Business

Header Ads

महिंद्रा’ने बाजारात आणली ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’;ड्रायव्हिंगचा भरपूर आनंद आणि ‘महिंद्रा’ची खास ओळखकिंमत ९.९९ लाख रुपयांपासून सुरू !

थोडक्यात पण महत्त्वाचे

• टर्बो इंजिनची ताकद आणि श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्क : सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही प्रकारांत ८२ किलोवॅटची शक्ती मिळते. भारतातील सीएनजी प्रवासी गाड्यांमध्ये या गाडीचा २०० एनएम टॉर्क सर्वोत्तम आहे.
• वेगवान सुरुवात : सीएनजीवर चालताना ही गाडी अवघ्या ४.९ सेकंदांत ताशी ३० ते ६० किलोमीटरचा वेग गाठते.
• प्रगत सीएनजी तंत्रज्ञान : या श्रेणीत पहिल्यांदाच १० बार दाबाने सीएनजी इंजेक्शन देणारी यंत्रणा वापरण्यात आली आहे. यामुळे गाडीचा प्रतिसाद चांगला मिळतो आणि इंधनाचा कार्यक्षम वापर होतो.
• टर्बो इंजिनमुळे उत्तम मायलेज : ही गाडी प्रति किलो सीएनजीमागे २४.७ किलोमीटरचे प्रमाणित मायलेज देते. त्यामुळे चांगली कामगिरी आणि कमी खर्चात गाडी चालवण्याचा फायदा मिळतो.
• जागेचा कल्पक वापर : गाडीच्या तळाशी सीएनजीचे दोन सिलिंडर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे सामान ठेवण्यासाठी सपाट तळ आणि डिक्कीमध्ये वापरता येण्याजोगी जागा मिळते.
• सुरक्षा सुविधांचा समावेश : या गाडीची रचना ५-स्टार सुरक्षा मानांकनाच्या दृष्टीने करण्यात आली आहे. सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी), ‘आयएसओफिक्स’ आणि ‘सीएनजी’साठीच्या विशेष सुरक्षा सुविधांसह ३५ हून अधिक सुविधा सर्व प्रकारांत देण्यात आल्या आहेत.

मुंबई, ऑक्टोबर २०२६ : भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड हिने ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’ ही आपली पहिली सर्वसामान्य ग्राहकांसाठीची सीएनजी प्रवासी कार बाजारात आणली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत ९.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’मुळे सीएनजी गाड्यांमधूनही वेगवान आणि उत्साही ड्रायव्हिंगचा अनुभव घेता येतो, हे दिसून येईल. 

या गाडीत टर्बोचार्ज्ड इंजिन आहे. सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही प्रकारच्या इंधनांवर हे इंजिन ८२ किलोवॅट शक्ती आणि २०० एनएम टॉर्क देते. ही गाडी प्रति किलो सीएनजीमध्ये २४.७ किलोमीटरचे प्रमाणित मायलेज देते. त्यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद कायम ठेवून इंधनावरील खर्च कमी करण्याचा पर्याय ग्राहकांना मिळतो. ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’मध्ये केवळ सीएनजीची बचतच नाही, तर टर्बोचार्ज्ड इंजिनची कामगिरी, आकर्षक डिझाइन, प्रशस्त जागा, आधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी प्रवास आणि सुरक्षितता यांचाही समावेश आहे. आकर्षक किमतीत उपलब्ध असलेली ही गाडी सीएनजी एसयूव्ही घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय आहे.

‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’मुळे एसयूव्ही खरेदी करणे अधिक ग्राहकांना शक्य होणार आहे. विशेषतः पहिल्यांदाच एसयूव्ही घेऊ इच्छिणाऱ्या आणि अधिक शक्तिशाली इंजिन व आधुनिक सुविधांची अपेक्षा असलेल्या ग्राहकांसाठी ही गाडी चांगला पर्याय आहे. या गाडीच्या सुरुवातीच्या प्रकारातही २६.०३ सेंटीमीटरची एचडी टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, मागील सीटसाठी एसी व्हेंट्स आणि ६०:४० प्रमाणात विभागता येणारी मागील सीट अशा प्रीमियम सुविधा आहेत. साहजिकच, सीएनजीमुळे इंधनावरील खर्च कमी होतोच, शिवाय ‘एक्सयूव्ही ३एक्सओ’ची खास रचना, आधुनिक तंत्रज्ञान आणि दैनंदिन वापरातील सोयीही अनुभवता येतात. ड्रायव्हिंगच्या आनंदात कोणतीही तडजोड करावी लागत नाही.

‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या ऑटोमोटिव्ह व्यवसायाचे अध्यक्ष डॉ. वेलुसामी आर. म्हणाले, “’एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’चे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही तडजोड न करता उत्तम अनुभव देणे. आजच्या ग्राहकांना ‘एसयूव्ही’मधील प्रशस्त जागा, आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि उत्तम ड्रायव्हिंगचा अनुभव हवा असतो. त्याच वेळी सीएनजीमुळे इंधनावरील खर्चही कमी व्हावा, अशी त्यांची अपेक्षा असते. या गाडीत तिच्या श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्क, टर्बोचार्ज्ड इंजिनची कामगिरी आणि प्रभावी मायलेज यांचा संगम आहे. त्यामुळे ‘सीएनजी’ची किफायतशीरता आणि एसयूव्ही चालवण्याचा आनंद या दोन्ही गोष्टी एकाच गाडीत मिळतात. ‘सीएनजी एसयूव्ही’कडून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही गाडी नवा मापदंड ठरवेल.”

मुख्य वैशिष्ट्ये

टर्बो इंजिनची दमदार कामगिरी व ड्रायव्हिंगचा उत्साह – सीएनजी व पेट्रोल, दोन्ही प्रकारांत
• कामगिरीत कोणतीही तडजोड नाही : १.२ लिटरचे एमस्टॅलियन टीसीएमपीएफआय टर्बोचार्ज्ड इंजिन हे सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही प्रकारांत ८२ किलोवॅट शक्ती आणि २०० एनएम टॉर्क देते. टर्बोचार्जरची कार्यपद्धती आणि इंजिनचे इलेक्ट्रॉनिक नियंत्रण यंत्रणा (ईसीयू) यांची योग्य जुळवणी केल्यामुळे इंधनाचा प्रकार कोणताही असला, तरी इंजिनची शक्ती आणि टॉर्क समान राहतात. त्यामुळे प्रत्येक प्रवासात एक्सयूव्ही ३एक्सओची दमदार कामगिरी आणि ड्रायव्हिंगचा आनंद अनुभवता येतो.
• या श्रेणीतील सर्वाधिक टॉर्क : भारतातील सीएनजी प्रवासी गाड्यांमध्ये ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’चा २०० एनएम टॉर्क सर्वोत्तम आहे. १,५०० ते ३,५०० आरपीएम या इंजिनच्या वेगमर्यादेतही हा टॉर्क उपलब्ध होतो. त्यामुळे गाडी वेगाने पुढे जाते. शहरातील रस्त्यांवर तसेच महामार्गावरही गाडी चालवणे सहज आणि आत्मविश्वासपूर्ण होते.
• वेगाने पकडते गती : सीएनजीवर चालताना ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’ला ताशी ० ते ६० किलोमीटर वेग गाठण्यासाठी ४.९ सेकंद, तर ताशी ० ते १०० किलोमीटर वेग गाठण्यासाठी ११.८ सेकंद लागतात.
अधिक अंतर कापा, ड्रायव्हिंगचा आनंद घ्या.
• मायलेज आणि कामगिरी यांचा उत्तम मेळ : या गाडीचे प्रमाणित मायलेज प्रति किलो सीएनजीमागे २४.७ किलोमीटर इतके आहे. त्यामुळे इंधनावरील खर्च कमी होतो. त्याच वेळी, एक्सयूव्ही ३एक्सओकडून अपेक्षित असलेली टर्बो इंजिनची दमदार कामगिरीही अनुभवता येते.
• सीएनजी आणि पेट्रोलचा सहज वापर : चालकाला सीएनजी किंवा पेट्रोल यांपैकी कोणत्याही इंधनावर गाडी चालवता येते. सीएनजी कमी झाल्यास गाडी आपोआप पेट्रोलवर चालू लागते. त्यामुळे प्रवासात खंड पडत नाही आणि ड्रायव्हिंगचा आनंद कायम राहतो.
• वापरातील सोयी लक्षात घेऊन केलेली रचना : गाडीच्या डिस्प्लेवर सरासरी आणि त्या क्षणाचे मायलेज दिसते. त्यामुळे इंधनाचा वापर किती होत आहे, याची माहिती तत्काळ मिळते. एनजीव्ही फास्ट-फिलिंग व्हॉल्व्हमुळे सीएनजी भरण्यास कमी वेळ लागतो आणि ही प्रक्रिया अधिक सोयीस्कर होते. त्यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद घेण्यासाठी अधिक वेळ मिळतो.
स्मार्ट रचना. प्रीमियम लूक. प्रत्येक गोष्टीत झिंग!
• जागेचा कल्पक वापर : सीएनजीच्या दोन सिलिंडरची रचना सामान ठेवण्याच्या जागेखाली केली आहे. त्यामुळे सामान ठेवण्यासाठी सपाट तळ कायम राहतो आणि डिक्कीमध्ये २७० लिटर वापरता येण्याजोगी जागा मिळते. अतिरिक्त चाक गाडीच्या तळाशी बसवलेले आहे.
• प्रीमियम एसयूव्हीचा आकर्षक लूक : ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’मध्ये अनेक खास सुविधा आहेत. यात २६.०३ सेंटीमीटरच्या दोन स्क्रीन, स्कायरूफ™, ‘डॉल्बी ॲटमॉस’चे प्रभावी ध्वनितंत्रज्ञान, काळ्या रंगाच्या लेदरसदृश सीट्स, गाडीच्या रंगातील किंवा गनमेटल ग्रे रंगातील आकर्षक ग्रिल#, दोन रंगांचे स्टायलिश छत आणि काळ्या रंगाची आर१६ अलॉय व्हील्स यांचा समावेश आहे.
झिंगचा आनंद कायम ठेवत, सुरक्षेशी कोणतीही तडजोड नाही
• सर्व प्रकारांत सहा एअरबॅग्ज : ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’च्या प्रत्येक प्रकारात सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि लहान मुलांच्या सीटसाठी आयएसओफिक्स माउंट्स देण्यात आले आहेत.
• सुरक्षेसाठी तत्पर यंत्रणा : गॅस गळती ओळखणारी यंत्रणा गळती झाल्यास ती लगेच ओळखते. त्यानंतर गाडी आपोआप पेट्रोलवर चालण्याच्या मोडमध्ये जाते.
• ५-स्टार सुरक्षा मानांकनासाठी तयार : एक्सयूव्ही ३एक्सओच्या आधीच्या मॉडेलला ‘भारत एनसीएपी’च्या ‘प्रौढ प्रवासी सुरक्षा’ आणि ‘बाल प्रवासी सुरक्षा’ या दोन्ही चाचण्यांमध्ये ५-स्टार मानांकन मिळाले आहे. त्याच मॉडेलच्या आधारावर एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी तयार करण्यात आली आहे.

‘एक्सयूव्ही ३एक्सओ’विषयी :

‘महिंद्रा’च्या सर्वाधिक यशस्वी एसयूव्हींपैकी ‘एक्सयूव्ही ३एक्सओ’ ही एक आहे. अवघ्या अडीच वर्षांपेक्षा कमी काळात या गाडीची एकूण विक्री २.५ लाखांहून अधिक झाली आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या श्रेणीत या गाडीने नवा मापदंड निर्माण केला आहे. आकर्षक डिझाइन, दमदार कामगिरी, प्रगत सुरक्षा व्यवस्था, प्रीमियम इंटिरिअर आणि या श्रेणीतील सर्वोत्तम तंत्रज्ञान यांचा मेळ या गाडीत आहे. ‘महिंद्राच्या एसयूव्ही’च्या परंपरेतून तयार झालेली एक्सयूव्ही ३एक्सओ ग्राहकांना गाडी चालवण्याचा आनंददायी अनुभव देते. या श्रेणीतील अनेक वैशिष्ट्ये आणि किमतीच्या तुलनेत अधिक फायदे यामुळे आधुनिक एसयूव्ही खरेदीदारांची ती पसंती ठरली आहे. टेस्ट ड्राइव्ह, बुकिंग आणि गाडीची डिलिव्हरी ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’ची टेस्ट ड्राइव्ह १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल.

या गाडीचे बुकिंग २० ऑक्टोबर २०२६ पासून अधिकृत डीलरकडे आणि auto.mahindra.com या संकेतस्थळावर करता येईल. गाड्यांची डिलिव्हरीही २० ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल.
गाडीच्या प्रकारानुसार किंमत (लाख रुपयांत)
सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.
गाडीचा प्रकार एमएक्स एज रेव्हएक्स एज (ओ) एएक्स५ रेव्हएक्स ए
किंमत ₹ ९.९९ लाख ₹ १०.७९ लाख ₹ ११.१९ लाख ₹ १२.२७ लाख

Post a Comment

0 Comments