Business

Header Ads

वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर येथे प्रगत स्कारलेस थायरॉईड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली

नागपुर :  वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर येथे अलीकडेच स्कारलेस थायरॉईड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रात सतत प्रगत होत असून, आता रुग्णांसाठी अधिक सुरक्षित आणि कमी त्रासदायक उपचारांचे पर्याय उपलब्ध होत आहेत. 

स्कारलेस थायरॉईड शस्त्रक्रिया ही अशी एक आधुनिक आणि कमी त्रासदायक (मिनिमली इनव्हेसिव्ह) पद्धत आहे, ज्यामध्ये मानेवर कोणताही दिसणारा डाग राहत नाही. नुकतीच ही शस्त्रक्रिया डॉ. अंकुर मिश्रा, कन्सल्टंट जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या उपचारानंतर रुग्णाची प्रकृती लवकर सुधारली आणि सौंदर्यदृष्ट्याही उत्तम परिणाम मिळाला.

67 वर्षांची एक महिला मानेच्या पुढील भागात सूज येण्याच्या तक्रारीसह वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर येथील जनरल सर्जरी विभागात दाखल झाली. ही सूज तिला मागील 5 ते 6 वर्षांपासून होती आणि ती हळूहळू वाढत होती. अलीकडे तिला हलका श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. सूज हळूहळू वाढत असल्याने तिने त्याचे कारण समजून घेण्यासाठी आणि योग्य उपचार पर्याय जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला.

रुग्णाची सविस्तर तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये शारीरिक तपासणी आणि आधुनिक इमेजिंग तपासण्या यांचा समावेश होता. मानेच्या सीटी स्कॅनमध्ये थायरॉईड ग्रंथीच्या डाव्या बाजूला सुमारे 5 x 5 सेमी आकाराची मोठी गाठ दिसून आली. वाढलेल्या थायरॉईड गाठीमुळे श्वासनलिकेवर दाब येत होता, त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. तपासणीनंतर या आजाराचे निदान कोलॉइड मल्टीनोड्युलर गोइटर असे करण्यात आले, जो थायरॉईड ग्रंथीचा एक सामान्य आणि कॅन्सर नसलेला प्रकार आहे.

रुग्णाची स्थिती आणि एकूण आरोग्य पाहून डॉक्टरांच्या टीमने एक आधुनिक आणि कमी जखम करणारी शस्त्रक्रिया सुचवली, ज्याला ट्रान्स-ओरल एंडोस्कोपिक थायरॉइडेक्टॉमी - व्हेस्टिब्युलर अॅगप्रोच (TOETVA) असे म्हणतात. या पद्धतीत पारंपरिक शस्त्रक्रियेसारखा मानेवर कट दिला जात नाही. त्याऐवजी तोंडाच्या आतून लहान चिरा करून शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे थायरॉईड ग्रंथीपर्यंत पोहोचून प्रभावित गाठ काढता येते आणि मानेवर कोणताही बाहेरून दिसणारा डाग राहत नाही.

ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर येथे डॉ. अंकुर मिश्रा, , कन्सल्टंट जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली, अॅकनेस्थेसिया आणि ऑपरेशन थिएटर टीमच्या मदतीने यशस्वीपणे करण्यात आली. शस्त्रक्रिया सुरक्षितरीत्या पूर्ण झाली असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे आणि ती लवकर बरी होत आहे.

TOETVA (ट्रान्स-ओरल एंडोस्कोपिक थायरॉइडेक्टॉमी - व्हेस्टिब्युलर अॅिप्रोच) शस्त्रक्रियेचा एक मोठा फायदा म्हणजे रुग्ण लवकर बरा होतो. शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच रुग्णाला द्रव आहार सुरू करता आला आणि दुसऱ्या दिवशी हळूहळू मऊ आहार करण्यात आला. तिला फक्त हलकी अस्वस्थता जाणवत होती, जी पुढील काही दिवसांत खूपच कमी झाली. प्रकृती स्थिर राहिल्यामुळे आणि कोणतीही गुंतागुंत न झाल्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्या दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

स्कारलेस थायरॉईड शस्त्रक्रिया जगभरात अधिक लोकप्रिय होत आहे, कारण यामध्ये प्रभावी उपचारासोबतच चांगला सौंदर्यात्मक परिणाम मिळतात. अनेक रुग्ण, विशेषतः महिलांना, थायरॉईड शस्त्रक्रियेनंतर मानेवर कायमचा डाग राहील याची चिंता असते. TOETVA या शस्त्रक्रियेमुळे मानेवर बाहेरून कोणताही कट न करता उपचार केले जातात, त्यामुळे मानेवर बाहेरून दिसणारा डाग राहत नाही.

सौंदर्यदृष्ट्या मिळणाऱ्या फायद्यासोबतच या प्रक्रियेचे इतरही अनेक फायदे आहेत. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना सामान्यतः कमी वेदना होतात, रुग्णालयात कमी दिवस राहावे लागते, दैनंदिन कामकाज लवकर सुरू करता येते आणि जखमेशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका देखील कमी असतो. ही शस्त्रक्रिया प्रगत एंडोस्कोपिक उपकरणांच्या मदतीने केली जाते, त्यामुळे डॉक्टरांना स्पष्ट दृश्य मिळते आणि अचूकतेने शस्त्रक्रिया करता येते. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुरक्षित ठरते.

वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर येथील डॉक्टर सांगतात की मानेला दीर्घकाळ सूज असल्यास ती दुर्लक्षित करू नये. अनेक थायरॉईड गाठी कॅन्सर नसलेल्या असतात, तरीही वेळेवर तपासणी आणि उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण यामुळे श्वास घेण्यास त्रास, अन्न गिळण्यास अडचण किंवा गाठीचा आकार वाढणे अशा समस्या टाळता येतात. लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास प्रत्येक रुग्णासाठी योग्य उपचार योजना ठरवता येते.

ही प्रगत स्कारलेस थायरॉईड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यामुळे वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर रुग्णांना आधुनिक आणि प्रगत उपचार उपलब्ध करून देण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकते. अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन यांच्या माध्यमातून हे हॉस्पिटल घराजवळच जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देत आहे.

मिनिमली इनव्हेसिव्ह शस्त्रक्रिया तंत्रज्ञान सतत विकसित होत असल्याने TOETVA सारख्या शस्त्रक्रिया पद्धती थायरॉईड आजारांवर उपचार करण्याची पद्धत बदलत आहेत. यामुळे रुग्णांना आत्मविश्वासाने, आरामात बरे होता येते तसेच शस्त्रक्रियेनंतर मानेवर कोणताही दिसणारा डाग राहत नाही.

Post a Comment

0 Comments