Business

Header Ads

दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान येथे 'लिटररी ओडिसी २०२६' चे यशस्वी आयोजन !

नागपुर : दिल्ली पब्लिक स्कूल मिहानने दिनांक ६ ऑगष्ट २०२६ रोजी भव्यस्वरूपात 'लिटररी ओडिसी अफिस्ट फॉर द माइंड' या आंतरशालेय इंग्रजी साहित्य महोत्सवाची चौथी आवृत्ती यशस्वीरित्या आयोजित केली.

या महोत्सवात भाषा, सर्जनशीलता आणि चिकित्सक विचारांचा उत्साहपूर्ण उत्सव साजरा करण्यासाठी विविध शाळांमधील विद्यार्थी एकत्र आले होते. या कार्यक्रमात विविध आकर्षक स्पर्धांचा समावेश होता, ज्यातून सहभागींचा आत्मविश्वास, कल्पनाशक्ती आणि संवाद कौशल्ये दिसून आली. दिल्ली पब्लिक स्कूल, कामठी रोड व मिहानच्या अध्यक्षा आणि

प्रो- व्हाईसचेअरपर्सन तुलिका केडिया आणि संचालिका सविता जयस्वाल यांनी समारोप समारंभात ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहून सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

'द टाइम्स ऑफ इंडिया', नागपूरचे निवासी संपादक श्री पार्थ मैत्रा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. साहित्य, माध्यम, शिक्षण आणि कला या क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती, तसेच प्रतिष्ठित परीक्षक मंडळात श्री सचिन जहागीरदार, प्रियंका कोठारी, आसावरी देशपांडे, तराना फजल, डॉ. अफसाना बदर, श्री पवन गणेश पिप्रोडे आणि श्री आदित्य शर्मा यांचाही याप्रसंगी समावेश होता. शाळेच्या संगीत विभागातर्फे नृत्य प्रस्तुती देण्यात आली.

प्राचार्या निधी यादव यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि आत्मविश्वासू, दयाळू व स्पष्टवक्ता व्यक्ती घडवण्यासाठी साहित्यिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. वाचन, लेखन आणि विचारपूर्वक अभिव्यक्तीची आवड जोपासणारे व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल मान्यवरांनी शाळेची प्रशंसा केली. परीक्षक वर्गाकडून विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उल्लेखनीय प्रतिभेचे कौतुक केले. विविध श्रेणींतील विजेत्यांचा टाळ्यांच्या कडकडाटात सत्कार करण्यात आला, तर सर्व सहभागींच्या उत्कृष्ट प्रयत्नांचे आणि खेळाडूवृत्तीचे कौतुक करण्यात आले.

आपल्या समृद्ध अनुभवांनी आणि प्रेरणादायी सादरीकरणांनी, 'मोनोलॉग मोझेंक', 'पोएट्री इन मोशन', 'क्युरियस क्रॉनिकल्स', 'प्रोमिथियन स्लेट', 'सिनेस्पीक' आणि 'मूड्स अँड एक्सप्रेशन' यांसारख्या आकर्षक कार्यक्रमांसह 'लिटररी ओडिसी २०२६' खऱ्या अर्थाने 'मनासाठी एक मेजवानी' या आपल्या संकल्पनेला सार्थ ठरवणारा ठरला, आणि सहभागींना साहित्याच्या अमर्याद विश्वाचा शोध सुरू ठेवण्यास प्रेरित केले.

छायाचित्र

Post a Comment

0 Comments