Business

Header Ads

हार्पिकची दशकातील सर्वात मोठी झेप ‘नवीन हार्पिक बाथरूम अल्ट्रा क्लीनर’ ची सुरुवात; ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून रोहित शेट्टी यांचे स्वागत

थोडक्यात पण महत्वाचे

‘कसाही असो डाग, पूर्ण बाथरूम ULTRA साफ’ या नव्या मोहिमेसह भारतातील सर्वात दमदार डाग-निर्मूलन तज्ज्ञाची दमदार एंट्री!

 राष्ट्रीय, 23 फेब्रुवारी 2026 : भारतामधील क्रमांक 1 टॉयलेट आणि बाथरूम क्लीनर असलेल्या हार्पिकने, ज्यावर देशातील 10 कोटींहून अधिक घरांचा* विश्वास आहे, आपल्या बाथरूम स्वच्छतेतील आतापर्यंतचे सर्वात प्रगत उत्पादन — ‘नवीन हार्पिक बाथरूम अल्ट्रा क्लीनर’ — बाजारात आणल्याची घोषणा केली आहे. गेल्या दशकातील बाथरूम क्लीनिंग क्षेत्रातील हार्पिकची ही सर्वात मोठी नवकल्पकता मानली जात आहे. हट्टी आणि सर्वाधिक आढळणारे बाथरूममधील डाग प्रभावीपणे काढून संपूर्ण बाथरूम ‘अल्ट्रा क्लीन’ करण्यासाठी हे उत्पादन खास तयार करण्यात आले आहे. या उत्पादनाच्या दमदार आणि विश्वासार्ह डाग हटवण्याच्या वचनाला अधिक बळ देण्यासाठी बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी ब्रँड अॅम्बेसीडर म्हणून सहभागी झाला आहे.

भारतीय शहरांमधील अनेक घरांमध्ये बाथरूममध्ये पिवळे डाग, हार्ड वॉटरमुळे तयार होणारा थर (लाइमस्केल) आणि गंजासारखे हट्टी डाग ही मोठी समस्या असते. वेळ जसजसा जातो तसतसे लोकांना वाटू लागते की हे डाग काढणं जवळपास अशक्य आहे. यावर खात्रीशीर उपाय नसल्याने अनेकजण साधे डिटर्जंट, ब्लीच किंवा फिनाइलसारखी सर्वसाधारण उत्पादने वापरतात. पण ही उत्पादने हार्ड वॉटरच्या डागांवर फारसा परिणाम करत नाहीत आणि कधी कधी पृष्ठभागालाही घासून टाकतात, त्यामुळे बाथरूमचा लुक अधिकच निस्तेज दिसू लागतो. 

ग्राहकांच्या या जुन्या आणि महत्त्वाच्या गरजेला उत्तर देत, विश्वासार्ह, बहुउपयोगी आणि परिणामकारक उपाय म्हणून ‘नवीन हार्पिक बाथरूम अल्ट्रा क्लीनर’ खास भारतीय बाथरूमची स्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. भारतातील सर्वात दमदार डाग हटवणारा स्पेशालिस्ट म्हणून तो रोजचे पिवळे हार्ड वॉटरचे डाग, लाइमस्केल तसेच गंजासारखे हट्टी डागही प्रभावीपणे काढतो आणि बाथरूमला दिसायला अल्ट्रा साफ आणि चमकदार बनवतो. “नवीन हार्पिक बाथरूम अल्ट्रा क्लीनर – कसाही असो डाग, पूर्ण बाथरूम ULTRA साफ” या वचनाला साजेशी ही नवी मोहीम ग्राहकांना एक ताकदवान आणि खात्रीशीर उपाय देत बाथरूम क्लीनर श्रेणीत हार्पिकचे नेतृत्व अधिक मजबूत करते.

ब्रँडसोबतच्या आपल्या सहकार्याबद्दल बोलताना बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाला, “लोक तुम्हाला एका विशिष्ट शैलीशी जोडतात, याचा अर्थ ते तुमच्याकडून प्रत्येक वेळी दर्जेदार कामाची अपेक्षा करतात आणि तुमच्यावर विश्वास ठेवतात. तो विश्वासच तुम्हाला अधिक चांगलं काम करण्याची आणि स्वतःचा स्तर उंचावण्याची प्रेरणा देतो. मग ते कॉमेडी असो, अॅक्शन असो किंवा हार्पिकच्या बाबतीत भन्नाट स्वच्छता असो. स्वच्छतेच्या क्षेत्रात हार्पिक हे अनेक वर्षांपासून विश्वासाचं नाव आहे आणि बाथरूम हायजिनशी तर त्याचा अगदी जवळचाच संबंध जोडला गेला आहे. ‘नवीन हार्पिक बाथरूम अल्ट्रा क्लीनर’मुळे हा ब्रँड बाथरूम स्वच्छतेला पुढच्या स्तरावर घेऊन जात आहे. खऱ्या भारतीय घरांसाठी तयार केलेल्या, दमदार आणि विश्वासार्ह उत्पादनासोबत मी जुळलो याचा मला आनंद आहे.” 

या सुरुवातीबद्दल बोलताना रेकिट – साउथ एशियाचे हायजिन मार्केटिंग डायरेक्टर गौतम रिशी म्हणाले, “हार्पिक बाथरूम अल्ट्रा क्लीनर हे एक दमदार नवे इनोव्हेशन आहे, जे भारतातील सर्वात हट्टी हार्ड वॉटरच्या डागांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी खास तयार करण्यात आले आहे. जिथे अनेक साधारण क्लीनर्स कमी पडतात, तिथे हे उत्पादन परिणामकारक ठरते. या लॉन्चमुळे डाग हटवण्यात हार्पिकचे नेतृत्व आणखी मजबूत होईल आणि बाथरूम स्वच्छतेसाठी नवा मापदंड निर्माण होईल. रेकिट परिवाराचा भाग म्हणून, रोहित शेट्टी यांच्या सहभागासह आम्ही भारतीय घरांसाठी अधिक ताकदवान आणि उच्च दर्जाची कामगिरी करणारा उपाय देत आहोत.”

या प्रसंगी हवास क्रिएटिव्ह इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी अनुपमा रामास्वामी म्हणाल्या, “हार्पिकच्या विश्वात आता एक नवा हिरो आला आहे – हार्पिक बाथरूम अल्ट्रा क्लीनर. तो दमदार आहे आणि प्रभावीही आहे. म्हणूनच त्याची सुरुवात करण्याच्या वेळीही तितकाच भव्य आणि लक्षवेधी अंदाज हवा होता — अगदी ब्रँडचा चेहरा असलेल्या रोहित शेट्टींसारखा. हवास क्रिएटिव्ह इंडियाच्या टीमने आणखी एक दमदार आणि शक्तीशाली मोहीम तयार केली आहे, जी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.” 

या लॉन्चसह हार्पिक बाथरूम क्लीनर श्रेणीत आपले नेतृत्व कायम ठेवत आहे. ग्राहकांच्या गरजा नीट समजून घेत, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी संवाद यांच्या आधारे हार्पिक भारतीय ग्राहकांना साध्या क्लीनर्सच्या पुढे जाऊन खऱ्या अर्थाने उत्कृष्ट आणि उठावदार बाथरूम स्वच्छता देणारा परिणामकारक पर्याय देत आहे.

TVC ची लिंक: https://youtu.be/O3vecQ8Er5U

Post a Comment

0 Comments