Business

Header Ads

टाटा क्लिक लक्झरी आणि जे’ज वॉच स्टोअर यांनी केली ‘द लक्झ वॉच ऑक्शन’च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा !

थोडक्यात पण महत्त्वाचे

जे’ज वॉच स्टोअरच्या सहकार्याने ४ ते ६ डिसेंबर २०२६ दरम्यान हा तीन दिवसीय ऑनलाइन लिलाव होणार आहे. यामध्ये रोलेक्स, ब्रेगुएट, ब्रीटलिंग आणि वाशरॉन कॉन्स्टँटिन यांसारख्या नामांकित ब्रँड्सच्या १०० हून अधिक प्री-लव्ह्ड घड्याळांचा समावेश असेल.

मुंबई, नोव्हेंबर २०२६ : भारतातील आघाडीचे लक्झरी लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म टाटा क्लिक लक्झरीने जे’ज वॉच स्टोअरच्या सहकार्याने ‘द लक्झ वॉच ऑक्शन’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली आहे. ४ ते ६ डिसेंबर २०२६ दरम्यान चालणाऱ्या या तीन दिवसीय ऑनलाइन लिलावात जगातील नामांकित वॉच ब्रँड्सची १०० हून अधिक निवडक आणि दुर्मिळ प्री-लव्ह्ड घड्याळे सादर केली जातील. देशभरातील घड्याळप्रेमी आणि कलेक्टर्सना ही खास घड्याळे पाहण्याची आणि खरेदी करण्याची ही एक सुवर्णसंधी असेल. या लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणी आणि बोली लावण्याची प्रक्रिया ऑक्शन वेबसाइटद्वारे पूर्ण केली जाईल, जी टाटा क्लिक लक्झरीच्या अॅणप आणि वेबसाइटवरून करता येईल.

‘द लक्झ वॉच ऑक्शन’ हा केवळ घड्याळांसाठी आयोजित केलेला एक विशेष लिलाव आहे, ज्यामध्ये खरेदीदारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क म्हणजेच ‘बायर्स प्रीमियम’ आकारले जाणार नाही. भारतातील प्री-ओन्ड घड्याळांचे सर्वात मोठे नेटवर्क असलेल्या जे’ज वॉच स्टोअरच्या सहकार्याने हा लिलाव होत आहे. यामध्ये कलेक्टर्सना अशी घड्याळे पाहता येतील आणि त्यावर बोली लावता येईल, जी त्यांचे ऐतिहासिक महत्त्व, दुर्मिळपणा आणि खास वैशिष्ट्यांमुळे निवडण्यात आली आहेत. अशी घड्याळे नेहमीच्या दुकानांतून किंवा पारंपरिक रिटेल माध्यमांतून मिळवणे अत्यंत कठीण असते. यासोबतच, टाटा क्लिक लक्झरीच्या विश्वासार्ह शॉपिंग अनुभवाअंतर्गत ग्राहकांना या घड्याळांच्या अस्सलपणाची आणि गुणवत्तेची संपूर्ण खात्री मिळेल.

या लिलावातील सर्व घड्याळे गुणवत्तेच्या सर्वोच्च निकषांवर तपासून अत्यंत बारकाईने निवडली गेली आहेत. या कॅटलॉगमध्ये रोलेक्स, ब्रेगुएट, ब्रीटलिंग आणि वाशरॉन कॉन्स्टँटिन यांसारख्या जगातील नामांकित वॉच ब्रँड्सच्या घड्याळांचा समावेश आहे. लिलावातील प्रमुख आकर्षणांमध्ये रोलेक्स डेटोना, रोलेक्स जीएमटी मास्टर II, रोलेक्स सबमरीनर, ब्रीटलिंग नेविटाइमर आणि ब्रेगुएट टाइप XX यांसारख्या प्रसिद्ध मॉडेल्सचा समावेश आहे.

या लिलावाबाबत बोलताना टाटा क्लिक लक्झरीचे सीईओ गोपाल अस्थाना म्हणाले, “घड्याळप्रेमी आणि कलेक्टर्ससाठी कोणतेही घड्याळ केवळ त्याच्या डिझाइनपुरते मर्यादित नसते, तर त्याची कारागिरी, वारसा आणि ते किती दुर्मिळ आहे हे घटकही तितकेच महत्त्वाचे असतात. ऑनलाइन वॉच ऑक्शन आयोजित करणारे टाटा क्लिक लक्झरी हे देशातील पहिले ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या ‘द लक्झ वॉच ऑक्शन’च्या पहिल्या पर्वाला देशभरातील कलेक्टर्सकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता आणि त्यातून अनेक नवीन ग्राहकही आमच्याशी जोडले गेले. लोकांची हीच वाढती आवड आणि मागणी लक्षात घेऊन, यंदाच्या डिसेंबरमध्ये ‘द लक्झ वॉच ऑक्शन’च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. जे’ज वॉच स्टोअरसोबतची आमची भागीदारी पुढे नेत, हे पर्व विश्वास, नैपुण्य आणि क्यूरेटेड कलेक्शन देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देते. या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील निवडक आणि चोखंदळ ग्राहकांपर्यंत ही असाधारण घड्याळे पोहोचवणे आणि त्यांना एक अविस्मरणीय लक्झरी अनुभव देणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.”

या लिलावाबद्दल माहिती देताना जे’ज वॉच स्टोअरचे फाउंडर जय मखीजानी म्हणाले, “घड्याळांच्या उद्योगात जवळपास तीन दशके घालवल्यानंतर, मी भारतीय कलेक्टर्सची आवड आणि समज बदलताना व अधिक प्रगल्भ होताना पाहिली आहे. आज असाधारण घड्याळांमागील कारागिरी, त्यांचे दुर्मिळ असणे आणि त्यांच्याशी जोडलेल्या गोष्टींबद्दल लोकांमध्ये एक नवा उत्साह आणि आदर पाहायला मिळत आहे. टाटा क्लिक लक्झरीच्या सहकार्याने आयोजित ‘द लक्झ वॉच ऑक्शन’च्या दुसऱ्या पर्वाच्या माध्यमातून, हाच उत्साह पुढे नेण्यासोबतच जे’ज वॉच स्टोअरची नैपुण्ये आणि विश्वास देशभरातील कलेक्टर्सच्या एका मोठ्या वर्गापर्यंत पोहोचवण्याची आम्हाला अपेक्षा आहे. आम्हाला हे सांगतानाही अत्यंत आनंद होत आहे की, जे’ज वॉच स्टोअर या लिलावातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा ‘चिल्ड्रन्स कॅन्सर केअर’ या संस्थेला दान करणार आहे. यामुळे हा उपक्रम घड्याळ संग्रहाच्या जगापलीकडे जाऊन समाजातही एक सकारात्मक बदल घडवू शकेल.”

लिलावापूर्वी इच्छुक सहभागींना जे’ज वॉच स्टोअरच्या शाखांमध्ये निवडक घड्याळे प्रत्यक्ष पाहता येतील. हे प्रदर्शन १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान अहमदाबाद, २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान बेंगळुरू आणि २६ नोव्हेंबरपासून मुंबई येथे आयोजित केले जाईल. ही निवडक घड्याळे पाहण्यासाठी ऑक्शन वेबसाइटवरून अपॉइंटमेंट बुक करता येईल, जी टाटा क्लिक लक्झरी प्लॅटफॉर्मवरून पाहता येईल. सहभागींच्या सोयीसाठी एक विशेष ऑक्शन हेल्पलाइन देखील उपलब्ध असेल, जी त्यांना टाटा क्लिक लक्झरीच्या असिस्टेड सेल्स टीमशी जोडून देईल. ही टीम नोंदणी, प्रीव्ह्यू बुकिंग, बोली लावणे, पेमेंट आणि विक्रीनंतरच्या सर्व प्रक्रियांबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देईल आणि प्रत्येक टप्प्यावर मदत करेल.

गुणवत्ता आणि घड्याळांच्या मूळ इतिहासाचे सर्वोच्च निकष जपण्याच्या उद्देशाने, हा लिलाव कडक पडताळणी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली क्यूरेटेड कलेक्शनसह आयोजित केला जाईल. संपूर्ण कलेक्शन पाहण्यासाठी आणि आपल्या आवडत्या घड्याळाची विशलिस्ट तयार करण्यासाठी इच्छुक सहभागींना ऑक्शन वेबसाइटवर अकाउंट उघडावे लागेल. सहभागी लिलावापूर्वी किंवा तीन दिवसांच्या लिलावादरम्यान कधीही नोंदणी करू शकतात. नोंदणी केल्यानंतर, ते निवडक घड्याळांचा कॅटलॉग पाहू शकतील आणि आवडती घड्याळे त्यांच्या पर्सनलाइज्ड वॉचलिस्टमध्ये सेव्ह करू शकतील. याशिवाय, लिलाव सुरू झाल्यानंतर पहिली बोली लावण्यापूर्वी सहभागींनी पडताळणी प्रक्रिया आणि टोकन रक्कम भरणे अनिवार्य असेल. ही टोकन रक्कम लागू असलेल्या नियम व अटींनुसार परत करण्यायोग्य असेल. बोली लावण्याची प्रक्रिया एका स्वतंत्र ऑक्शन इंटरफेसद्वारे पूर्ण करता येईल.

लाइव्ह लिलावाच्या या पद्धतीमुळे बोली सुरू असतानाच घड्याळांची योग्य किंमत ठरते. प्रत्येक नवीन बोलीची माहिती तात्काळ मिळत असल्याने संपूर्ण पारदर्शकता राहते आणि खरेदीदारांना बाजारभावानुसार योग्य व किफायतशीर किमतीत ही खास घड्याळे खरेदी करण्याची संधी मिळते. लिलाव जिंकणाऱ्या खरेदीदारांना पेमेंट करण्यासाठी एक सुरक्षित लिंक पाठवली जाईल. पेमेंट पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे चार दिवसांचा कालावधी असेल, त्यानंतर घड्याळ थेट त्यांच्या घरी पोहोचवले जाईल.

अधिक माहितीसाठी कृपया या लिंकवर क्लिक करा: https://luxury.tatacliq.com/explore/the-luxe-watch-auction-nov26

Post a Comment

0 Comments