गुवाहाटी, 25 फेब्रुवारी, 2026 : भारतातील खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक एचडीएफसी बँकेने गुवाहाटीत आपले नवे टेक आणि डिजिटल फॅक्टरी सुरू केले आहे. हे केंद्र प्रगत तंत्रज्ञान विकास, नवोन्मेष आणि प्रतिभा संवर्धनासाठी कार्य करणार असून, आसाममध्ये AI, डिजिटल आणि सायबरसिक्युरिटी क्षेत्रातील कौशल्यवृद्धीला चालना देणार आहे. ही सुविधा आसाममधील पहिली तर राष्ट्रीय स्तरावर चौथी आहे. यापूर्वी बँकेच्या अशा सुविधा मुंबई, बेंगळुरू आणि गुरुग्राम येथे आहेत.
इमारतीचे उद्घाटन आसामचे मुख्यमंत्री आदरणीय डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी एचडीएफसी बँकेचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर श्री. कैझाद भरुचा, एचडीएफसी बँकेचे मुख्य माहिती अधिकारी श्री. रमेश लक्ष्मीनारायण, आसाम सरकारचे मान्यवर, सहभागी शैक्षणिक संस्थांचे सदस्य आणि एचडीएफसी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
ही सुविधा राज्यातील कुशल व्यावसायिकांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देईल, ज्यामुळे ते थेट पुढील पिढीच्या तंत्रज्ञान विकासात योगदान देऊ शकतील. स्थानिक तंत्रज्ञान प्रतिभेचा उपयोग करून बँक टेक आणि डिजिटल फॅक्टरीसाठी क्षमता अधिक मजबूत करणार आहे. उद्दिष्ट म्हणजे AI, क्लाउड, डेटा आणि कोर इंजिनिअरिंग या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाची प्रगती साधणे, ज्यामुळे राज्यात डिजिटल उत्पादन निर्मितीची क्षमता खुली होईल.
एचडीएफसी बँकेने आसाम सरकारसोबत अॅडव्हान्टेज आसाम 2.0 या उपक्रमांतर्गत भागीदारी केली आहे, ज्याचे नेतृत्व आसामचे आदरणीय मुख्यमंत्री करत आहेत. या संयुक्त उपक्रमांतर्गत, एचडीएफसी बँक आणि आसाम सरकार BFSI आणि फिनटेक क्षेत्राशी संबंधित संरचित कौशल्य-विकास अभ्यासक्रमाद्वारे शैक्षणिक ज्ञान आणि उद्योगातील तज्ज्ञता यांचा संगम साधण्याचा मानस बाळगतात.
हा कार्यक्रम कॅम्पस-टू-कॉर्पोरेट क्षमता या संकल्पनेवर आधारित असून, बँकिंग आणि फिनटेक उद्योगातील नोकरीच्या गरजांशी सुसंगत आहे. अभ्यासक्रमात पारंपरिक बँकिंग ज्ञानासोबतच नव्या IT क्षेत्रांचा समावेश आहे.
हा कार्यक्रम सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाला असून सध्या 150 हून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उद्योगसंबंधित ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.
या कार्यक्रमाचा भाग असलेल्या विद्यार्थ्यांना एचडीएफसी बँकेत 2 – 4 महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिपची संधी मिळेल. यामुळे त्यांना शैक्षणिक व तंत्रज्ञानाशी संबंधित संकल्पना प्रत्यक्ष कॉर्पोरेट वातावरणात वापरण्याचा अनुभव मिळेल. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.
या प्रसंगी श्री. कैझाद भरुचा, डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर, एचडीएफसी बँक म्हणाले, “गुवाहाटीत आमचे नवे टेक आणि डिजिटल फॅक्टरी सुरू करताना आम्हाला नवीन डिजिटल उत्पादने आणि सेवा सुरू करता येतील तसेच IT क्षमता वाढवता येईल. फेब्रुवारी 2025 मध्ये अॅडव्हान्टेज आसाम 2.0 मध्ये आसाम सरकारसोबत MoU साइन केले होते आणि एका वर्षात ही सुविधा उभारणे शक्य झाले. हे आसाम सरकारच्या मजबूत पाठिंब्यामुळे शक्य झाले. या सुविधेमुळे आम्हाला नवीन डिजिटल उत्पादने आणि सेवा सुरू करता येतील तसेच IT क्षमता वाढवता येईल. आसाममधील अभियांत्रिकी प्रतिभेला आकर्षित करून त्यांना बँकिंग क्षेत्रातील पुढील पिढीतील तंत्रज्ञान विकासात योगदान देता येईल आणि ते आपल्या गावाजवळ राहून काम करू शकतील.”
एचडीएफसी बँकेचे टेक आणि डिजिटल फॅक्टरी मॉडेल डिजिटल अंमलबजावणीचे केंद्रबिंदू असून, एक्स्पिरियन्स डिझाईन, मोबाईल आणि क्लाउड इंजिनिअरिंग, APIs आणि ऑर्केस्ट्रेशन, डेटा आणि GenAI तसेच सिक्युअर-बाय-डिझाईन आर्किटेक्चर यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते.
आसाम हे बँकेसाठी महत्त्वाचे राज्य राहिले आहे. 2004 मध्ये गुवाहाटीत पहिली शाखा सुरू करून बँकेने आपली राज्यातील वाटचाल सुरू केली. सध्या (31 डिसेंबर 2025 पर्यंत) बँकेच्या 138 शाखा आणि 248 एटीएम्स आहेत. स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी (SLBC) च्या अहवालानुसार 31 डिसेंबर 2025 रोजी आसाममधील बँकेचा CD रेशो 85.78% इतका होता.

0 Comments