मुंबई, नोव्हेंबर २०२६ : कोटक सिक्युरिटीज लिमिटेडची रिटेल ब्रोकिंग शाखा असलेल्या 'कोटक निओ'ने यंदाच्या दिवाळीनिमित्त संवत २०८३ मधील मुहूर्त ट्रेडिंगसाठी मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे निवडलेल्या सर्वोत्तम समभागांची यादी जाहीर केली आहे.
दिवाळीनिमित्त शुभेच्छा देताना, कोटक निओचे इक्विटी रिसर्च प्रमुख श्रीकांत चौहान म्हणाले, 'दीर्घकाळ चाललेली मंदी आणि बाजारातील अस्थिरतेनंतर, संवत २०८३ हे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी अधिक अनुकूल आणि सकारात्मक वातावरण घेऊन आले आहे. निफ्टी ५० (Nifty 50) चा दर आर्थिक वर्ष २०२७ च्या अंदाजित कमाईच्या सुमारे १८.५ पट आणि आर्थिक वर्ष २०२८ च्या अंदाजित कमाईच्या १६.० पटीवर स्थिरावलेला आहे. आर्थिक वर्ष २०२७ मध्ये कमाईची वाढ सुमारे १८% आणि आर्थिक वर्ष २०२८ मध्ये १३% राहील, असा आमचा अंदाज आहे. भौगोलिक-राजकीय घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यामुळे नजीकच्या काळात बाजारातील अस्थिरता कायम राहू शकते, तरीही भारताची संरचनात्मक वाढ अतिशय मजबूत दिसत असल्याची आमची ठाम धारणा आहे.
गुंतवणूकदारांनी बाजाराचा अचूक तळ शोधण्याचा प्रयत्न करणे टाळावे आणि त्याऐवजी बाजारात मोठी घसरण झाल्यास, दर्जेदार लार्ज-कॅप आणि निवडक मिड-कॅप समभागांना प्राधान्य देत मजबूत स्थिती असलेल्या कंपन्यांचे समभाग हळूहळू जमा करावेत, अशी आमची गुंतवणूकदारांना सूचना आहे. या दिवाळीनिमित्त, मी सर्व गुंतवणूकदारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदासाठी शुभेच्छा देतो. संवत २०८३ हे वर्ष सर्वांसाठी शिस्तबद्ध गुंतवणूक, फायदेशीर संधी आणि संपत्तीची दीर्घकालीन निर्मिती घेऊन येवो.'
गुंतवणूकदारांसाठी सुचविण्यात आलेल्या गुंतवणूक कल्पना पुढीलप्रमाणे :
SAMVAT 2083 – FUNDAMENTAL MUHURAT PICKS
Stock Rating Price (Rs.) Fair Value (Rs.)
APL Apollo Tubes Ltd. BUY 2165 2594
Eternal Limited BUY 344 435
Hindustan Aeronautics ADD 4854 5305
Jubilant Ingrevia BUY
558
970
Persistent Systems BUY
6048
6,500
Titan
ADD
4,436
5,050
Ujjivan Small Finance Bank
BUY
53
85
Source: Kotak Institutional Equities Research, Kotak Neo – Private Client Group, NSE; Note-The above valuation summary is based on prices as on 30th October 2026
SAMVAT 2083 – TECHNICAL MUHURAT PICKS
Company Action Entry1 Entry2 Target Stop Loss
Bajaj Finance Ltd. BUY 939 850 1200 770
ICICI Bank Limited. BUY 1398 1300 1800 1200
JSW Steel Ltd. BUY 1246 1200 1475 1150
Bharat Electronics Ltd. BUY 370 350 410 340
Reliance Industries BUY 1165 1100 1400 1050
मूलभूत (फंडामेंटल) आणि तांत्रिक (टेक्निकल) अशा दोन्ही निकषांआधारे समभागांची माहिती खाली दिलेल्या पीडीएफ फाईलमध्ये नमूद करण्यात आलेली आहे.
मूलभूत टिपणीः भारताचा दृष्टिकोन: वाजवी मूल्ये आणि वेगवान वाढ
भारताच्या ढोबळ आर्थिक परिस्थितीचा विचार केला असता, ती स्थिर वाढीचा दृष्टिकोन दर्शवते आणि त्याला मूल्य-वर्धित उत्पादनातील खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीचे पाठबळ लाभलेले दिसत आहे. मध्य पूर्वेतील संघर्ष आणि अस्थिर विदेशी गुंतवणूक बाहेर जात असल्यामुळे नजीकच्या काळातील परिस्थिती आव्हानात्मक राहणार आहे. परंतु देशांतर्गत संस्थात्मक पातळीवर टिकून असलेली खरेदी बाजारपेठेला महत्त्वपूर्ण आधार देत आहे. किमतींत तसेच अलीकडील काळात झालेल्या घसरणीमुळे भारतीय समभाग अधिक वाजवी मूल्यांकनाच्या पातळीवर आलेले आहेत, त्यामध्ये निफ्टी-फिफ्टी निर्देशांक आता वित्तीय वर्ष २७ च्या ११.७ पट आणि वित्तीय वर्ष २८ च्या १६.५ पट अशा आरामदायक कमाईवर व्यवहार करत आहे. विशेष म्हणजे, निफ्टी-फिफ्टीच्या वित्तीय वर्ष २०२७ मधील गत वर्षाच्या तुलनेत (वायओवाय) कमाईची वाढ ११ तिमाहीतील उच्चांकावर पोहोचल्यामुळे, अंतर्गत कॉर्पोरेट कमाई वेगाने वाढली असतानाही मूल्यांकनात सुधारणा झालेली दिसून आली आहे. मजबूत दुहेरी अंकरुपी गती कायम राहील, असा आमचा अंदाज आहे. त्यामध्ये वित्तीय वर्ष २७ साठी निफ्टी-फिफ्टीची कमाईतील वाढ अंदाजे १८ टक्के आणि वित्तीय वर्ष २८ साठी १३ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
आयपीओमुळे बाजारातील सहभाग वाढला असून गुंतवणुकीचे नवीन मार्ग निर्माण झाले आहेत. प्राथमिक बाजाराच्या माध्यमातून केली जाणारी भांडवलविक्री देशातील रोख्यांमधील तरलता तात्पुरती शोषून घेत असली, तरी यशस्वी आणि दीर्घकालीन लिस्टिंगमुळे गुंतवणुकीचे एकूण क्षेत्र विस्तारत चालले आहे. ही गतिशीलता आर्थिक बाजाराला बळकट करते आणि संपत्ती निर्मितीसाठी शाश्वत संधी उपलब्ध करून देत आहे. नजीकच्या काळातील जागतिक व्यापक-आर्थिक चढ-उतारांनी बाजाराचे लक्ष वेधून चर्चेच्या रुपात अस्थिरता निर्माण करत असली, तरी भारतातील संरचनात्मक बदल एक लवचिक आणि दीर्घकालीन संधी प्रदान करतात आणि त्या अल्पकालीन जागतिक पातळीवरील गोंधळापासून स्वतंत्रपणे काम करताना दिसत आहे. नकारात्मक भावना आणि सुधारत चाललेले मूल्यांकन यांच्यातील वाढती दरी शिस्तबद्ध, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी अधिक अनुकूल वातावरण तयार करत असल्याचे चित्र आहे.

0 Comments