Business

Header Ads

भारतातील पहिली ओव्हुलेशन टेस्टिंग किट आय-चूजकडून नवीन मोहीम लाँच, गर्भधारणेसाठी योग्य वेळेचे महत्त्व दर्शवते !

थोडक्यात पण महत्त्वाचे

मॅककॅन इंडियाने संकल्पित केलेली ही मोहीम गर्भधारणेसाठी या किटला सोपा आणि वैज्ञानिक आधार असलेला मार्ग म्हणून सादर करते

मुंबई : आय-चूज या भारतातील पहिल्या ओव्हुलेशन टेस्टिंग किटने ब्रँड अॅम्बेसेडर श्रिया पिळगावकर यांची मुख्य भूमिका असलेली नवीन मोहीम ‘द प्री-प्रेग्नन्सी टेस्ट' लाँच केली आहे. ऑम्निकॉम अॅडव्हर्टायझिंग इंडियाचा भाग असलेल्या मॅककॅन इंडियाने संकल्पित केलेली ही मोहीम गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांना केवळ अंदाजांवर अवलंबून न राहता प्रयत्नांसाठी योग्य वेळ समजून घेण्यास प्रोत्साहित करते.

बहुतेक जोडप्यांना प्रेग्नन्सी टेस्टची (गर्भधारणा चाचणी) चांगली ओळख असते, जी ते प्रयत्नांनंतर करतात. पण, प्रयत्नांआधी केल्या जाऊ शकणाऱ्या चाचणीचा विचार खूप कमी व्यक्ती करतात. आय-चूज ओव्हुलेशन टेस्टिंग किटला ‘द प्री-प्रेग्नन्सी टेस्ट' म्हणून स्थान देऊन ही मोहीम ओव्हुलेशन चाचणी समजणे सोपे करते आणि गर्भधारणेच्या प्रवासात असलेल्यां साठी अधिक सुकर बनवते. ही घरगुती चाचणी गर्भधारणेसाठी सर्वोत्तम ५ दिवस ओळखण्यात मदत करते, ज्यामुळे जोडप्यांना योग्य वेळेबाबत अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता येतात.

ही मोहीम ग्राहकांच्या साध्या निरीक्षणावर आधारित आहे: गर्भधारणेचा प्रयत्न करताना जोडपी योग्य ते सर्व करण्याच्या प्रयत्नात अनेक बदल करतात, ज्यामध्ये सकस आहार घेणे आणि व्यायामापासून दैनंदिन दिनचर्या सुधारण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असतो, पण प्रयत्नांसाठी योग्य वेळ कोणती हे समजून घेण्याचे महत्त्व त्यांच्याकडून दुर्लक्षित होऊ शकते. आय-चूजचे उद्दिष्ट जोडप्यांना बाळा साठी प्रयत्न करण्याच्या त्यांच्या प्रवासात ओव्हुलेशन चाचणीचा सवय म्हणून समावेश करण्यास प्रोत्साहित करणे हे आहे. या मोहिमेची "डोंट ट्राय हार्डर. ट्राय स्मार्टर" सर्जनशील संकल्पना आहे, जी केवळ अधिक प्रयत्न करण्याऐवजी प्रयत्नांसाठी योग्य वेळेची अचूक माहिती असण्यावर भर देते.

या मोहिमेतील एक जाहिरात मैत्रिणींमधील आपुलकीच्या नात्यातून ही संकल्पना प्रभावीपणे मांडते. श्रिया पिळगावकर विश्वासू मैत्रिणीच्या भूमिकेत आहेत, ज्या आपल्या मैत्रिणीला गर्भधारणेच्या प्रयत्नांचा भाग म्हणून फर्टिलिटी योगा करताना पाहतात. तिला दिनचर्येत कसरत करताना पाहून श्रिया तिची आय-चूज ओव्हुलेशन टेस्टिंग किट आणि ‘प्री-प्रेग्नन्सी टेस्ट' संकल्पनेशी ओळख करून देतात, तसेच प्रयत्नांसाठी सर्वोत्तम ५ दिवस ओळखण्यात ही किट कशी मदत करू शकते हे समजावून सांगतात. हलकाफुलका विनोद आणि मैत्रिणींमधील सहज संवादाच्या माध्यमातून ही जाहिरात दाखवते की, जोडपी गर्भधारणेच्या प्रवासात अनेक गोष्टी करत असताना आपली प्रजननासाठी सर्वात योग्य वेळ समजून घेणे हे विचारात घेण्यासारखे महत्त्वाचे पाऊल आहे.

दुसरी जाहिरात हा संवाद बेडरूममध्ये नेते आणि पती-पत्नीच्या नात्यातील सहजता समोर आणते. श्रिया पिळगावकर आपल्या पतीला ओव्हुलेशन टेस्टिंग स्टिक दाखवतात, ज्याला सुरुवातीला तो प्रेग्नन्सी टेस्ट समजण्याची चूक करतो. श्रिया गमतीने त्याची ‘प्री-प्रेग्नन्सी टेस्ट' म्हणून ओळख करून देतात आणि ही टेस्ट बाळासाठी प्रयत्न करण्याचे सर्वोत्तम ५ दिवस ओळखण्यात कशी मदत करते हे सांगतात. या जाहिरातीमध्ये ओव्हुलेशनसारख्या वैद्यकीय विषयावरील चर्चा अधिक स्वाभाविक आणि सहज बनवण्यासाठी पती-पत्नीमधील केमिस्ट्री व विनोदाचा वापर करण्यात आला आहे, तसेच बाळासाठी प्रयत्न करणे हा प्रवास असून जोडपी तो एकत्रपणे पूर्ण करू शकतात, यावर भर देण्यात आला आहे.

या मोहिमेच्या लाँचबाबत मत व्यक्त करत पिरामल कंझ्युमर हेल्थकेअरचे सीएमओ अभिषेक कुमार श्रीवास्तव म्हणाले, "आय-चूजमध्ये आमचा विश्वास आहे की, योग्य माहिती असल्यास माहितीपूर्ण निर्णयांची सुरुवात होते. जोडपी गर्भधारणेचे नियोजन करतात, तेव्हा त्यांचा बराचसा भर जीवनशैलीतील बदल आणि गर्भधारणेच्या पूर्वतयारीवर असतो, तर प्रयत्नांसाठी योग्य वेळ समजून घेणे अनेकदा दुर्लक्षित राहते. ‘द प्री-प्रेग्नन्सी टेस्ट'च्या माध्यमातून आम्हाला ही उणीव भरून काढायची आहे आणि ओव्हुलेशन चाचणीला त्यांच्या गर्भधारणेच्या प्रवासाचा अविभाज्य भाग म्हणून पाहण्यास जोडप्यांना प्रोत्साहित करायचे आहे. ही मोहीम सहज आणि हलक्याफुलक्या कथानकाद्वारे सध्याच्या समजुतींना आव्हान देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामुळे महत्त्वाचा वैज्ञानिक पैलू समजून घेणे आणि त्यावर कृती करणे सोपे होते."

याबाबत आपले मत व्यक्त करत मॅककॅन इंडियाच्या क्रिएटिव्ह प्रमुख अनुशीला साहा म्हणाल्या, "गर्भधारणेचा प्रवास अनेक जोडप्यांसाठी केवळ नियमांची चेकलिस्ट बनून राहू शकतो, ज्यामुळे कष्टाचे काम वाटू लागतो. नेमका हाच विचार आमच्या मोहिमेचा गाभा बनला: ‘डोंट ट्राय हार्डर. ट्राय स्मार्टर.' आम्हाला हा विचार वैद्यकीय सल्ल्यासारखा वाटण्या ऐवजी विश्वासू मैत्रिणीकडून मिळालेल्या सल्ल्यासारखा वाटायला पाहिजे होता. म्हणून, श्रिया पिळगावकर आणि मैत्रिणींमधील जिव्हाळ्याच्या माध्यमातून आम्ही अनेकदा तणावपूर्ण वाटणाऱ्या या प्रवासात काहीसा विनोद आणला आहे, तसेच प्रयत्नांसाठी सर्वोत्तम दिवस ओळखण्यासाठी ओव्हुलेशन चाचणी सोपे, वैज्ञानिक आधार असलेले पाऊल आणि या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून सादर केले आहे."

ही मोहीम युट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसह विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर सुरू करण्यात आली आहे.

कॅम्पेन लिंक्स: https://youtu.be/mKwasu0L57w ; https://youtu.be/C39GRGOBflM

Post a Comment

0 Comments