Business

Header Ads

एफसीआय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना 1020 बेडच्या शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार सुविधा मिळणार !

नागपूर : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एफसीआय) सीजीएचएस लाभार्थ्यांसाठी उत्तम आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, वानाडोंगरी, नागपूर येथील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेले 1020 बेडचे शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आता फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पॅनलमध्ये समाविष्ट झाले आहे. या उपक्रमामुळे नागपूर विभागातील एफसीआयचे कर्मचारी, विभागीय कामगार, निवृत्त कर्मचारी, त्यांचे जोडीदार आणि आश्रित कुटुंबियांना कॅशलेस आरोग्यसेवेचा मोठा फायदा मिळणार आहे. 

या संलग्नीकरणामुळे आता फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे लाभार्थी शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये विविध आरोग्यसेवा घेऊ शकतील. यात सर्वसाधारण उपचार, तज्ञ डॉक्टरांकडून होणारे विशेष उपचार, शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवा यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे हजारो लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा मिळण्यास मोठी मदत होईल.

या संलग्नीकरणाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे उपचाराच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. एफसीआयच्या करारानुसार लाभार्थ्यांना कॅशलेस किंवा अनुदानित आरोग्यसेवा मिळणार आहेत, ज्यामुळे महागड्या उपचाराच्या खर्चाची चिंता न करता वेळेवर उपचार घेता येतील. 
शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे एक मल्टी-सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. येथे 30 बेडचे आपत्कालीन विभाग आणि 65 बेडचे इंटेन्सिव्ह केअर युनिट(आयसीयू) आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांसह कॅथ लेब, एमआरआय, सीटी स्कॅन, अल्ट्रासोनोग्राफी आणि डिजिटल एक्स-रे सुविधा उपलब्ध आहेत. 

हॉस्पिटलमध्ये हृदयविकारासाठी अँगिओग्राफी, अँगिओप्लास्टी, बायपास आणि व्हॉल्व्ह शस्त्रक्रिया यांसारख्या प्रगत उपचारांसह सर्वसाधारण आणि न्यूरो शस्त्रक्रिया, टोटल नी आणि हिप रिप्लेसमेंट, युरॉलॉजी, गॅस्ट्रोएंटरॉलॉजी, न्युरॉलॉजी, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग, ईएनटी, नेत्ररोग, ऑर्थोपेडिक्स, त्वचारोग आणि मानसोपचार सेवा देखील एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. या सर्व सुविधा अत्यंत अनुभवी वैद्यकीय आणि शस्त्रक्रियाविषयक तज्ज्ञांच्या टीमद्वारे समर्थित आहेत, जी संपूर्ण आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्यास कटिबद्ध आहे. 

या प्रसंगी डॉ. अनुप मरार, डायरेक्टर – डीएमआयएचईआर (ऑफ कॅम्पस, नागपूर) यांनी एफसीआयच्या अधिकाऱ्यांचे त्यांच्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले, “एफसीआयसोबत संलग्न होण्याचा आणि त्यांच्या लाभार्थ्यांना वैद्यकीय सेवा देण्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. आमचे हॉस्पिटल सदैव उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यास वचनबद्ध आहे. या भागीदारीमुळे आम्हाला समाजाला अधिक चांगली सेवा देण्यास तसेच कामगार व त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्य व कल्याणाची हमी देण्यास मदत करेल.”

डॉ. वसंत गावंडे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, एसएमएचआरसी यांनी सांगितले की एफसीआय लाभार्थ्यांना आणखी चांगली आरोग्यसेवा मिळावी म्हणून हॉस्पिटलमध्ये एफसीआय हेल्पडेस्क स्थापन करण्यात आली आहे. या हेल्पडेस्कद्वारे रुग्णांना कॅशलेस विभागातील माहिती आणि प्रक्रिया याबद्दल मार्गदर्शन मिळेल. ही जबाबदारी डॉ. सुधीर सिंग (एएमएस – एसएमएचआरसी) आणि श्री अहमिंद्र जैन (एओ) यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली जाईल. 
डॉ. सुधीर सिंह (एएमएस – एसएमएचआरसी) यांनी श्री. सुनील सुरे (ऑपरेशन्स मॅनेजर) यांचे विशेष कौतुक केले, ज्यांनी श्री. चैतन्य मेघे यांच्या सहकार्याने संलग्नीकरणाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Post a Comment

0 Comments