Business

Header Ads

अदाणी एंटरप्रायझेसने १,००० कोटी रुपयांचा तिसरा सार्वजनिक एनसीडी इश्यू जारी केला आहे, ज्याचा कमाल व्याजदर वार्षिक ८.९०% असेल !

थोडक्यात पण महत्त्वाचे

• हा इश्यू मंगळवार, ६ जानेवारी २०२६ रोजी उघडेल आणि सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी बंद होईल
• प्रभावी व्याजदर (Effective Yield) ८.९०% वार्षिक पर्यंत
• एनसीडी ला आयसीआरए लिमिटेड आणि केअर रेटिंग्स लिमिटेड ने ‘AA-’ रेटिंग आणि ‘स्थिर दृष्टिकोन देण्यात आला आहे
• समान रेटिंग असलेल्या एनसीडी आणि फिक्स्ड डिपॉझिट्सच्या तुलनेत आकर्षक परतावा देते
• 1,000 कोटीच्या इश्यूमध्ये 500 कोटींचा बेस इश्यू आणि 500 कोटी पर्यंतचा ग्रीन शू पर्याय समाविष्ट आहे
• एनसीडी बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होणार आहेत
• वाटप ‘जो आधी येईल त्याला प्राधान्य या तत्त्वावर केले जाईल
• एईएलचा गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू केलेला दुसरी 1,000 कोटींचा दुसरा एनसीडी इश्यू फक्त पहिल्या दिवशी ३ तासांत पूर्णपणे सबस्क्राइब झाला होता

अहमदाबाद, २ जानेवारी २०२६ : १९९३ पासून शाश्वत पायाभूत सुविधा व्यवसाय उभारण्याचा दीर्घ अनुभव असलेली, अदाणी समूहाची प्रमुख कंपनी आणि बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी सूचीबद्ध व्यवसाय इन्क्यूबेटर, अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड ("कंपनी" किंवा "एईएल"), ने सुरक्षित, मानांकित, सूचीबद्ध रिडीमेबल, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्सचा तिसरा सार्वजनिक इश्यू लाँच करण्याची घोषणा केली आहे. 

अदाणी ग्रुपचे ग्रुप सीएफओ जुगेशिंदर ‘रॉबी सिंग यांनी सांगितले, “एनसीडी जारी करण्याची ही तिसरी प्रक्रिया भारताच्या भांडवली बाजारापर्यंत पोहोच वाढवण्याच्या आणि किरकोळ गुंतवणूकदारांना दीर्घकालीन पायाभूत सुविधांच्या वाढीमध्ये वाटा मिळवून देण्याच्या आमच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. आमच्या मागील योजनांना मिळालेला जोरदार प्रतिसाद आमच्या धोरणावरील आणि आर्थिक शिस्तीवरील विश्वास दृढ करतो आणि आम्ही हीच गती कायम ठेवण्याचे आमचे ध्येय आहे. विमानतळ आणि रस्ते ते डेटा सेंटर्स आणि ग्रीन हायड्रोजनपर्यंत, भारताच्या पायाभूत सुविधांच्या पुढील लाटेसाठी एक इनक्यूबेटर म्हणून, एईएल भारताच्या आर्थिक परिवर्तनाला चालना देणारे व्यवसाय निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे,” असेही ते पुढे म्हणाले.

गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू झालेला एईएलचा १,००० कोटी रुपयांचा दुसरा एनसीडी इश्यू पहिल्याच दिवशी ३ तासांत पूर्णपणे सबस्क्राइब झाला. एईएल ही एकमेव खाजगी कॉर्पोरेट कंपनी आहे (एनबीएफसी वगळून) जी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सूचीबद्ध कर्ज उत्पादन सादर करत आहे, ज्यामुळे वैयक्तिक आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याची एक दुर्मिळ संधी मिळत आहे. अलीकडील व्याजदर कपात आणि सौम्य व्याजदर चक्रामुळे, स्थिर, निश्चित-उत्पन्नाचे मार्ग शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एईएलचा एनसीडी इश्यू योग्य वेळी आला आहे. 

समान रेटिंग असलेल्या एनसीडी आणि मुदत ठेवींच्या तुलनेत स्पर्धात्मक परतावा देत असल्यामुळे, हा सार्वजनिक इश्यू गुंतवणूकदारांसाठी एक मौल्यवान संधी आहे. 
प्रस्तावित एनसीडी ना केअर रेटिंग्स लिमिटेडने २२ डिसेंबर, २०२५ रोजीच्या रेटिंग पत्राद्वारे आणि २३ डिसेंबर, २०२५ रोजीच्या रेटिंग कारणांच्या प्रेस रिलीझद्वारे “केअर एए-; स्टेबल” आणि आयसीआरए लिमिटेडने २० डिसेंबर, २०२५ रोजीच्या रेटिंग पत्राद्वारे आणि २२ डिसेंबर, २०२५ रोजीच्या रेटिंग कारणांच्या प्रेस रिलीझद्वारे “[आयसीआरए] एए- (स्टेबल)” असे मानांकन दिले आहे. या मानांकनाच्या सिक्युरिटीजमध्ये आर्थिक जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्याच्या बाबतीत उच्च दर्जाची सुरक्षितता मानली जाते. अशा सिक्युरिटीजमध्ये क्रेडिट जोखीम खूप कमी असते.

या इश्यूचा मूळ आकार ५०० कोटी आहे, आणि अतिरिक्त ५०० कोटींपर्यंतची अतिरिक्त वर्गणी राखून ठेवण्याचा पर्याय ("ग्रीन शू ऑप्शन") उपलब्ध आहे, ज्यामुळे एकूण रक्कम १,००० कोटी होईल ("इश्यू" किंवा "इश्यूचा आकार"). हा इश्यू ६ जानेवारी २०२६ रोजी खुला होईल आणि १९ जानेवारी २०२६ रोजी बंद होईल, तथापि तो लवकर बंद करण्याचा किंवा मुदतवाढ देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रत्येक एनसीडीचे दर्शनी मूल्य १००० आहे. प्रत्येक अर्ज किमान १० एनसीडीसाठी आणि त्यानंतर १ एनसीडीच्या पटीत असेल. अर्जाचा किमान आकार १०,००० असेल.

या इश्यूच्या रकमेपैकी किमान ७५% रक्कम कंपनीने घेतलेल्या कर्जाची पूर्ण किंवा अंशतः प्रीपेमेंट, परतफेड किंवा पेमेंट करण्यासाठी; आणि/किंवा अशा कर्जावरील कोणतेही व्याज देण्यासाठी वापरली जाईल आणि उर्वरित शिल्लक रक्कम (जास्तीत जास्त २५% पर्यंत) सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाईल.
एईएल ने गेल्या सहा महिन्यांमध्ये मोठ्या प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी करण्याची क्षमता सिद्ध केली आहे.

• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबर २०२५ रोजी झाले आणि त्याचे कामकाज २५ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाले.
• ऑक्टोबर २०२५ मध्ये, गुगल आणि अदाणी कनेक्सने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भारताचा सर्वात मोठा एआय डेटा सेंटर कॅम्पस आणि नवीन हरित ऊर्जा पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली
• नानासा-पिडगाव” एचएएम प्रकल्प सप्टेंबर २०२५ मध्ये कार्यान्वित झाला; त्यामुळे तो सातवा कार्यान्वित रस्ते प्रकल्प ठरला
• तीन नवीन प्रकल्पांसाठी लेटर ऑफ अवॉर्ड मिळाले आहेत, ज्यात उत्तराखंडमधील सोनप्रयाग आणि केदारनाथ दरम्यानच्या रोपवे प्रकल्पाचा आणि बिहारमधील दोन प्रकल्पांचा समावेश आहे, जे (i) मुंगेर (सफियाबाद) ला सुलतानगंज रोड आणि (ii) सुलतानगंज रोड ते साबौर रोड, आणि हे प्रकल्प हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल अंतर्गत आहेत.

नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड, ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि टिप्सन्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे लीड मॅनेजर आहेत.
हे एनसीडी आठ वेगवेगळ्या सिरीजमध्ये २४ महिने, ३६ महिने आणि ६० महिन्यांच्या मुदतीसाठी उपलब्ध आहेत, ज्यात त्रैमासिक, वार्षिक आणि एकत्रित व्याज देयकाचे पर्याय आहेत.

व्याज देयकाची वारंवारता वार्षिक संचयी त्रैमासिक वार्षिक संचयी त्रैमासिक वार्षिक संचयी
कालावधी 24 महिने 24 महिने 36 महिने 36 महिने 36 महिने 60 महिने 60 महिने 60 महिने
सर्व श्रेणींमधील एनसीडी धारकांसाठी कूपन (% प्रति वर्ष) 8.60% NA 8.48% 8.75% NA 8.62% 8.90% NA
सर्व श्रेणींमधील एनसीडी धारकांसाठी प्रभावी उत्पन्न (% प्रति वर्ष) 8.60% 8.60% 8.75% 8.74% 8.75% 8.90% 8.89% 8.90%
सर्व श्रेणींमध्ये एनसीडी धारकांसाठी मॅच्युरिटीवर विमोचन रक्कम (₹ / एनसीडी) 1,000 1179.40 1,000 1,000 1286.45 1,000 1,000 1531.95
परिपक्वता/विमोचन तारीख (वाटपाच्या मानलेल्या तारखेपासून) 24 महिने 24 महिने 36 महिने 36 महिने 36 महिने 60 महिने 60 महिने 60 महिने
पुट आणि कॉल पर्याय लागू नाही
एनसीडीचे दर्शनी मूल्य/इश्यू किंमत (₹/ एनसीडी) 1,000
किमान अर्ज आकार आणि त्यानंतर एनसीडीच्या पटीत 10,000 (10 एनसीडी) आणि त्यानंतर ₹१,००० च्या पटीत (१ एनसीडी).

व्याज देयकाची पद्धत उपलब्ध असलेल्या विविध माध्यमांद्वारे कर्जाचे स्वरूप सुरक्षित

Post a Comment

0 Comments