Business

Header Ads

उन्हाळ्यात ऊर्जा बचतीसाठी ‘कॉस्मो सनशील्ड’ कडून नागपुरात उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार !

नागपूर, मे २०२६ : कॉस्मो कन्झ्युमर या कॉस्मो फर्स्ट या कंपनीच्या ग्राहककेंद्रित विभागाने आज नागपुरात आपल्या ‘कॉस्मो सनशील्ड’ ब्रँडअंतर्गत उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार जाहीर केला. उन्हाळ्यात घरांत, कार्यालयांमध्ये आणि व्यावसायिक ठिकाणी अधिक आरामदायी वातावरण मिळावे, तसेच ऊर्जेचा वापर नियंत्रित राहावा, या वाढत्या गरजा लक्षात घेऊन ही नवी उत्पादने सादर करण्यात आली आहेत.

या उत्पादन मालिकेमध्ये ‘लस्टर सिरीज’, ‘रेनबो सिरीज’ आणि ‘अल्ट्रा कूल सिरीज’ यांचा समावेश आहे. या फिल्म्स अशा प्रकारे विकसित करण्यात आल्या आहेत की, त्या आत येणारी उष्णता कमी करतात आणि नैसर्गिक प्रकाशाचाही योग्य समतोल राखतात. काचेच्या पृष्ठभागातून आत येणारी उष्णता कमी करून या फिल्म्स एअर कंडिशनरची कार्यक्षमता सुधारण्यास आणि घरातील वातावरण अधिक आरामदायी ठेवण्यास मदत करतात.

थंडावा टिकवून ठेवण्यास मदत करण्याबरोबरच या फिल्म्स हानिकारक अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांपासूनही संरक्षण देतात. त्यामुळे फर्निचर, फ्लोअरिंग आणि आतील सजावटीच्या वस्तूंचा रंग कालांतराने फिका होण्याची शक्यता कमी होते. नैसर्गिक प्रकाशावर अधिक अवलंबून असलेल्या, पण अतिरिक्त उष्णता आणि तीव्र प्रकाशाच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या आधुनिक घरांसाठी आणि कार्यालयांसाठी या फिल्म्स विशेष उपयुक्त ठरू शकतात.

या बाबत बोलताना ‘कॉस्मो कन्झ्युमर’चे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आरामदायी वातावरणासोबतच ऊर्जा बचत करणाऱ्या उपायांकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे. नागपूर ही आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ असून, येथे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्याकडून मोठी मागणीही आहे. उत्पादनांच्या विस्तारित पोर्टफोलिओमुळे ग्राहकांचा विश्वास आणखी वाढेल याबद्दल आम्हाला खात्री आहे. त्यांच्या बदलत्या गरजांनुसार अधिक पर्याय उपलब्ध करण्याचा आम्ही विचार करू.”

भारतातील शहरांमध्ये एअर कंडिशनरचा वाढता वापर आणि ऊर्जा बचतीबाबतची वाढती जागरूकता लक्षात घेता, खिडक्यांमधून आत येणारी उष्णता नियंत्रित करणे हे घरातील आरामदायी वातावरणासाठी महत्त्वाचे ठरत आहे. ही गरज ओळखून कॉस्मो सनशील्ड फिल्म्सची निर्मिती करण्यात आली आहे. या फिल्म्स सूर्याच्या उष्णतेचा आत येणारा प्रभाव कमी करून अधिक कार्यक्षम थंडावा मिळवण्यास आणि वीज वापर कमी ठेवण्यास मदत करतात.

कॉस्मो सनशील्ड हा ‘कॉस्मो कन्झ्युमर’च्या दैनंदिन वापरासाठी उपयुक्त आणि नवकल्पनांवर आधारित उत्पादनांच्या पोर्टफोलिओचा भाग आहे. प्रभावी तांत्रिक रचना आणि प्रत्यक्ष वापरातील सोयी यांकडे लक्ष देत आणि शहरी भागातील बदलत्या गरजा लक्षात घेत हा ब्रँड विकसित करण्यात आला आहे. आरामदायी वातावरण, कार्यक्षम वापर आणि संरक्षण या तिन्ही बाबींवर त्यामध्ये भर देण्यात आला आहे. नागपूरमधील अलीकडील प्रकल्पांमध्ये मेहेर ऑटोमोबाईल्स, गुप्ता रेसिडेन्शिअल व इतर ठिकाणी ‘कॉस्मो सनशील्ड’च्या उष्णता कमी करणाऱ्या विंडो फिल्म्स बसवण्यात आलेल्या आहेत.

उत्पादनांच्या विस्तारित पोर्टफोलिओच्या माध्यमातून कॉस्मो सनशील्ड महत्त्वाच्या शहरी बाजारपेठांमध्ये आपला विस्तार वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. घरगुती आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना खोल्यांमधील वातावरण अधिक कार्यक्षम पद्धतीने नियंत्रित करता यावे, यासाठी उष्णता नियंत्रणाचे प्रगत उपाय अधिक सहज उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

Post a Comment

0 Comments