Business

Header Ads

एचडीएफसी बँके तर्फे फेस्टिव्ह ट्रीट्स २०२६ ची सुरुवात- १०,००० हून अधिक आकर्षक ऑफर्स !

थोडक्यात पण महत्त्वाचे

• कर्जे, कार्ड्स, अकाऊंट्स आणि कार्डांवर ईझी ईएमआयच्या विविध ऑफर्स
• वेगवेगळ्या ब्रॅन्ड्सच्या रेंज वर अनेक लाभ
• एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड्स तसेच डेबिट/ क्रेडिट कार्डांवरील ईझीईएमआय वर ७००००*रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी 

मुंबई, ऑक्टोबर २०२६- एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँके तर्फे आज त्यांच्या वार्षिक अशा फेस्टिव्ह ट्रीट्स २०२६ मोहिमेच्या सुरुवातीची घोषणा केली, यामुळे आता देशभरांतील सणासूदीच्या दिवसांची खरी सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशभर चालणार्याो या वार्षिक महोत्सवात बँके ग्राहकांना तर्फे त्यांची कर्जे, कार्ड्स, बचत आणि चालू खात्यांसह, कार्डांवर ईझीईएमआय सारख्या १० हजारांहून अधिक ऑफर्स दिल्याने सणासुदीची खरेदी अधिक परवडणारी आणि प्रोत्साहक ठरणार आहे.

या वर्षीच्या एचडीएफसी बँक फेस्टिव्ह ट्रीट्सचा विषय ‘ट्रीट विथ ऑल युवर हार्ट’ असा असून या विषयानुसार आपल्या प्रियजनांची काळजी, प्रेम हे खरेदीतून व्यक्त करण्यावर जोर देण्यात आला आहे. बँके तर्फे एक्सप्रेस पर्सनल लोन्स, एक्सप्रेस कार लोन्स आणि अन्य वाहनांसाठीची कर्जे, होम लोन्स, गोल्ड लोन्स, स्पेशल सेव्हिंग्ज अकाऊंट्स आणि सर्वसमावेशक व्यावसायिक बँकिंग उपाय देणार्याठ माय बिझनेस सारख्या उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. ग्राहकांना आता एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डासह डेबिट/क्रेडिट कार्डावरील ईझीईएमआय च्या पर्यायाने खरेदी करुन ७०,००० रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी प्राप्त होणार आहे.  

फेस्टिव्ह ट्रीट्स च्या ऑफर्स या तयार कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, प्रवास, होम डेकोर, दागिने आणि अशा अन्य उत्पादनांसाठी उपलब्ध असणार आहे. बँकेने एलजी इलेक्ट्रॉनिक्स, गुगल पिक्सेल, सॅमसंग, वनप्लस, विजय सेल्स, क्रोमा, रिलायन्स डिजिटल, मेकमाय ट्रिप,मिंत्रा, रिलायन्स सेंट्रो, वर्ल्ड ऑफ टायटन, रॉयल ओक, होंडा, जीआरटी ज्वेलर्स आणि जोयालुकास अशा विविध ब्रॅन्ड्स बरोबर भागीदारी केली आहे. या वर्षीची ही मोहिम टप्प्या टप्प्याने देशातील सर्व भागात सुरु करण्यात येत असून दिवाळी मध्ये या उपक्रमाची सांगता होणार आहे. या दृष्टिकोना मुळे देशभरांतील सर्व ग्राहकांना योग्य वेळी या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.

त्याच बरोबर बँके ने विविध सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएन्सर्स बरोबर करार करुन व्हर्च्युअल मास्टर क्लासेसच्या माध्यमून त्यांच्या प्रेक्षक/फॉलोअर्स ना गेटिंग रेडी फॉर दिवाली, प्लानिंग फॉर रिटायरमेंट, फॉलोइंग अ पॅशन, सेव्हिंग्ज फॉर द नेक्स्ट हॉलिडेज आणि अशा अन्य विषयांवर माहिती दिली जाणार आहे.
एचडीएफसी बँकेचे चीफ मार्केटिंग ऑफिसर आणि ग्रुप हेड (ब्रॅन्ड, रिटेल मार्केटिंग आणि कस्टमर ॲनेलिटिक्स) श्री रवी संथानम यांनी सांगितले “सणासुदीचा काळ हा भारतभरातील लाखो कुटुंबांसाठी आनंदाचा, एकत्र येण्याचा आणि नव्या सुरुवातींचा काळ असतो. 

प्रमुख ब्रँड्सकडून मिळणाऱ्या आकर्षक सवलतींसोबत ईझीइएमआय आणि एक्सप्रेस लोन्स सारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या क्रेडिट सुविधांची जोड देऊन, आम्ही आमच्या सर्व पात्र ग्राहकांसाठी क्रेडिट सुविधांचा विस्तार करत आहोत. टप्प्याटप्प्याने, पॅन-इंडिया स्तरावर राबवण्यात येणाऱ्या आमच्या उपक्रमामुळे देशातील प्रत्येक प्रदेशातील ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार खास ऑफर्स मिळतील, ज्यामुळे ते विचारपूर्वक खर्च करू शकतील आणि सण मोठ्या उत्साहात साजरे करू शकतील. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना सणासुदीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि एचडीएफसी बँके मार्फत खरेदी करताना जास्तीत जास्त बचतीचा लाभ घेण्याची त्यांना विनंती करतो.”

अधिक ऑफर्स साठी here येथे क्लिक करा.
* नियम आणि अटी लागू.
** एचडीएफसी बँकेच्या सर्व ऑफर्सचा लाभ घेणारी व्यक्ती ७० हजार रुपयांपर्यंतची बचत करु शकते.

Post a Comment

0 Comments