Business

Header Ads

अॅमवे इंडिया चा आता जलद आणि अखंड सेवेसह घरपोच डिलिव्हरीचा पूर्णपणे बदलेला अनुभव !

 राष्ट्रिय : भारतातील 90% पेक्षा जास्त पिनकोड्सपर्यंत पोहोचून आपली व्याप्ती दुप्पट केली आहे; एका डिजिटल ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म आणि अधिक चांगल्या लॉजिस्टिक पार्टनर्समुळे आता डिलिव्हरीची सेवा आणखी जलद होणार आहे. स्वास्थ्य आणि कल्याणाच्या गरजा पूर्ण करणारी एक आघाडीची कंपनी, अॅमवे इंडिया ने आज आपल्या होम डिलिव्हरी सेवेमध्ये मोठ्या सुधारणा केल्याची माहिती दिली. 

या सुधारणांमुळे देशभरातील वितरक आणि त्यांच्या ग्राहकांसाठी जलद, अधिक विश्वासार्ह आणि अखंड ऑर्डर करता येण्याचा अनुभव देण्याची कंपनीची वचनबद्धता अधिक स्पष्ट झाली आहे. गेल्या पाच वर्षांत, ॲमवे ने आपली होम डिलिव्हरी क्षमता मोठ्या प्रमाणात मजबूत केली असून, डिलिव्हरीच्या वेळेत 48% कपात (3.1 दिवसांवरून अवघ्या 1.6 दिवसांपर्यंत) करून मोठा बदल घडवून आणला आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी मिळणाऱ्या डिलिव्हरीचे प्रमाण 29% वरून 55% पेक्षा जास्त झाले आहे. 

या सुधारित अनुभवाला त्यांच्या सर्व्हिस नेटवर्कच्या मोठ्या विस्ताराची जोड मिळाली असून, आता हे नेटवर्क 8000 वरून 17,500 पेक्षा जास्त पिन कोड्सपर्यंत पोहोचले आहे, जे भारताच्या एकूण पिन कोड्सच्या 90% पेक्षा जास्त आहे. हे टप्पे भारतातील ग्राहकांसाठी दर्जेदार वेलनेस उत्पादने सहज उपलब्ध करून देण्याच्या ॲमवे च्या ठाम वचनबद्धतेचे प्रतीक आहेत.

या बदलावर भाष्य करताना अॅमवे इंडिया चे मॅनेजिंग डायरेक्टर रजनीश चोप्रा म्हणाले, "आमच्या धोरणाच्या केंद्रस्थानी वितरक आणि ग्राहक असल्याने, आम्ही होम डिलिव्हरीला एक 'स्ट्रॅटेजिक पिलर' (धोरणात्मक स्तंभ) म्हणून विकसित करत आहोत—असा स्तंभ जो अधिक चांगली सेवा देण्यास सक्षम आहे, उत्पादनांची उपलब्धता सुधारतो आणि संपूर्ण भारतात विनाअडथळा अनुभव देतो. हा बदल मजबूत राष्ट्रीय भागीदारी, अधिक सक्षम डिजिटल पाया आणि अत्यंत चपळ पुरवठा साखळीमधील धोरणात्मक गुंतवणुकीमुळे शक्य झाला आहे; ज्यामुळे आम्हाला वेगाने प्रतिसाद देणे, अधिक हुशारीने काम करणे आणि अधिक सातत्याने सेवा देणे सोपे झाले आहे. प्रत्यक्षात जमिनीवर जे बदल दिसत आहेत, त्यावरून मला खात्री मिळतेय की: आमची पोहोच आता अधिक मजबूत आहे, आमची यंत्रणा अधिक स्मार्ट आहे आणि आजचा अनुभव पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने सुटसुटीत आहे. पुढे जाताना, आमचे लक्ष विश्वासार्हता अधिक वाढवण्यावर, 'अनबॉक्सिंग' अनुभव अधिक चांगला करण्यावर आणि भारतभरातील आमच्या ग्राहकांसाठी भविष्यासाठी सज्ज अशी डिलिव्हरी इकोसिस्टम तयार करून आमचा दर्जा अधिक उंचावण्यावर आहे."

यात भर घालत, अॅमवे इंडिया चे ग्लोबल ओम्नी चॅनेल लॉजिस्टिक्स, कस्टमर सर्व्हिसेस आणि उत्तर क्षेत्राचे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट संजीव सुरी म्हणाले, "सप्लाय चेन आता केवळ 'खर्चाचे केंद्र' न राहता 'मूल्य निर्माण करणारे' माध्यम म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे ॲमवेमध्ये आमचे लक्ष एक अशी इंटेलिजेंट, प्रतिसाद देणारी आणि लोकांच्या गरजा समजून घेणारी यंत्रणा उभारण्यावर आहे, जी ग्राहकांना खऱ्या अर्थाने उत्तम सेवा देईल. आमच्या होम डिलिव्हरी ऑपरेशन्समध्ये झालेली प्रगती याच बदलाचे प्रतिबिंब आहे. प्रगत ॲनालिटिक्स, विविध टीम्समधील उत्तम समन्वय आणि राष्ट्रीय कुरिअर कंपन्यांसोबतच्या भक्कम भागीदारीमुळे आम्ही डिलिव्हरीचा वेग वाढवला आहे, विश्वासार्हता सुधारली आहे आणि विविध भौगोलिक भागांतील ग्राहकांना सेवा देण्याची आमची क्षमता अधिक मजबूत केली आहे. 

आमचा हा प्रवास रियल-टाइम व्हिजिबिलिटी (थेट देखरेख), सक्रिय संवाद आणि आव्हानात्मक काळात घेतलेल्या ठाम निर्णयांमुळे यशस्वी झाला आहे. भविष्याचा विचार करता, भारतभरातील आमच्या ग्राहकांसाठी विनाअडथळा आणि 'फ्युचर-रेडी' डिलिव्हरी अनुभव तयार करण्यासाठी आम्ही एआय, डिजिटल टूल्स आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण या गोष्टींचा समावेश करणे सुरूच ठेवू."

विनाअडथळा ग्राहक अनुभव देण्याची ॲमवे ची वचनबद्धता त्यांच्या मजबूत डिजिटल पायावर आधारित आहे. अॅमवे इंडिया ची देशभरात 23 वेअरहाउसेस (गोदामे) कार्यरत आहेत, जी सर्व होम-डिव्हिलरी ऑर्डर्सवर वेळेवर प्रक्रिया आणि त्यांची पाठवणी सुनिश्चित करतात. 

ऑर्डर्सवर विनाअडथळा प्रक्रिया व्हावी यासाठी काही निवडक वेअरहाउसेसमध्ये अत्याधुनिक 'पिक-टू-लाइट' तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. आता एका युनिफाइड ट्रॅकिंग प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना ईमेल, एसएमएस आणि कंपनीच्या वेबसाइटद्वारे त्यांच्या प्रत्येक ऑर्डरची 'रियल-टाइम' माहिती मिळते. या एकत्रीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर कामकाज करणे शक्य झाले आहे: ॲमवे सध्या दरमहा 2 लाखांहून अधिक होम डिलिव्हरी ऑर्डर्स पूर्ण करते आणि कंपनीचा 'परफेक्ट डिलिव्हरी रेट' 99.2% इतका प्रभावी आहे (जो 2020 मध्ये 97.2% होता). ही वाढ मोठ्या प्रमाणावरील डिजिटल स्वीकारार्हतेमुळे झाली आहे, जिथे एकूण विक्रीमध्ये ऑनलाइन विक्रीचा वाटा 76% आहे.
तसेच, कंपनी डिलिव्हरीनंतरही 'रिटर्न इकोसिस्टम'द्वारे ग्राहकांच्या सोयीची काळजी घेते. यामध्ये कोणत्याही ॲमवे स्टोअरमध्ये 30 दिवसांची 'रिटर्न पॉलिसी' आणि 1900 हून अधिक पिन कोड्सवर घरपोच 'रिटर्न पिकअप'ची सोय उपलब्ध आहे.

ही उत्तम कामगिरी ॲमवे च्या लवचिक, 'मल्टी-पार्टनर डिलिव्हरी मॉडेल' आणि विस्तारलेल्या राष्ट्रीय भागीदारीमुळे शक्य झाली आहे, ज्यामुळे विश्वासार्हता वाढते आणि सातत्याने उच्च दर्जाच्या सेवेची खात्री मिळते. भविष्याचा विचार करता, अॅमवे इंडिया प्रीमियम आणि शाश्वत पॅकेजिंग सोल्यूशन्सच्या माध्यमातून ग्राहकांचा 'अनबॉक्सिंग' आणि 'डिलिव्हरी' अनुभव अधिक उंचावण्यावर नव्याने भर देत आहे. ग्राहकांचे समाधान वाढवण्यासाठी आणि आपल्या ABO (ॲमवे बिझनेस ओनर्स) समुदायाच्या वाढत्या आकांक्षांना पाठबळ देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांशी सुसंगत असा अधिक अखंड, आकर्षक आणि सातत्यपूर्ण 'डोअरस्टेप' अनुभव निर्माण करण्याचे कंपनीचे ध्येय आहे. 

आपल्या मजबूत होम डिलिव्हरी नेटवर्क आणि सातत्यपूर्ण डिजिटल गुंतवणुकीच्या जोरावर, ॲमवे इंडिया सेवा उत्कृष्टता आणि ग्राहक अनुभवामध्ये नवीन निकष प्रस्थापित करण्यावर आपले लक्ष केंद्रित ठेवून आहे..
ॲमवे ची उत्पादने ॲमवे वितरकांकडे, कंपनीच्या वेबसाइटवर (www.amway.in) आणि देशभरातील ॲमवे स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत.

Post a Comment

0 Comments