Business

Header Ads

‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’च्या नव्या मोटर इन्शुरन्स जाहिरातीत पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत !

थोडक्यात पण महत्त्वाचे

‘चुनिये भरोसा, अपनों सा’ या जाहिरात मोहिमेचा भाग असलेल्या या नव्या जाहिरातीत दैनंदिन जीवनातील निर्णयांमध्ये विश्वासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकांनी खऱ्या अर्थाने विश्वास ठेवता येईल अशा मोटर इन्शुरन्स भागीदाराची निवड करावी, असा संदेशही या जाहिरातीतून देण्यात आला आहे.

मुंबई, 10 ऑगस्ट 2026 : भारतातील आघाडीच्या सर्वसाधारण विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’ने आपल्या ‘चुनिये भरोसा, अपनों सा’ या एकात्मिक ब्रँड जाहिरातीचा पुढील टप्पा सुरू केला आहे. या नव्या जाहिरातीचा केंद्रबिंदू मोटर इन्शुरन्स आहे. अभिनेते आणि ब्रँड ॲम्बेसेडर पंकज त्रिपाठी यांच्या सहभागातून ही जाहिरात विमा कंपनीची निवड विश्वासाने करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. त्याचबरोबर, ग्राहकांचा विश्वास जपण्याचा ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’चा संदेशही प्रभावीपणे मांडते.

‘चुनिये भरोसा, अपनों सा’ या संकल्पनेला पुढे नेत, या नव्या मोटर इन्शुरन्स जाहिरातीत दैनंदिन जीवनातील आणखी एका महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अगदी साध्या आणि प्रत्येकाच्या अनुभवाशी जोडलेल्या प्रसंगातून ही जाहिरात एक महत्त्वाचा संदेश देते. आपल्या मौल्यवान वाहनाची जबाबदारी कोणाकडे द्यायची याचा विचारपूर्वक निर्णय आपण ज्याप्रमाणे घेत असतो, त्याचप्रमाणे मोटर इन्शुरन्स भागीदाराची निवड करतानाही तितकाच विचार आणि विश्वास आवश्यक असतो. या जाहिरातीतून ग्राहकांना केवळ विमा पॉलिसीवर भर न देता, गरजेच्या वेळी विश्वासाने साथ देणारा भागीदार निवडण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे.

बहुसंख्य ग्राहक वाहन खरेदी करताना प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करतात. मात्र, मोटर इन्शुरन्स घेताना तो अनेकदा केवळ एक औपचारिक प्रक्रिया म्हणून घेतला जातो. म्हणूनच, केवळ पॉलिसी न पाहता, विश्वास ठेवता येईल अशा भागीदाराची विचारपूर्वक निवड करण्याचे आवाहन एसबीआय जनरल इन्शुरन्स या जाहिरातीद्वारे ग्राहकांना करीत आहे. विमा अधिक सोपा, सहज उपलब्ध आणि ग्राहकांच्या गरजांशी सुसंगत करण्यासाठी ही कंपनी सातत्याने प्रयत्न करीत असून, गरजेच्या वेळी विश्वासार्ह संरक्षण आणि आवश्यक सहकार्य देण्यावर तिचा भर आहे.

या जाहिरातीविषयी बोलताना ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन चंद्र झा म्हणाले, “विमा हा ग्राहकांनी निवडलेल्या भागीदारावरील विश्वासावर आधारलेला असतो. आजच्या दैनंदिन जीवनात वाहन हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ग्राहकांना या वाहनासाठी सोपे, पारदर्शक आणि विश्वासार्ह संरक्षण हवे असते. ‘चुनिये भरोसा, अपनों सा’ या मोहिमेअंतर्गत सादर केलेल्या मोटर इन्शुरन्सच्या नव्या जाहिरातीतून विमा अधिक उपयुक्त करण्याच्या आमच्या प्रयत्नांना आणखी चालना मिळत आहे. वाहन मालकीच्या संपूर्ण प्रवासात ग्राहकांना आवश्यक ते सहकार्य देण्याची आमची कटिबद्धताही कायम आहे.”

याबाबत अधिक माहिती देताना ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’चे मार्केटिंग आणि सीएसआर विभागप्रमुख रथीन लाहिरी म्हणाले, “या जाहिरातीमागील मुख्य विचार अतिशय साधा आहे. कार ही केवळ एक गाडी नसते. ती एखाद्याच्या मेहनतीचे यश, त्याची वैयक्तिक जागा, त्याची स्वतःची ओळख, स्वातंत्र्य आणि नियंत्रण यांचे प्रतीक असे सर्वकाही असते. अनेकांसाठी ती त्यांच्या सर्वांत मौल्यवान मालमत्तांपैकी एक असते. अशा मौल्यवान गोष्टीचे संरक्षण करताना तडजोड का करावी? अशा वेळी गॅरेजचे विस्तृत नेटवर्क आणि दावे निकाली काढण्याचा सिद्ध अनुभव असलेल्या विश्वासार्ह ब्रँडची निवड करणे हे अधिक योग्य ठरते. पंकज त्रिपाठी यांच्या सहज आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्त्वामुळे हा संदेश सर्व स्तरांतील प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो. या जाहिरातीद्वारे ग्राहकांनी मोटर इन्शुरन्सकडे केवळ एक पॉलिसी म्हणून न पाहता, गरजेच्या वेळी साथ देणारा विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहावे, अशी आमची अपेक्षा आहे.”

आपल्या सहज, नैसर्गिक अभिनयामुळे आणि प्रभावी कथनशैलीमुळे पंकज त्रिपाठी हे प्रेक्षकांशी सहज नाते जोडतात. त्यामुळे ‘चुनिये भरोसा, अपनों सा’ या जाहिरातीतील विश्वास, साधेपणा आणि विश्वासार्हता ही मूल्ये ते प्रभावीपणे मांडतात. विविध भागांतील आणि सर्व वयोगटांतील प्रेक्षकांशी त्यांचे सहज जुळणारे नाते पाहता, ग्राहकांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’च्या भूमिकेसाठी ते योग्य ब्रँड ॲम्बेसेडर ठरतात. ही जाहिरात दूरदर्शन, वर्तमानपत्रे, जाहिरातीची बाह्य माध्यमे, ओटीटी आणि डिजिटल माध्यमे यांसह विविध व्यासपीठांवर प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’ला विविध माध्यमांतून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येणार आहे.

या जाहिरातीला ‘एसबीआय जनरल इन्शुरन्स’च्या सर्वसमावेशक मोटर इन्शुरन्स योजनांची जोड देण्यात आली आहे. वाहन मालकीचा अनुभव अधिक सोपा आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने या योजना तयार करण्यात आल्या आहेत. देशभरातील ८,४०० हून अधिक गॅरेजेसचे नेटवर्क, कॅशलेस दुरुस्तीची सुविधा, दाव्यांना जलद मंजुरी आणि पारदर्शक दावा प्रक्रिया यांतून ही कंपनी ग्राहकांना अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. तसेच, अनपेक्षित परिस्थितीत वाहनमालकांना आवश्यक संरक्षण आणि वेळेवर सहकार्य मिळावे, यासाठीही कंपनी कटिबद्ध आहे.

Post a Comment

0 Comments