Business

Header Ads

वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपुरने ‘हेल्थऑन’ उपक्रम सुरू केला; प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल !

नागपूर, 04 नोव्हेंबर 2026 : प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नागरिकांनी आपल्या आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी, या उद्देशाने वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर 6 नोव्हेंबर 2026 पासून ‘हेल्थऑन’ (HealthON) या उपक्रमाची सुरुवात करणार आहे. या उपक्रमांतर्गत विविध आरोग्य तपासणी पॅकेजेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पॅकेजेसच्या माध्यमातून नागरिकांना नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी आणि संभाव्य आजारांचे वेळीच निदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण काम आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य देतात. त्यामुळे अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. जीवनशैलीशी संबंधित अनेक आजार हळूहळू वाढतात आणि सुरुवातीला त्यांची लक्षणेही दिसून येत नाहीत. नियमित आरोग्य तपासणीमुळे अशा आजारांचा किंवा आरोग्याच्या धोक्यांचा सुरुवातीलाच शोध घेता येतो. तसेच गरजेनुसार वेळेवर उपचार करणे शक्य होते.

‘हेल्थऑन’ उपक्रमाच्या माध्यमातून वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांचा आजार होण्यापूर्वीच आरोग्याची काळजी घेण्याच्या सुविधा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. तसेच, आजाराची लक्षणे दिसल्यानंतरच डॉक्टरांकडे जाण्याऐवजी नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे. ही आरोग्य तपासणी पॅकेजेस जीवनाच्या प्रत्येक टप्प्याचा विचार करून तयार करण्यात आली आहेत. महिला आणि पुरुषांसाठी चार वयोगटांनुसार आरोग्य तपासणीचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये 12–18 वर्षे, 19–30 वर्षे, 30–50 वर्षे आणि 50 वर्षांवरील वयोगटांचा समावेश आहे.

हेल्थऑन’ हा उपक्रम राबवून वोक्हार्ट हॉस्पिटल आरोग्याच्या सर्वांगीण काळजीवर भर देत आहे. तसेच, आजारांपासून बचाव आणि आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करण्याबाबत जनजागृती करत आहे. या आरोग्य तपासणी पॅकेजेसमुळे नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची स्थिती समजून घेता येईल आणि दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी योग्य निर्णय घेता येतील. 

या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. सौरभ नागर, सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर म्हणाले, “आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची वेळ आली आहे! कारण आरोग्याची काळजी केवळ आजारी पडल्यानंतरच घ्यायची नसते. त्यासाठी आरोग्याबाबत जागरूक राहणे, आजारांपासून बचाव करणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. आजार होण्याची वाट पाहू नका, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीला प्राधान्य द्या.”

नियमित आरोग्य तपासणी ही आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग बनवावा, असे आवाहन हॉस्पिटलतर्फे नागरिक, नोकरदार, कुटुंबे आणि ज्येष्ठ नागरिकांना करण्यात आले आहे. उपचारांइतकेच आजारांपासून बचाव करण्यालाही महत्त्व मिळावे, अशी आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

‘हेल्थऑन’ उपक्रमाच्या माध्यमातून वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरने निरोगी समाज निर्माण करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. आजपासूनच आपल्या आरोग्याला प्राधान्य देऊन उद्याचे जीवन अधिक निरोगी बनवावे, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी आणि हेल्थऑन पॅकेजेसच्या तपशीलासाठी संपर्क :
वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर
अपॉइंटमेंट हेल्पलाइन : 0712-6624433
इमर्जन्सी नंबर: 0712-6624400

Post a Comment

0 Comments