. त्यांनी देवदास चित्रपटातील एक मजेदार किस्साही सांगितला. “काहे छेड मोहे” या गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या भरजरी आणि जड पोशाखामुळे तो सतत शाहरुख खान यांना लागायचा. लवकर शॉट पूर्ण व्हावा म्हणून शाहरुख मजेत म्हणाले, “करदे करदे माधुरी, एक शॉट में अभी हो जायेगा…वरना मुझे बार बार खाना पडेगा,” आणि सेटवर सगळेच हसू लागले.

जॅकी दादांनी त्यांच्या आयडॉल देव आनंद यांच्याशी संबंधित एक भावूक आठवणही शेअर केली. ते म्हणाले की त्या दिग्गजांनी एकदा त्यांना सांगितले होते, “सुबह सुबह तुम्हारी तसवीर देखी, शाम को तुम मेरे सामने खडे हो… तुम्हें रोल जरूर दुंगा,” आणि हा आशीर्वाद त्यांच्या आयुष्यात कायम लक्षात राहिला. आणि जेव्हा वातावरण भावूक झालं होतं, तेव्हाच ‘मास्टिव्हर्स’ने पुन्हा रंगत आणली. सुनील ग्रोवर डायमंड राजा बनून आपल्या नव्या “उहू उहू” गाण्यासह परतले आणि माधुरीसोबत धमाल केली, तर जॅकीसोबत “हाँ भिडू” च्या अंदाजात रंगत आणली , ज्यामुळे हा कार्यक्रम एक भन्नाट म्युझिकल कॉमेडी सेलिब्रेशन ठरला. धक धक देखील होईल, भिडू स्वॅग देखील असेल ,यावेळी मास्टिव्हर्स पूर्णपणे 90च्या दशकाच्या जादूने उजळून निघणार!

आज रात्री 8 वाजता नेटफ्लिक्स वर द ग्रेट इंडियन कपिल शो पाहायला विसरू नका!

Post a Comment

0 Comments